शेतकरी बंधुंनो पीएम किसान सम्मान निधीचा पुढील हफ्ता मिळविण्यासाठी pm kisan ekyc कशी करावी लागणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत. पीएम किसान सम्मान निधीचा पुढील हफ्ता मिळविण्यासाठी ekyc करणे खूपच गरजेचे ठरणार आहे आणि त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या पेजच्या सर्वात शेवटी pm kisan ekyc व्हिडीओ दिलेला आहे तो सुद्धा बघा जेणे करून तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती समजेल.
कोणाला मिळाले pm kisan samman nidhi चे पैसे जाणून घ्या तुमच्या मोबाईलवर संपूर्ण माहिती.
pm kisan ekyc करणे मोदीचा ४००० चा हफ्ता मिळविण्यासाठी आवश्यक.
अनेक शेतकरी बांधवाना पीएम किसान सम्मान निधीचा सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास मोदीचा ४००० चा हफ्ता मिळत आलेला आहे. परंतु आता यापुढे जर मोदीचा ४००० चा हफ्ता मिळवायचा असेल म्हणजेच पीएम किसान सम्मान निधीचा लाभ घ्यायचा असेल तर pm kisan या वेबसाईटवर जावून ekyc करणे गरजेचे ठरणार आहे.
PM kisan ekyc मोबाईलवरून देखील करता येणार
तुमच्याकडे जर स्मार्ट फोन असेल तर हि pm kisan ekyc तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. तर हि पीएम किसान इकेवायसी मोबाईलवरून कशी करावी लागते या संदर्भात अगदी डीटेल्समध्ये माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जावून सुद्धा हि इकेवायसी करू शकता.
मोबाईलद्वारे पीएम किसान इकेवायसी करण्याची पद्धत.
- तुमच्या मोबाईल मधील वेबब्राउजर उघडा.
- वेब ब्राउजरच्या युआरएल बारमध्ये https://pmkisan.gov.in/ हा web adress टाका आणि सर्च करा.
- जसे हि वरील वेब ॲड्रेस तुमच्या ब्राउजरमध्ये सर्च कराल त्यावेळी PM kisan samman nidhi ची वेबसाईट तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ओपन होईल.
- वेबसाईट ओपन झाल्यावर या पेजला तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे. जसे तुमी खाली स्क्रोल कराल या ठिकाणी तुम्हाला Farmers corner मध्ये eKYC हा पर्याय दिसेल.
- eKYC हा पर्यायावर क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाकून सर्च करायचे आहे.
- जसे हि तुम्ही सर्च कराल तेंव्हा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या pm kisan samman nidhi संदर्भातील ekyc releted माहिती दिसेल त्या प्रमाणे तुमचे ekyc करून घ्या.
सीएससी सेंटरद्वारे पीएम किसान इकेवायसी करण्याची पद्धत
- तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये pmkisan.gov.in टाका आणि सर्च करा.
- तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पीएम किसान सम्मान निधीची वेबसाईट ओपन झालेली असेल.
- पीएम किसान सम्मान निधीची वेबसाईट ओपन झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला CSC login हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- वरील पर्यायावर क्लिक करताच तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर Digital Seva web portal ओपन होईल.
- या ठिकाणी तुमचा युजर आयडी पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.
- या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यापैकी OTP/ Biometric Adhar Authentication या पर्यायावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी pm kisan ekyc प्रोसेस चालू होईल.
वेबसाईटला सध्या प्रोब्लेम सुरु आहे.
मित्रांनो सध्या म्हणजे ज्या डेटला हा आर्टिकल लिहिला जात आहे त्या तारखेला हि ekyc होत नसेल तर हा pm kisan samman nidhi वेबसाईटला सध्या प्रोब्लेम सुरु आहे हे समजून जा. परंतु जेंव्हा हा प्रोब्लेम सोल्व्ह होईल त्यावेळी अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला pm kisan ekyc करायची आहे हे लक्षात असू द्या.
अनेक शेतकरी बांधवांना योजनांची माहितीच न मिळण्याची शक्यता.
शेतकरी बांधवांसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात परंतु अनेक शेतकरी बांधवांना या शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही आणि याचे कारण म्हणजे त्यांना या योजनांची माहिती नसणे हे देखील एक कारण असू शकते. कोणताही शेतकरी केवळ माहिती नसल्याच्या कारणास्तव शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी आम्ही whatsapp group बनविलेला आहे ज्यामध्ये तुम्ही सामील होऊ शकता आणि विविध शासकीय योजनांची माहिती अगदी तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता अगदी मोफत.
आमच्या whatsapp group मध्ये सहभागी होण्यासाठी येथे टच करा.