आज आपण घरगुती महिला उद्योग कसा केला जातो त्याच प्रमाणे ग्रामीण भागातीलच एका महिलेने शून्यातून कशाप्रकारे मसाले उद्योग केला याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.
ग्रामीण भागात तसेच शहरी भागातसुद्धा बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. ग्रामीण भाग असो कि शहरी भाग प्रत्येकाला नोकरी करण्याची प्रचंड इच्छा असते. नोकरीच्या वाढलेल्या स्पर्धेमुळे ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. उषाताई यांचा व्हिडीओ बघा.
हा लेख पण वाचा उद्योग कर्ज योजना
ग्रामीण भागामध्ये अनेक उद्योग करायला वाव आहे. जर एखाद्या बेरोजगार तरुणाने ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय सुरु केलाच तर त्यामुळे तुम्हाला रोजगार तर मिळेलच पण गावातील इतर बेरोजगारांना देखील रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
घरगुती महिला उद्योग ग्रामीण भागामध्ये करता येणारे उद्योग
वाढत्या बेरोजगारीच्या काळात सुद्धा ग्रामीण भागामध्ये अनेक उद्योग करण्यासारखे आहेत. ग्रामीण भागामध्ये तुम्ही शेळी पालन, कुकुट पालन, मसाला उद्योग असे अनेक प्रकारचे उद्योग करू शकता.
कोणताही उद्योग करायचा असेल तर त्यासाठी त्या उद्योगाचे ज्ञान असणे आवश्यक असते ज्यामुळे तुम्ही तुमचा उद्योग योग्य उंचीवर नेऊ शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आजू बाजूच्या यशस्वी उद्योजकाच्या यशोगाथा वाचू शकता आणि आपला उद्योग योग्य उंचीवर नेऊ शकता.
मसाला उद्योगातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती
मसाला उद्योगामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते हे एका महिलेने दाखवून दिलेले आहे. ग्रामीण भागामध्ये मांसाहार करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.
पुढील लेख पण वाचा व्यवसाय कर्ज योजना
त्याचप्रमाणे दैनंदिन जेवणामध्ये देखील मसाले खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. जेवण रुजकर आणि स्वादिष्ट बनण्यासाठी मसाल्यांची खूप गरज असते. त्यामुळे हि बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागात मसाले उद्योग चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो.
घरगुती महिला उद्योग रोजगार निर्मितीसाठी प्रेरणा
ग्रामीण भागात आज अनेक तरुण तसेच महिला सुद्धा नव नवीन व्यवसाय किवा उद्योग प्रशिक्षण घेऊन उद्योग उभारत आहेत. त्यामुळे त्यांना रोजगार तर मिळत आहेच पण ते अनेकांना रोजगार देत आहेत. ग्रामीण भागामध्ये निर्माण होणारी रोजगार निर्मिती बेरोजगारांसाठी प्रेरणा ठरत आहे.
ग्रामीण भागामध्ये मसाले व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या अशाच एका व्यक्तीमत्वाद्द्ल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. ग्रामीण भागातील उषाताई यांनी त्यांच्याच गावात मसाला उद्योग प्रचंड मेहनतीने सुरु केला आहे. उषाताईने शून्यातून कशा प्रकारे मसाला उद्योग यशस्वी केला हे त्याच्याकडूनच जाणून घेतले आहे ते डिजिटल डीजी टीमने.
बुलडाणा जिल्हामधील चिखली तालुक्यात हातनी हे छोटेसे गाव आहे. या ठिकाणी राहतात उषाताई सुनील पवार. उषा पवार या आगोदर सामुहिक कुटंबामध्ये राहत होत्या परंतु काही घरगुती कारणामुळे त्यांचे कुटुंब विभक्त झाले आणि त्या विभक्त कुटुंबामध्ये राहू लागल्या.
विविध शासकीय योजनांची मोफत माहिती हवी आहे मग आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
सुरुवातीला गावातून केली व्यवसायास सुरुवात
एकत्र कुटुंब असताना सगळा व्यवहार त्यांच्या घरातील वरिष्ठ मंडळी पाहत होती. विभक्त झाल्यानतर मात्र आपण कसे जगायचे आणि आपला उदरनिर्वाह कसा भागवायचा हा एकच प्रश्न उषाताई पवार यांना पडला.
ह्याच विवंचनेतून त्यांच्या लक्षात आल कि आपण हि काही व्यवसाय करावा आणि यामधून रोजगार ही मिळेल आणि जगण्यासाठी आर्थिक स्थैर्य देखील मिळेल. ह्या विचारातून त्यांनी मसाला उद्योग उभारण्याची मुहूर्तमेढ रोवली.
सुरुवातीला आपला उद्योग चालेल कि नाही असे त्यांना वाटले. प्रायोगिक तत्वावर त्यांनी एक किलो मसाला दळला आणि त्याची ५० ग्राम अशी पॅकिंग करून गावामध्ये विकायला सुरुवात केली.
या योजनेविषयी देखील जाणून घ्या. बिनव्याजी पिक कर्ज योजना
मसाले उत्पादनास गाव व परिसरात चांगली मांगणी
गावामध्ये मसाला विक्रीस चांगला प्रतिसाद मिळाला. हळूहळू मसाला प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली त्यामुळे त्यास मागणी वाढली. मसाला उद्योगाला मिळत असलेला हा प्रतिसाद पाहून उषाताई यांना अधिक प्रेरणा मिळत गेली.
उषाताई पवार ह्यांनी आपल्या मसाला उद्योगाला त्रिमूर्ती मसाला हे नाव दिले. उद्योग म्हंटल तर त्यासाठी जाहिरात करणे आणि विक्री करणे हे महत्वाचे असते. त्यासाठी त्यांचे पती म्हणजेच सुनील पवार आणि एक सहकारी घेऊन गावोगावी फिरून जाहिरात आणि विक्रीस सुरुवात केली.
संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये किराणा दुकानदार यांची मसाला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. दिवसेंदिवस त्यांचा उद्योग यशस्वी झाला आणि इतर महिलांना सुद्धा यामुळे उद्योग करण्याची प्रेरणा मिळत गेली.
त्यामुळे उद्योग करण्याची कल्पना तुम्हाला सुचली असेल आणि त्या दिशेने तुम्ही जर वाटचाल करायला सुरुवात केली तर तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता.
मसाले व्यवसायातून महिन्याला चांगली कमाई
मसाला उद्योगातून उषाताई पवार महिन्याला ३०००० ते ३५००० हजार रुपये कमवितात आणि ग्रामीण भागामध्ये हि नक्कीच अभिमानाची बाब आहे.
गावातील महिला बचत गट असतील तर ते सुद्धा अशा प्रकारे उद्योग उभारून ग्रामीण भागामध्ये रोजगार विविध व्यवसायातून रोजगार निर्माण करू शकतात.
हतनी या गावामध्ये तसेच गाव परिसरामध्ये उषाताई यांच्याकडे यशस्वी महिला उद्योजिका म्हणून बघितले जाते. नोकरी मिळत असेल तर नक्की करा परंतु केवळ नोकरीच पाहिजे असा तुमचा अट्टहास असेल तर तो चुकीचा आहे असे देखील सांगण्यास उषाताई विसरत नाही.
तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधा.
तुम्हाला जर उषाताईकडील मसाले हवे असतील तर मसाले ऑर्डर करण्यासाठी किंवा व्यवसायाची माहिती मिळविण्यासाठी तुम्ही उषाताई पवार यांच्याशी संपर्क साधू शकता.
सौ. उषा सुनील पवार मु.पो. हतनी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा.
मोबाईल नंबर 9665133649