राशन दुकानात मिळणार साबण सोडवा शाम्पू चहापत्ती बघा GR

राशन दुकानात मिळणार साबण सोडवा शाम्पू चहापत्ती बघा GR

राशन दुकानात मिळणार साबण सोडवा शाम्पू चहापत्ती या संदर्भातील जी आर नुकताच आलेला आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आजपर्यंत राशन दुकानामध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू मिळत होत्या जसे कि गहू, तांदूळ, डाळ, साखर, इत्यादी परंतु आता याच राशन दुकानामध्ये म्हणजेच स्वस्तधान्य दुकानामध्ये खालील वस्तू मिळणार आहेत. या जी आर संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.

  • अंघोळीचा साबण.
  • कपडे धुण्याचा साबण.
  • हॅण्डवॉश.
  • कपडे धुण्याचा सोडा म्हणजेच डीटर्जंट.
  • शाम्पू.
  • चहापत्ती.
  • कॉफी.

महा आवास योजनेंतर्गत घरकुल मिळणार जी आर आला.

राशन दुकानात मिळणार असणाऱ्या वस्तूबाबतचा जी आर बघा.

वरील वस्तू आता स्वस्त धान्य दुकानामध्ये मिळणार असल्याचा शासन निर्णय म्हणजेच जी आर दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा जी आर तुम्हाला बघायचा असेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी जी आर बघण्याची लिंक दिलेली आहे त्यावर टच करून तुम्ही हा शासन निर्णय तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये बघू शकता.

4222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

राशन दुकानात मिळणार वरील वस्तू दुकानदार होणार मालामाल.

वरील वस्तू स्वस्तधान्य दुकानामध्ये ठेवून त्यांची विक्री केल्यामुळे राशन दुकानदार यांना या वस्तूंच्या विक्रींच्या बदल्यात कमिशन मिळणार आहे त्यामुळे सामन्यजनतेचे माहित नाही परंतु राशन दुकानदार मात्र मालामाल होणार आहेत यामध्ये तीळमात्र शंका नाही. माझ्या वौयाक्तिक मतानुसार राशन दुकानास आता मिनी किराणा दुकान म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही.

शेतात जाण्यासाठी मिळणार आता शेतरस्ता

नागरिकांचा देखील होऊ शकतो फायदा.

अनेक गावामध्ये छोटी मोठी किराणा दुकाने असतात या दुकानामध्ये ज्या वस्तू असतात त्या संबधित दुकानदार चढ्या भावाने विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राशन दुकानामध्ये मिळणाऱ्या ह्या वस्तू सर्वसामान्य जनतेसाठी फायद्याचा सुद्धा ठरू शकतात अट मात्र एवढीच आहे राशन दुकानदराने त्या व्यवस्तीत विकायला हव्यात.

राशन दुकानात मिळणार

आमच्या फेसबुक ग्रुपची लिंक

शासनाचा कसलाही हस्तक्षेप नाही.

राशन दुकान म्हटले कि त्याकडे आदराने बघितले जाते. स्वस्त धान्य दुकानावर शासनाचे नियंत्रण असल्याने त्या ठिकाणी असलेल्या वस्तू अगदी कमी दराने मिळतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी अगदी डोळेझाक करून माल खरेदी करतात. मात्र साबण शाम्पू, सोडा आणि वरील उल्लेख केलेल्या वस्तू किती दराने दुकानदार विकतील यावर मात्र शासनाचे कसलेही नियंत्रण राहणार नाही.

आमच्या टेलीग्राम ग्रुपची लिंक

भविष्यात आणखी वस्तू ठेवण्याचा अधिकार मिळू शकतो राशन दुकानदारांना.

आता सध्या साबण सोडा शाम्पू चहापत्ती आणि इतर किरकोळ वस्तू राशन दुकानामध्ये ठेवण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यामध्ये आणखी वस्तू ठेवण्याची  राशन दुकानदारांना परवानगी मिळेल अशी शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *