अत्यंत आनंदाची बातमी आहे. शेतकरी कर्ज माफी GR काढण्यात आलेला आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील जी आर म्हणजेच शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेल्या लिंकला किंवा बटनाला टच करून तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.
शेतकऱ्यांना मिळणार शेतीसाठी लगेच कर्ज पहा काय आहे कृषी कर्ज मित्र योजना.
शेतकरी कर्ज माफी चा शासन निर्णय आला.
विदर्भ व मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून म्हणजेच ज्या सावकाराकडे सावकारी करण्याचा शासकीय परवाना आहे. अशा सावकारांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असेल तर असे कर्ज शासनातर्फे संबधित सावकारास देऊन शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा शासन निर्णय म्हणजेच जी आर नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर आलेला आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये बघणार आहोत. GR बघण्यासाठी पेजला खाली स्क्रोल करा.
ठिबक व तुषार योजनेसाठी पूर्वी मिळायचे ४५ ते ५५ टक्के अनुदान. आता यापुढे मिळेल ७५ व ८० टक्के सबसिडी अधिक माहितीसाठी येथे टच करा.
कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार या शेतकरी कर्ज माफी चा लाभ.
विदर्भ व मराठवाड्यातील १४ १४ जिल्ह्यातील ३७४९ शेतकरी बांधवांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यास परवानगी देण्यात आल्याचा GR प्रकाशित करण्यात आलेला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी शासनमान्य सावकारांकडून कर्ज घेतलेले आहे त्या कर्जाच्या परतफेडीसाठी ५ कोटी एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे.
विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये सामील व्हा. येथे टच करा.
अशीच शेतकरी कर्ज माफी इतर जिल्ह्यांत देखील लागू करावी.
शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी पैशांची कमतरता भासते. शासनाने शेतकऱ्यांना कर्ज लवकरात लवकर मिळावे यासाठी कृषी कर्ज मित्र हि योजना देखील सुरु केलेली आहे. काही कारणास्तव बँकेचे कर्ज न मिळाल्यास शेतकरी खाजगी सावकारांकडून कर्ज्ज काढतात आणि शेतीची कामे उरकून घेतात. ज्या पद्धतीने मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून काढलेल्या कर्जापोटी कर्ज माफी देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने इतर जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना देखील अशीच सुविधा दिली तर नक्कीच त्यांना लाभ होईल.
बँकेचे कर्ज मिळविण्यासाठी कृषी कर्ज मित्र योजनेचा लाभ घ्या.
शेतीसाठी बँकेचे कर्ज काढण्यासाठी अनेक कागदपत्रे जोडावी लागतात आणि ती बँकेत सादर करावी लागतात. मित्रांनो परंतु आता शासनाने कृषी कर्ज मित्र योजना सुरु केलेली आहे ज्यामध्ये शेतकरी बांधवांना कर्ज घेण्यासाठी सर्व कागदपत्रे कृषी मित्र जमा करणार आहेत. या योजनेमुळे शेतकरी बांधवाना लवकर कर्ज मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नक्की या कृषी मित्र योजनेचा लाभ घ्या आणि शेतीसाठी कर्ज मिळवा.
आमच्या खालील ग्रुपमध्ये सामील व्हा.
शेती संबधित विविध शासकीय योजनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या खालील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा जेणे करून एखादी शासकीय योजना आली तर त्या संबधित माहिती तुमच्या मोबाईलवर अगदी मोफत मिळेल.