नवीन विहीर योजना खोदकाम बांधकामसाठी निधी आला असा करा अर्ज

नवीन विहीर योजना खोदकाम बांधकामसाठी निधी आला असा करा अर्ज

शेतकरी बांधवांनो नवीन विहीर योजना अंतर्गत खोदकाम बांधकाम व इतर योजनेसाठी 108.73224 कोटी निधी वितरीत करण्याचा शासन निर्णय म्हणजेच जी आर दिनांक १७ डिसेंबर रोजी आलेला आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शिवाय ऑनलाईन अर्ज भरण्याचा व्हिडीओ देखील या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे तो व्हिडीओ पाहून देखील तुम्ही अर्ज सादर करू शकता.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

या तारखेला होणार पीएम किसान १०वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा.

शेती म्हटली आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते म्हणजे पाण्याचे. शेतीला पाणी असणे खूपच आवश्यक आहे जर नसेल तर खात्रीशीर उत्पन्न घेण्यास फार मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी विहीर खोदतात आणि विहिरीद्वारे पाणी देऊन शेतीचे उत्पन्न वाढवितात.

आमच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये मोफत जॉईन व्हा

अनेक शेतकरी बांधवांकडे विहीर खोदण्यासाठी पुरेसे पैसे नसतात त्यामुळे त्यांची जमीन कोरडवाहू राहते. नवीन विहीर खोदकाम, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअर व इत्यादीसाठी शासकीय अनुदान मिळते. नवीन विहीर योजना अंतर्गत अनुदानाचा लाभ घेवून शेतकरी त्यांची शेती सिंचनाखाली आणू शकतात.

नवीन विहीर योजना

जुनी विहीर दुरुस्ती त्याचप्रमाणे नवीन विहीर खोदकाम किंवा इनवेल बोअर करण्यासाठी जर शेतकऱ्याला शासकीय अनुदान हवे असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना mahadbt पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा करावा या संदर्भात देखील आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

विहीर अनुदान योजना संपूर्ण माहिती

नवीन विहीर योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी शासनाकडून निधी दिला जातो. या योजनेसाठी अगोदरच ६० टक्के निधी वितरीत केलेला आहे.

उर्वरित निधी ४० टक्के निधी म्हणजेच रु.108.73224 कोटी निधीच्या प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नुकताच म्हणजेच दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे.

नवीन विहीर योजना संदर्भात Mahadbt पोर्टलवर करा ऑनलाईन अर्ज

या योजनेसाठी Mahadbt पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येते हा अर्ज करण्याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.

  • गुगल सर्चमध्ये mahadbt shetkari वेब पोर्टल असा कीवर्ड टाका.
  • युजरआयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा.
  • अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
  • अनुसूचित जाती व जमातीप्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी योजना या पर्यायासामोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन विहीर बांधकाम किंवा जुनी विहीर दुरुस्ती व इतर कोणत्याही योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा उद्देश.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महाराष्ट्रामध्ये राबविली जाते. नवीन विहीर योजना संदर्भात Mahadbt पोर्टलवर नवबौद्ध तसेच अनुसूचित जाती वर्गाचे लाभार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

शेतकरी बंधुंनो अशा पद्धतीने तुम्ही विहीर खोदकाम, बांधकाम किंवा दुरुस्ती योजनेसाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अर्ज करू शकता आणि या नवीन विहीर योजनेचा लाभ घेवून शेतामध्ये जास्त उत्पन्न काढू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *