Udid card download करा नाहीतर मिळणार नाही या योजनांचा लाभ

Udid card download करा नाहीतर मिळणार नाही या योजनांचा लाभ

जाणून घ्या online udid card download कसे करावे लागते. दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर युडीआयडी कार्ड असणे अनिवार्य आहे. तुम्ही किंवा तुमचा मित्र दिव्यांग असाल तर १२ डिसेंबर २०२१ ते १२ मार्च २०२२ पर्यंत तुम्हाला तुमचे udid card download करावे लागेल. अन्यथा दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. युडीआयडी कार्ड डाउनलोड कसे करावे या संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ बघून सुद्धा तुम्ही तुमचे युडीआयडी कार्ड डाउनलोड करू शकता.

विविध शासकीय योजनांची माहिती हवी असेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये मोफत जॉईन व्हा.

सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना सुरु असतात परंतु या योजनांचा सर्वसामान्य जनतेला फायदा करायचा असेल तर या योजनांची माहिती होणे खूपच गरजेचे असते.

तुषार सबसिडी खात्यावर जमा होण्यास सुरुवात अधिक माहितीसाठी येथे टच करा.

सामाजिक न्याय विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविल्या जातात अशातच आणखी नव्या योजनेचे यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत म्हणजेच social justice and special asistance department यांच्या वतीने विविध कल्याणकरी योजना राबविल्या जातात.

दिव्यांग व्यक्तींना मिळणार विवाहासाठी आर्थिक सहाय्य त्यासाठी Udid card download करणे आवश्यक.

आनंदाची बातमी अशी आहे कि लवकरच दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे माहिती सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंढे यांनी दिलेली आहे. या संदर्भात लवकरच राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

अनेक योजना दिव्यांग व्यक्तींसाठी राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना UDID Card असणे गरजेचे आहे. UDID Card म्हणजेच unique disability ID होय.

UDID Card कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लगणार आहे. तुम्ही किंवा तुमच्या मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती दिव्यांग असेल तर अशा व्यक्तींना त्यांचे online UDID Card download करता येणार आहे.

UDID Card चे फायदे

  • प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला एक युनिक नंबर देण्यात येईल जो कि शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी संपूर्ण देशामाधेय ग्राह्य धरले जाईल.
  • युडीआयडी कार्डमुळे संपूर्ण देशातील दिव्यांग व्यक्तींचा डाटा उपलब्ध होईल.
  • दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळविणे सोपे होते.

Online UDID Card download करण्याची सोपी पद्धत.

अर्ज करण्याआधी खालील काही कागदपत्रे तुमच्याकडे असू द्या.

  • आधार कार्ड स्कॅन कॉपी
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • स्वाक्षरी स्कॅन केलेली.
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र.
udid card download

खालीलप्रमाणे सादर करा ऑनलाईन अर्ज

  • https://www.swavlambancard.gov.in/ या वेबसाईटवर जा.
  • वेबसाईटच्या उजव्या बाजूला Apply for Disability certificate and UDID card या पर्यायावर क्लिक करा.
  • कॉम्प्युटर स्क्रीनवर Registration form ओपन होईल.
  • तुम्हाला या ठिकाणी माहिती संपूर्ण माहिती भरावयाची आहे.

हा अर्ज ऑनलाईन कसा सादर करावा लागतो या संदर्भातील एक व्हिडीओ खाली दिलेला आहे तो व्हिडीओ बघून सुद्धा तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि online UDID Card download करू शकता.

अर्ज यशस्वीपणे सादर केल्यानंतर तुम्हाला सदरील ऑनलाईन अर्जाची प्रिंट तुमच्या जवळच्या शासकीय जिल्हा वैदकीय कार्यालयामध्ये सादर करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमचे online UDID Card download करता येणार आहेत.

तुमच्या इमेलवर व नोंदणीकृत मोबाईल नंबरवर Enrolment Number येईल तो सांभाळून ठेवा. हा Enrolment Number वापरून तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेट्स बघू शकता. त्यामुळे लवकरात लवकर हे कार्ड डाउनलोड केल्यास फायदा होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *