फळपीक विमा योजना 2020-21 निधी वितरीत जी आर आला.

फळपीक विमा योजना 2020-21 निधी वितरीत जी आर आला.

तुमच्याकडे फळबाग असेल तर तुम्हाला मिळणार आहे फळपीक विमा योजना 2020-21 आंबिया बहारचा लाभ. महाराष्ट्रातील बरेच शेतकरी बांधव फळबाग लागवडीकडे वळलेले आहेत. कापूस मका उडीद मुग सोयाबीन या पिकांचा विमा शेतकऱ्यांनी काढला होता आणि त्या बदल्यात काही ठिकाणी त्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे.

या तारखेला मिळणार पीएम किसान सम्मान निधी

अशाच प्रकारे काही शेतकरी बांधवानी त्यांच्या फळ बागेचा फळपीक विमा योजना 2020-21 अंतर्गत विमा काढलेला होता. तर अशा शेतकऱ्यांना आता फळपीक विमा लवकरच मिळू शकतो.

कारण पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार सन २०२० २१ मध्ये राज्य हिस्याची रक्कम पिक विमा कंपनीस देण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आलेली  आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

हा लेख पण वाचा असा करा सौर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

शेतकऱ्याच्या फळ पिकास हवामानापासून कोणताही धोका उद्भवू नये आणि जर उद्भवलाच तर त्यासाठी फळ पिक विमा काढला जातो. फळपिक विमा काढला असेल आणि फळबागेचे हवामानामुळे नुकसान झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्यास मदत होते.

फळपीक विमा योजना

विविध शासकीय योजनांची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. येथे टच करा.

नैसर्गिक आप्पातीमुळे शेतकऱ्यांच्या फळबागेचे खूप मोठे नुकसान होते. यामुळे शेतकरी नैराश्यामध्ये जावू शकतात आणि त्यांचा शेती व्यवसायातील आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

आमच्या whatsapp group ची लिंक

याच बाबींचा विचार करून जर शेतकऱ्यांच्या फळबागेचे नुकसान झाले तर त्यांना त्या बदल्यात नुकसान भरपाई मिळावी यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना सन २०२०-२१ साठी द्राक्ष, केळी आंबा, डाळिंब, काजू, मोसंबी, संत्रा या व इतर फळबाग पिकांसाठी पिक विमा योजना राबविण्यात आली. प्रायोगित तत्त्वावर यामध्ये स्ट्रॉबेरी फळ पिकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

फळपीक विमा योजना जी आर पहा.

महाराष्ट्र राज्य शासन विमा हफ्ता पोटी ४१,७५,२४,८१६ इतकी तर आंबिया बहार गारपीटसाठी १०,४१,३२,०९७ अशाप्रकारे एकूण ५२,१६,५६,९१३ निधी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यासंदर्भात जी आर काढण्यात आलेला आहे. हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तर अशा प्रकारे फळपीक विमा योजना 2020-21 संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. विविध शासकीय योजना संदर्भातील माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप व whatsapp ग्रुपमध्ये तुम्ही सामील होऊ शकता. लिंक काही दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *