Covid 19 relief fund मिळणार ५० हजार असा करा ऑनलाईन अर्ज

Covid 19 relief fund मिळणार ५० हजार असा करा ऑनलाईन अर्ज

आजच्या या लेखामध्ये covid-19 relief fund application online 2021 maharashtra म्हणजेच ज्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल अशा व्यक्तींना ५० हजार रुपये अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये कोविड १९ रिलीफ फंड ऑनलाईन अर्ज संदर्भात अगदी A to Z माहिती दिलेली आहे त्याच प्रमाणे हा ऑनलाईन अर्ज कसा भरावा लागतो या संदर्भातील व्हिडीओ देखील या लेखाच्या शेवटी देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ बघून सुद्धा तुम्ही हा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

कोरोनाचे सर्टिफिकेट ऑनलाईन डाउनलोड कसे करावे हे जाणून घेण्यासाठी येथे टच करा.

covid 19 relief fund application संदर्भातील शासन निर्णय बघा.

महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या व्यक्तीचे कोविड १९ या आजारामुळे निधन झालेले आहे त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकास ५० हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर खालील बटनावर टच करा.

covid 19 relief fund सानुग्रह अनुदान मिळविण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र असणार आहे.

 • RT-PCR /Molecular Tests/RAT या चाचण्या केल्यानंतर ज्या व्यक्ती कोव्हिड १९ संक्रमित होत्या आणि त्या व्यक्तीचा किंवा याक्तींचा कोव्हिड १९ मुळे मृत्यू झालेला आहे अशा व्यक्ती यासाठी पात्र ठरणार आहे.
 • वरील चाचण्या केल्यानंतर ३० दिवसाच्या आत अशा व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा कोव्हिड १९ चे निदान झाल्यानंतर या रोगाच्या भीतीपोटी एखाद्या व्याक्तीनेफ आत्महत्या केली असेल तर अशा व्यक्ती देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार ५ लाख घरे.

५०,००० रुपये सानुग्रह अनुदान मिळविण्यासाठी नियम व अटी वाचून घ्या.

वरील प्रमाणे ठळक निकष या योजनेच्या पात्रतेसाठी आहेत. याव्यतिरिक्त अजूनही बरेच निकष या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत तुम्ही ते सविस्तर वाचू शकता. जी आर डाउनलोड करण्याची लिंक वर देईलेली आहे त्यावर टच करून किंवा क्लिक करून जी आर डाउनलोड करून घा आणि ५०,००० रुपये सानुग्रह अनुदान पात्रतेच्या अटी व नियम वाचून घ्या आणि मगच covid-19 relief fund application भरण्यास सुरुवात करा.

अशी करा आता ऑनलाईन सातबारा दुरुस्ती

सानुग्रह अनुदान मिळविण्यासाठी करावा लागेल ऑनलाईन अर्ज.

२६ नोव्हेंबर २०२१ रोजी जो शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला होता त्यामध्ये या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लगणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती. बऱ्याच नागरिकांना हा प्रश्न पडला होता कि हे ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळविण्यासाठी शासनाच्या कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची लिंक कोणती असणार आहे हि आणि बरीच माहिती नागरिकांना हवी होती तर अगदी तीच माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. म्हणजेच covid-19 relief fund application संदर्भातील माहिती या ठिकाणी दिलेली आहे.

ठिबक तुषार सिंचन साठी मिळणार आता ७५ व ८० अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज.

महासंवाद वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती.

दिनांक १ डिसेंबर २०२१ रोजी महासंवाद वेबसाईटवर देण्यात आलेल्या ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळविण्यासाठी ज्या वेबसाईटवर अर्ज करावा लगणार आहे त्या वेबसाईटची लिंक देण्यात आलेली आहे. शासनाने Online web portal विकसित केले आहे. याच पोर्टलवर नागरिकांना कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वेबसाईटवर लॉगिन करावे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी येथे टच करा.

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या कोणकोणते कागदपत्रे लागणार.

 • अर्जदाराच्या आधारकार्डची प्रत.
 • आधारकार्डशी मोबाईल नंबर लिंक असावा.
 • ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीच्या आधारकार्डची छायांकित प्रत.
 • अर्जदाराचा आधार लिंक बँक खाते क्रमांक.
 • अर्जदाराच्या बँक खात्याच्या रद्द केलेल्या खात्याची प्रत.
 • ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याचे मृत्यू प्रमाणपत्र.
 • RT-PCR report ची कॉपी.

ऑनलाईन अर्जामध्ये खालील माहिती सादर करावी लागेल.

५०००० रुपये सानुग्रह अनुदान मिळविण्यासाठी जो अर्ज करावा लागणार आहे त्यामध्ये ढोबळपणे खालील माहिती सादर करावी लागणार आहे

 • कोरोनामुळे मृत झालेला व्यक्तीच्या नातेवाईकांची संपूर्ण माहिती.
 • मृत झालेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती.
 • मृत व्यक्तीचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे
 • अर्जदारांच्या बँकेचे तपशील.

असा करा ऑनलाईन अर्ज

 • तुमच्या कॉम्प्युटरच्या किंवा मोबाईलमधील ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करा. https://mahacovid19relief.in/
 • तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर कोव्हीड रिलीफची वेबसाईट ओपन होईल.
 • या वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर documents required, information, approved applications, register/sign in असे पर्याय दिसतील.
 • register/sign in क्लिक करा. त्यांनतर तुमचा मोबाईल नंबर टाका त्या नंबरवर otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि submit या बटनावर क्लिक करा.

लॉगीन झाल्यानंतर भरावयाची माहिती.

अर्जदाराने लॉगीन केल्यानंतर सर्वात अगोदर स्वतःची माहिती भरावयाची आहे हि माहिती खालील प्रमाणे असेल.

 • अर्जदाराला त्याचे आधार कार्ड अपलोड करावे लागणार आहे.
 • पहिले नाव.
 • दुसरे नाव.
 • लिंग.
 • जन्मतारीख.
 • पत्ता.

वरील सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर Save and continue या बटनावर क्लिक करा.

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीची माहिती.

ऑनलाईन अर्जाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जी व्यक्ती कोरोनामुळे मृत झालेली असेल त्या व्यक्तीची माहिती या ठिकाणी अर्जदाराला भरावयाची आहे. हि माहिती खालीलप्रमाणे सादर करावी लागणार आहे.

 • मृत व्यक्तीचे नाव.
 • मरण पावल्याचा दिनांक.
 • मृताचे आधार कार्ड उपलब्ध असेल तर yes या बटनावर क्लिक करा किंवा नसेल तर no या बटनावर क्लिक करा.
 • मृत व्यक्तीचे आधार कार्ड अपलोड करा.
 • मृताचे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करा.
 • दिलेल्या यादीमधून जिल्हा किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडा.
 • मृत व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक टाईप करा.
 • कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करा.
 • मृत्युच्या कारणाचे प्रमाणपत्र आहे का? असेल तर yes बटनावर क्लिक करा आणि नसेल तर no या बटनावर क्लिक करा.
 • मृत व्यक्तीचे अजर्दार व्यक्तीची कोणते नाते आहे ते दिलेल्या यादीमधून निवडा.
 • self declaration मध्ये दोन पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी पहिला पर्याय असेल मृत्यू कोरोनामुळे झाला आहे का आणि दुसरा पर्याय असेल कोरोनाचे निदान झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत भीतीपोटी आत्महत्या केली आहे का या ठिकाणी yes आणि no असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी योग्य पर्याय निवडा.
 • सर्वात शेवटी प्रोसिड या बटनावर क्लिक करा.
covid-19 relief fund application

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे डीटेल्स सादर करा.

अर्जाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे काही तपशील ऑनलाईन अर्ज करतांना सादर करावे लागणार आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.

 • मृताच जन्मदिनांक ( असल्यास टाकावा )
 • मृत्यू प्रमाणपत्र क्रमांक ( हे देखील असल्यास टाकावे )
 • मृताचे लिंग.
 • पत्ता.
 • कोरोनाचे निदान झाल्याचा दिनांक.
 • कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दिनांक.
 • कोरोनाचे निदान झाल्यानंतर किती दिवसात मृत्यू झाला तो दिनांक टाका.

मृताचे खालील कागदपत्रे अपलोड करा.

 • RT PCR प्रमाणपत्र अपलोड करा.
 • RAT प्रमाणपत्र.
 • Clinical Diagnosis.

वरीलप्रमाणे प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत. शिवाय मृत पावलेल्या व्यक्तीचा अपघात, विषप्रशासन किंवा कसलीही हत्या झालेली नाही असे प्रतिज्ञापत्र या ठिकाणी द्यावे लागणार आहे.

दवाखान्यासंबधी माहिती.

 • मृत व्यक्ती दवाखान्यामध्ये दाखल केली होती का? असेल तर होय नसेल तर नाही या बटनावर क्लिक करा.
 • दवाखान्यामध्ये दाखल केल्याची तारीख टाका.
 • जो डॉक्टर उपचार करत होते त्यांचे नाव टाका.
 • ज्या दिवशी दवाखान्यातून सुट्टी झाली तो दिनांक टाका.
 • डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर टाका नसल्यास सोडून द्या.
 • ज्या ठिकाणी कोरोना पेशंटचा मृत्यू झाला ते ठिकाणचे नाव टाका.
 • दवाखान्याचे नाव.
 • रीपोर्ट बेसिस.
 • इतर काही कागदपत्रे असतील तर त्यांची नावे टाका आणि ती कागदपत्रे अपलोड करा.
 • सर्व माहिती भरल्यानंतर save and continue  या बटनावर टच करा.
 • जसे हि तुम्ही save and continue  या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला एक application Id मिळेल तो सांभाळून ठेवा.

अशा पद्धतीने तुम्ही ५०००० रुपये सानुग्रह अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *