पीएम किसान १०वा हफ्ता या तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

पीएम किसान १०वा हफ्ता या तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी बांधव पीएम किसान १०वा हफ्ता कधी मिळेल याकडे मोठ्या आतुरतेने वाट बघत होते परंतु पीएम किसान सम्मान निधीचा १० वा हफ्ता या बाबत तारीख कोणालाच माहित नव्हती त्यामुळे pm kisan samman nidhi मिळेल तरी केंव्हा या संभ्रमात शेतकरी बांधव होते. पीएम किसान सम्मान निधीचा १० वा हफ्ता कसा मिळणार आहे या संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे तो व्हिडीओ सुद्धा बघा.

हा लेख पण वाचा असा करा कांदाचाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

पीएम किसान १०वा हफ्ता संदर्भात शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली असून हा pm किसान सम्मान निधीचा १० वा हफ्ता कधी मिळणार आहे याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. हा हफ्ता शेतकरी बांधवांना कधी मिळणार आहे हि आणि या संदर्भातील माहिती शासनाने कोणत्या वेबसाईटवर दिलेली आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

आमच्या टेलीग्राम ग्रुपची लिंक                     

शेतकरी बांधवांना पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत शासनाकडून मानधन मिळत असते. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना या पीएम किसान सम्मान निधीच्या म्हणजेच मोदीच्या हफ्त्याचा खूप फायदा होत असतो.

पीएम किसान १०वा हफ्ता

आजच्या महागाईच्या काळात पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना मिळत असलेली हि मदत कमी जरी असली तरी नक्कीच यामुळे शेतकरी बांधवाना आर्थिक सहाय्यता होत आहे एवढे मात्र नक्की.

पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ मिळविणे निरंतर चालू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in/  या वेबसाईटवर जावून त्यांची ekyc करावी लागणार आहे. सध्या तरी सर्वांचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच ज्यांनी ekyc केली असेल त्यांना आणि केली नसेल त्यांना देखील हा १० वा हफ्ता मिळणार आहे.

या तारखेला मिळेल पीएम किसान १०वा हफ्ता

दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोडी यांच्या हस्ते १० कोटी pm kisan लाभार्थ्यांना १० व्या हफ्त्याचे हस्तांतरण केले जाणार आहे. या संदर्भातील माहिती https://pmevents.ncog.gov.in/ या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

अधिकृत माहितीची लिंक

तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांची पी एम किसान सम्मान निधी संदर्भातील आतुरता संपलेली असून नक्कीच यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल यात शंका नाही.

या योजनेचा भविष्यात देखील लाभ घ्यावयाचा असेल तर  https://pmkisan.gov.in/  या वेबसाईटवर जावून शेतकरी बांधवानी त्यांची ekyc नक्की करून घ्यावी जेणे करून पी एम किसान सम्मान निधी मिळविण्यास अडचण निर्माण होणार नाही.

pm kisan ekyc कशी करावी लागते हे जाणून घेण्यासाठी येथे टच करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *