उद्योग कर्ज योजना 2024  कर्ज मिळणे झाले सोपे असा करा ऑनलाईन अर्ज

उद्योग कर्ज योजना 2024 कर्ज मिळणे झाले सोपे असा करा ऑनलाईन अर्ज

जाणून घेवूयात उद्योग कर्ज योजना संदर्भात. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य शासनाला १५ हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

ज्या व्यक्ती शेळी पालन किंवा दुग्धव्यवसाय करतात त्यांना या व्यवसायाबरोबर दुध आणि प्रक्रिया उद्योग, सलग्न पशुखाद्य, मास निर्मिती, मुरघास उद्योग देखील सुरु करावा असा या योजनेचा उद्देश आहे.

९० टक्के कर्ज आणि 3 टक्के व्याज सवलतीची योजना नुकतीच पशुसंवर्धन विभागाद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे उद्योग कर्ज योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.

( हा पण लेख वाचा शेळी पालन गट वाटप योजनेसाठी अर्ज स्वीकारणे सुरु )

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्या संदर्भातील खालील खालील व्हिडीओ पहा

बेरोजगार तरुणांसाठी उद्योग कर्ज योजना लाभदायी ( government loan scheme )

शेतकरी बंधुंनो पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास या नवीन योजनेस केंद्र शासनाने २०२०-२१ मध्ये मान्यता दिली होती. परंतु या योजनेसाठी लागणारा जो निधी आहे १५ हजार कोटी तो निधी या वर्षी म्हणजेच २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाला देण्यात आलेला आहे.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास या योजनेअंतर्गत दुध प्रक्रिया उद्योग, (जसे कि आईसक्रिम, चीजनिर्मिती, दुध पाश्च्यरायझेशन, दुध पावडर) मास निर्मिती व प्रक्रिया, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, पशुखाद्य, मूरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचपरमेण व्याज दारामध्ये 3 टक्के सूट देण्यात येणार आहे.

( हा पण लेख वाचा उद्योग उभारणीसाठी मिळणार १० लाखापर्यंत कर्ज )

उद्योग कर्ज योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आणि पात्र व्यक्ती.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेसाठी अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

या साकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक कंपनी, खाजगी संस्थाहे सर्व या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ( हा पण लेख वाचा शेळी पालन योजनेसाठी मिळणार कर्ज )

ऑनलाईन अर्ज करण्याअगोदर अर्ज वाचून घ्या.

मित्रांनो पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेसाठी ऑनलाईन करण्या अगोदर या अर्जामध्ये तुम्हाला कोणकोणती माहिती भरायची आहे त्या संदर्भातील ऑनलाईन अर्ज नमूना pdf मध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे.

हि pdf फाईल तुम्ही Department of animal husbandry and dairying या वेबसाईटवरून देखील डाउनलोड करू शकता. त्या वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा. ( हा लेख पण वाचा पिक कर्जासाठी असा करा ऑनलाईन अर्ज )

योजनेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे लागणार आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते जाणून घ्या.

  • Detail project report (DPR) *
  • Ownership document*
  • Latest state pollution control board consent / approval for the proposed unit

Documents related to applicant / promoters

  • PAN card of Applicant*
  • Udyog Aadhar Memorandum (UAM) / Udyami Registration Number (URN) * (In case of MSME)
  • Certificate of Incorporation* (In case of company)
  • Address proof of applicant*
  • Last three years audited Annual financial statements (including auditor’s report / director’s report / schedules / notes to accounts)* of the applicant (for existing entities)
  • Last three years income tax returns* of applicant (for existing entities)
  • Bank statement for last six months
  • PAN / Aadhar Card of chief promoter*
  • CV of chief promoter*
  • Photograph of chief promoter*
  • Education certificates
  • Training certificates

असा करा ऑनलाईन अर्ज

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकला टच करा किंवा तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये टाईप करा https://ahidf.udyamimitra.in/
  • Animal husbandry and dairying ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर दिसत असलेल्या Apply for Loan असे निळ्या रंगाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुमचा मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीत टाका I am not robot या समोरील चौकटीत टिक करा. Requist otp  क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला OTP चौकटीमध्ये टाका आणि Verify OTP या बटनावर क्लिक करा.
  • जसे हि Verify OTP या बटनावर क्लिक कराल त्यानंतर एक अर्ज तुमच्या स्क्रीनवर दिसेल तो अर्ज अगदी व्यवस्थित भरा आणि सबमिट या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.
  • या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा ( योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ते या लेखाच्या सुरुवातीला दिलेली आहेत)
  • Submit your application to your preferred lender या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला हवी असलेली बँक निवडा
  • बँकेचे नाव व बँकेचा ब्रँच कोड टाका
  • टर्म आणि कंडीशन या पर्यायाला टिक करा आणि अर्ज सबमिट म्हणजेच सादर करा.
  • अर्ज सादर केल्यानंतर एक Application Number मिळेल तो पुढील कार्यवाहीसाठी जतन करून ठेवा
  • View Application या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या सादर केलेल्या अर्जाचे स्टेट्स सुद्धा तपासू शकता.

शेती संबधित योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर

अशाप्रकारे दुध आणि प्रक्रिया उद्योग, सलग्न पशुखाद्य, मास निर्मिती, मुरघास उद्योग उभारण्यासाठी ऑनलाईन करू शकता. शेती संबधित योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक ग्रुप टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. शासकीय माहितीचे व्हिडीओज बघण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनल ला भेट द्या. शेती विषयावरील योजनांच्या माहितीच्या whatsapp group मध्ये देखील तुम्ही सहभागी होऊ शकता व विविध शासकीय योजनांची मोफत माहिती मिळवू शकता.

2 thoughts on “उद्योग कर्ज योजना 2024 कर्ज मिळणे झाले सोपे असा करा ऑनलाईन अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *