राशन कार्ड ऑनलाइन चेक करा माहिती करून घ्या तुमचा १२ अंकी नंबर.

राशन कार्ड ऑनलाइन चेक करा माहिती करून घ्या तुमचा १२ अंकी नंबर.

मित्रांनो राशन कार्ड ऑनलाइन चेक कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आधार, मतदान किंवा पॅन कार्ड ही कागदपत्रे जेवढी आवश्यक असतात तेवढीच आवश्यकता आपल्याला राशन कार्डची देखील असते. तुमच्याकडे जर तुमचा राशन कार्ड 12 अंकी नंबर असेल तर अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील तुमचे राशन कार्ड ऑनलाइन चेक करू शकता. राशनकार्ड संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.

आमच्या whatsapp group ची लिंक

राशन कार्ड ऑनलाइन चेक करण्यासाठी तुमच्याकडे राशन कार्ड 12 अंकी नंबर आवशयक.

राशन संदर्भातील ऑनलाईन बाबी चेक करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या राशन कार्डचा १२ अंकी नंबर असेन आवश्यक आहे. जर तुमच्याकडे राशन कार्ड 12 अंकी नंबर असेल तर तुम्ही अगदी काही मिनिटात तुमच्या राशन संदर्भातील तपशील बघू शकता. परंतु जर तुमच्याकडे हा राशन कार्ड 12 अंकी नंबर नसेल तर तो कसा बघावा कोठे शोधावा या संदर्भात संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

टेलिग्राम ग्रुपची लिंक

असा शोधा तुमचा १२ अंकी कार्ड नंबर राशन कार्ड ऑनलाइन चेक करा मोबाईलवर.

  • मोबाईल मधील गुगल प्ले स्टोर उघडा.
  • सर्च बारमध्ये टाईप करा मेरा राशन ॲप ( Mera rashan app )
  • मेरा राशन ॲप मोबाईलमध्ये इंस्टाल करा.
  • ॲप्लीकेशनला ओपन केल्यानंतर Know your entitlement या बटनाला टच करा.
  • मेरा राशन ॲप Know your entitlement या बटनाला टच करून सुद्धा राशन कार्ड नंबर दिसत नसेल तर . eligibility criteria बटनाला टच करा.

 या ठिकाणी तुम्हाला तुमच्या राशन कार्डचा नंबर दिसेल तो जतन करून ठेवा.

राशन कार्ड तपशील

राशन कार्ड ऑनलाइन चेक

असे करा राशन कार्ड डाउनलोड

  • मोबाईल मधील वेब ब्राउजर उघडा.
  • ब्राउजरच्या सर्च बारमध्ये rcms.mahafood.gov.in हा वेब ॲड्रेस टाका.
  • National Food Security Program म्हणजेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम हि वेबसाईट तुमच्या मोबाईलवर दिसेल.
  • वेब ब्राउजरच्या उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये दिसत असलेल्या तीन डॉटवर टच करा.
  • Desktop Site या पर्यायासामोरील चौकोनामध्ये टच करा.
  • rashan card या पर्यायावर टच करा.
  • त्यानंतर Know your ration card या पर्यायावर टच करा.
  • दिलेल्या चौकटीमध्ये कॅपचा कोड टाईप करून verify या बटनाला टच करा.
  • आणखी एक चौकट तुम्हाला दिसेल यामध्ये तुम्हाला तुमच्या राशन कार्डचा बारा अंकी नंबर टाकायचा आहे आणि view report या बटनावर टच करायचे आहे.
  • view report वर टच केल्यानंतर राशन कार्ड संबधित सर्व तपशील तुम्हाला दिसेल. या ठिकाणी print your ration card असा पर्याय दिसेल त्यावर टच करा.
  • क़्यु आर कोड सहित संपूर्ण राशन कार्ड या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
  • हे राशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी सेव्ह या बटनावर टच करा.
  • जसे हि तुम्ही सेव्ह या बटनावर टच कराल त्यावेळी हे राशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. ते सेव्ह करून घ्या. एखाद्या झेरॉक्स सेंटरवर जावून त्याची प्रिंट काढून घ्या.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे राशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता तसेच तुम्हाला तुमचा बारा अंकी राशन कार्ड क्रमांक माहित नसेल तर तो देखील माहित करून घेऊ शकता.

या लेखाचा सारांश खालील प्रमाणे.

  • मोबाईलचा उपयोग करून बारा अंकी राशन कार्ड नंबर कसा शोधावा त्यासाठी कोणते मोबाईल ॲप्लीकेशन वापरावे हे आपण यामधून शिकलो.
  • राशन कार्ड मोबाईलमध्ये pdf मध्ये डाउनलोड कसे करावे या बद्दल देखील माहिती आपण घेतलेली आहे.
  • बारा अंकी राशन कार्डचा उपयोग करून तुम्ही तुमच्या राशन कार्डचे सर्व तपशील ऑनलाईन बघू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *