महाराष्ट्रामध्ये मागील ७ वर्षापासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली गेली होती परंतु आता जे बैलगाडा शर्यतप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यत बंदी उठविली आहे. बैलगाडा शर्यत बंदी संदार्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाची बातमी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी त्यांचा ट्विटर अकाउंट वरून दिलेली आहे. या संदर्भातील माहिती शासनाच्या महासंवाद या संकेतस्थळावर देखील देण्यात आलेली आहे.
या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा
बैलगाडा शर्यत बंदी उठ्विल्याची मंत्री सुनील केदार यांची माहिती.
महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत खूपच लोकप्रिय होती परतू यावर मागील काही वर्षापासून बंदी आणली गेली होती. या बैलगाडाशर्यत बंदी उठवावी यासाठी राज्यशासनाने वेळोवेळी प्रयत्न केले असल्याचे मत मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले आहे. ज्या शेतकरी बांधवांना बैलगाडाशर्यत सुरु व्हावी असे वाटत होते त्यांच्यासाठी नक्कीच हि आनंदची बातमी ठरणार आहे.
बैलगाडा शर्यत बंदी उठविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद.
शेतकरी आणि बैल यांचे खूप जिव्हाळ्याचे नाते असते. शेतीमध्ये राबणे असो किंवा मग पोळा या सणामध्ये बैलांची मिरवणूक काढणे असे शेतकरी बांधव आपल्या बैलांच्या बाबतीत खूपच संवेदनशील असतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बैलगाडाशर्यत जिंकणे म्हणजे खूप मोठा सन्मान मिळविल्याची भावना निर्माण होते आणि यामुळेच बैलगाडाशर्यत पुन्हा एकदा नव्याने सुरु होणार असल्याने नक्कीच शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर नवीन हास्य पुलणार आहे.
आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. येथे टच करा.
ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा बैल शर्यतीचा धुरळा उडणार
बैलगाडा शर्यतीमुळे मुक्या जनावरांवर अन्याय होते असे काही मत निर्माण झाले होते त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्यात आली होती परंतु आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यामुळे अनेक गावामध्ये बैलगाडा शर्यती पुन्हा एकदा पहावयास मिळणार आहेत. त्यामुळे गावपातळीवर पुन्हा एकदा बैल शर्यतीचा धुरळा उडणार आहे.
बैलगाडा शर्यतीचा थरार.
ग्रामीण भागामध्ये बैलगाडा शर्यत म्हणजे रोमांचकरी खेळ. बैलगाडा शर्यतीमध्ये जे बैल आणले जातात ते अगदी चपळ आणि धावणारे असतात. ज्या ठिकाणी बैलगाडाशर्यत आयोजित केली जाते त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी जमेली असते. शिवाय त्या ठिकाणी वेगवेगळी दुकाने थाटलेली असतात. थोडक्यात एक वेगळाच महोल बैलगाडा शर्यतीसाठी निर्माण होत असतो. हाच अनुभव पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाना अनुभवता येणार आहे.