कुक्कुट पालन योजना सुरु झाली असा करा ऑनलाइन अर्ज.

कुक्कुट पालन योजना सुरु झाली असा करा ऑनलाइन अर्ज.

शेतकरी बांधवांनो कुक्कुट पालन योजना सुरु झालेली आहे. ज्यांना कुक्कुट पालन करण्याची इच्छा आहे त्यांनी लगेच यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत कारण अर्ज करण्याची प्रोसेस सुरु झालेली आहे.

ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आहे त्यामुळे तुमचा व्यवसाय सुरु होईलच परंतु इतर बेरोजगार तरुणांच्या हाताला पण काम मिळेल. कुक्कुट पालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ बघून सुद्धा तुम्ही त्या प्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकता.

हा लेख पण वाचा कुक्कुटपालन योजनेसाठी मिळणार ५.२५ लक्ष अनुदान

कुक्कुट पालन योजना संदर्भातील इतर महत्वाची माहिती.

या ठिकाणी आपण कुक्कुट पालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती जाणून घेणारच आहोत त्या व्यतिरिक्त इतर अधिकची देखील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ग्रामीण कुक्कुट पालन व्यवसाय खूप लोकप्रिय होत आहे याचे कारण म्हणजे अगदी थोड्या भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरु करता येतो आणि यामध्ये नफा देखील चांगला मिळतो.

हे देखील वाचा शेळी पालन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणे सुरु

ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी कुक्कुट पालन योजना फायद्याची.

कोंबडीची अंडी असोत किंवा मास ग्रामीण भागामध्ये याला खूप मोठी मागणी असते. कोरोना काळात अंडी आणि कोंबडीच्या मासास प्रचंड मागणी होती यामुळे कोंबड्याच्या विक्रीत खूप मोठी वाढ झाली.

कुक्कुटपालन व्यावसायिक या व्यवसायामुळे नफ्यामध्ये आहे. कुक्कुट पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे असते.

गरिबांना मिळणार ५ लाख घरे

कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण घेवून प्रशिक्षित व्हा.

मित्रांनो कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्या व्यवसायातील बारकावे माहित असणे खूपच गरजेचे असते. कोंबड्याचे आजार, त्यांचे खाद्य, मार्केट इत्यादी बाबींचा अगोदर अभ्यास करणे गरजेचे आहे. कुक्कुटपालन संबधित प्रशिक्षण घेतले तर अधिक चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करता येवू शकतो.

कुक्कुट पालन व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर बँका सुद्धा व्यवसाय करण्यासाठी कर्ज देऊ शकतात तसेच शासनाच्या कुक्कुट पालन योजनामध्ये देखील याचा लाभ होऊ शकतो.

विविध शासकीय योजनांची मोफत माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या टेलीग्रामग्रुप मध्ये जॉईन व्हा. येथे टच करा.

कुक्कुट पालन योजना

कुक्कुट पालन योजना ऑनलाईन अर्ज

कुक्कुट पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. हा अर्ज करण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

  • कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये https://ah.mahabms.com/webui/registration असा वेब ॲड्रेस टाईप करा.
  • जसे हि तुम्ही वरील वेब ॲड्रेस तुमच्या कॉम्प्युटरमधील ब्राउजरमध्ये टाईप कराल त्यावेळी स्क्रीनवर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर अनेक पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
  • नोंदणीचा अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल त्या ठिकाणी जी माहिती विचारली जाईल त्या प्रमाणे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा.
  • इतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्जदाराने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी दिलेल्या फॉरमॅटमध्ये आणि योग्य साईजमध्ये अपलोड करायची आहे.
  • फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर राशन कार्डवर जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड नंबर आणि इतर माहिती दिलेल्या चौकटीमध्ये टाकायची आहे. जो अर्जदार आहे त्याने त्याचे स्वतःचे नाव वगळून इतर सदस्याची माहिती टाकावी अशी सूचना ah.mahabms.com या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
  • वरील सर्व माहिती टाकल्यानंतर जसे हि तुम्ही जतन करा या पर्यायावर क्लिक कराल त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर पाठविला जाईल. तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
  • लॉगीन केल्यानंतर काही माहिती या ठिकाणी तुम्हा प्रश्नांच्या स्वरुपात विचारली जाईल त्यांचे व्यवस्थित उत्तरे द्या आणि अर्ज जतन करा.
  • अर्ज जतन झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • हा अर्ज कसा भरावा लागतो याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील अर्जाचा व्हिडीओ पहा या बटनावर क्लिक करून व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे अर्ज भरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *