शेळी गट वाटप कुक्कुट पालन व दुधाळ गाई साठी अर्जाची मुदत वाढली.

शेळी गट वाटप कुक्कुट पालन व दुधाळ गाई साठी अर्जाची मुदत वाढली.

सध्या शेळी गट वाटप, कुक्कुटपालन, दुधाळ जनावरांचे वाटप यासाठी पशुसंवर्धन विभागांच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. अनेक शेतकरी बांधवानी शेळी पालन योजना तसेच कुक्कुटपालन व इतर योजनांसाठी त्यांचे अर्ज भरण्यास सुरुवात केलेली आहे.

ग्रामीण भागामध्ये सध्या शेळी पालन व्यवसाय खूपच लोकप्रिय आहे त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांनी शेळी पालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज देखील सादर करत आहेत.

पशु संवर्धन विभागाच्या वतीने शेळी गट वाटप, दुधाळ जनावरांचे गट वाटप व कुक्कुट पालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२१ देण्यात आली होती परंतु अनेक शेतकरी बांधव अजूनही करण्यास इच्छुक आहेत.

अनेक शेतकरी बांधव शेळी गट वाटप योजनांचे अर्ज करण्यास इच्छुक असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आता वाढवून दिलेली आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दिनांक २० डिसेंबर २०२१ हि शेवटची तारीख दिलेली आहे. ज्या शेतकरी बांधवानी त्यांचे शेळी गट वाटप योजनेचे अर्ज अजूनही ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले नाहीत त्यांनी २० डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज सादर करावेत.

पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढल्याची सूचना https://ah.mahabms.com/ या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवानी त्यांचे ऑनलाईन अर्ज अजूनही सादर केले नसेल अशा बांधवांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

शेळी गट वाटप

शेळी पालन योजनेचा व्हिडीओ पहा.

शेतकरी बंधुंनो तुम्हाला जर माहित नसेल पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावून शेळी गट वाटप, कुक्कुटपालन योजना किंवा दुधाळ जनावरांचे गट वाटप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण तुम्हाला मी या ठिकाणी एक व्हिडीओ देत आहे तो व्हिडीओ बघून तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

शेळी पालन योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी येथे टच करा.

शासनाच्या अनेक योजना येतात आणि जातात परंतु शेतकरी बांधवांना या योजनांची माहिती नसण्याची शक्याता नसते. शेतकरी बांधवाना शासनाच्या योजनांची माहिती मिळाली नाही कि मग ते अशा शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते. शेतकरी बांधवाना विविध शासकीय योजनांची मोफत माहिती मिळवी यासाठी आम्ही whatsapp group तसेच टेलिग्राम ग्रुप मिर्माण केला आहे.

आमच्या whatsapp group व टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन झाल्यास तुम्हाला विविध शासकीय योजनांची मोफत माहिती अगदी तुमच्या मोबाईलवर मिळू शकेल त्यामुळे तुम्हाला जर आमच्या ग्रुपमध्ये सामील होण्याची इच्छा असेल तर खालील बटनावर टच करून तुम्ही जॉईन होऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *