दवंडी देखील बदलणार या गावात बघा आता कशी दिली जाणार दवंडी

दवंडी देखील बदलणार या गावात बघा आता कशी दिली जाणार दवंडी

आता या गवत दवंडी देखील बदलणार जाणून घ्या अधिक सविस्तर माहिती. असा एकही व्यक्ती नाही ज्याला इंटरनेट किंवा स्मार्ट फोन बहुधा माहित नाही. ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी अपवाद असू शकतो परंतु शहरीभागा बरोबरच ग्रामीण भागामध्ये देखील इंटरनेट किंवा स्मार्ट फोन वापरणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रत्येकाच्या हातात आज स्मार्ट फोन आहे त्यामुळे महितीची देवाण घेवाण अत्यंत वेगवान पद्धतीने होत आहे. इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे माणसाचे आयुष्य बदलून गेले असले तरी काही गोष्ठी अजूनही बदलल्या नाहीत. या संदर्भातील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे टच करा

कलाकार योजनेचे अर्ज सुरु. अर्ज डाउनलोड करा pdf मध्ये

उदाहरणच द्यायचे झाल्यास ग्रामीण भागामध्ये काही सूचना द्यायची असेल तर संध्याकाळी किंवा सकाळी डफड्याद्वारे दवंडी देऊन गावात सूचना दिली जाते.

मित्रांनो या लेखाचा विषयच दवंडी आहे त्यामुळे आपण सरळ मुद्यालाच हात घालुयात. भोकरदन तालुक्यातील कोळेगाव या गावामध्ये गावकरी एकत्र एवून एखादा निर्णय घेतात आणि त्याची सूचना गावकऱ्यांना होण्यासाठी गावामध्ये डफड्याद्वारे दवंडी देतात.

मित्रांनो आजही बऱ्याच गावामध्ये डफड्याद्वारे दवंडी देण्याची परंपरा चालत आलेली आहे. काही गावामध्ये हि प्रथा नसेल परंतु अनेक गावत हीच प्रथा आहे.

या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली.

राहुल शालिकराव साळवे हा युवक कोळेगाव या गावामध्ये डफड्याद्वारे दवंडी देण्याचे काम करतो. पारंपारिक पद्धतीने दवंडी देऊन राहुल कंटाळलेला आहे. सगळेच लोक स्मार्ट होत आहेत मग आपण का मागे राहावे हा विचार त्याला सारखा सतावत होता. मग त्याच्या डोक्यामध्ये आली एक भन्नाट कल्पना ती म्हणजे हँडी लाऊड स्पीकरची.

आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक. मोफत जॉईन व्हा.

राहुलने फ्लिप कार्टवरून हँडी लाऊड स्पीकर मागविलेला आहे आणि त्याद्वारे तो दवंडी देण्याचे काम करणार आहे. राहुल याविषयी काय म्हणाला हे त्याच्याच शब्दात जाणून घेवूयात.

आधुनिकतेची कास धरत दवंडी देखील बदलणार

दवंडी देण्यासाठी मला खूप अडचण येत होती ( म्हणजे प्रत्येक ठिकाणी डफडे वाजवावे लागत होते.) लोकांना काहीतरी नवीन हवे असते त्यामुळे मी हा माईक मागविलेला आहे. गावातील पंच कमेटी, सरपंच किंवा इतर अधिकाऱ्यांच्या काही सूचना असतील तर त्या या माईकद्वारे लोकांना समजण्यास सोपे जाईल.

दवंडी देखील बदलणार

राहुलची हि कल्पना खूपच वेगळी आहे यावरून तंत्रज्ञानाची जादू कळून जाते. राहुलचे उदाहरण हे दाखवून जाते कि कोणत्याही क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान वापरले जावू शकते. राहुलच्या या तंत्रज्ञानामुळे कोळेगावमधील डफड्याद्वारे दवंडी देण्याची परंपरा लोप पावते की काय हि देखील शंका नाकारता येत नाही.

आपण कितीही परंपरावादी असलो तरी एक दिवस आपल्याला आधुनिकतेची कास धरल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि जर आपण प्रवाहाच्या सोबत गेलो नाही तर कदाचित आपण इतरांपेक्षा खूप मागे फेकले जावू हि देखील शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *