राष्ट्रीय पशुधन अभियान योजना आता नव्या स्वरुपात  जी आर आला

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना आता नव्या स्वरुपात जी आर आला

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना अंमलबजावणीस प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. संदर्भातील जी आर नुकताच म्हणजेच दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजेच National livestock mission योजना नेमकी कशी आहे कोणत्या पद्धतीने या योजनेची अमलबजावणी होणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या योजनेसंदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.

हा लेख पण वाचा ज्यांना अजूनही पिक विमा मिळालेला नाही त्यांना असा मिळणार विमा

या योजनेसंदर्भातील जी आर नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेला आहे. या जी आरमध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. हि आणि इतर महत्वाची माहिती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

१२व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या अनेक योजना एकत्र करून राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाच्या पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत २०२१-२२ पासून विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत जे कि जुलै २०२१मध्ये काढलेल्या राष्ट्रीय पशुधन अभियानाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित असेल.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना अंतर्गत खालील प्रमाणे तीन उपअभियान असतील.

  • पशुधन आणि कुक्कुट प्रजाती विकास अभियान sub mission on breed development of livestock and poultry
  • पशु खाद्य व वैरण उप अभियान sub mission on feed and fodder development.
  • नाविन्यपूर्ण योजना व विस्तार अभियान sub mission on innovation and Extension.

मित्रांनो केंद्राची हि राष्ट्रीय पशुधन योजना पूर्वीपासून म्हणजेच २०१४-१५ पासून राबविण्यात येत आहे. याच योजनेमध्ये आणखी सुधारणा करून नव्याने हि योजना आता यापुढे राबविली जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती उद्योजकता विकास करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे.

आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. येथे टच करा

सदरील योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. हि योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र वेबपोर्टल सुद्धा विकसित करण्यात येणार आहे.   

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत खालील उपयोजनांचा समावेश असणार आहे.

  • पशुधन व कुक्कुटवंश सुधारणा उपभियान submission on breed development of livestock and poultry
  • वराह जातीमधील अनुवांशिक सुधारणा. Genetic improvement of pig breeds.
  • पशुखाद्य व वैरण विकास उप अभियान submission on feed and fodder development.
  • नाविन्यपूर्ण संशोधन व विस्तार उप अभियान submission on innovation and extension.
राष्ट्रीय पशुधन अभियान

या अभियानाची उद्दिष्टे आणि इतर माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाचा जी आर म्हणजेच शासन निर्णय बघू शकता. जी आर बघण्यासाठी खालील लिंकला टच करा.

ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन, दुग्धव्यवसाय व कुक्कुट पालन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणत केला जातो. बऱ्याच शेतकरी बांधवांना अशा योजनांची माहिती नसण्याची शक्यता असते. तुम्हाला जर विविध शासकीय योजनांची मोफत माहिती हवी असेल तर आमच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकला टच करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *