जाणून घ्या सोलर पंप किंमत किती असते आणि अनुदान मिळविण्यासाठी किती रक्कम भरावी लागते. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.
शेती आणि शेती संबधित विविध योजनांची माहिती आपण डिजिटल डीजी डॉट इन म्हणजेच digitaldg.in या वेबसाईटवर. या संदर्भातील माहितीचे व्हिडीओज डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर बघत आलेलो आहोत. आज आपण सोलर पंप किंमत व अनुदान या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
सूचना – कुसुम सोलर योजना अंतर्गत सौर कृषी पंपसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी फक्त महाउर्जा वेबसाईटवरील अधिकृत लिंकचाच वापर करावा इतर कोणत्याही लिंकवर अर्ज भरू नये. इतर लिंकवर अर्ज भरल्यास तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कदाचित तुम्हाला माहितच असेल कि कुसुम सोलर योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना सौर उर्जा कृषी पंपासाठी अनुदान दिले जाते.
बऱ्याच शेतकऱ्यांनी सौर उर्जा कृषीपंपासाठी ऑनलाईन अर्ज भरलेले होते परंतु त्यांना अजूनही पेमेंटचे मेसेज आलेले नाहीत किंवा ज्यांना पैसे भरण्याचे संदेश आलेले आहेत त्यांना अजूनही पेमेंट करण्याचा पर्याय कुसुम सोलर वेबसाईटवर दिसत नाही त्यामुळे अनेक शेतकरी बांधव संभ्रमात आहेत.
शेतकरी बंधुंनो लवकरच हि अडचण दूर होईल. ज्या शेतकरी बांधवांना अजूनही माहिती नाही कि सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा तर या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला टच करू शकता.
सौर कृषी पंप योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे टच करा.
सोलर पंप किंमत सोबतच जाणून घ्या किती एकरसाठी मिळतो कोणता पंप
आता आणखी एक प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल कि सोलर पंप किंमत किती असते solar pump price आणि आपल्याला अनुदान मिळविण्यासाठी किती पैसे भरावे लागणार आहेत तर या प्रश्नांचे उत्तर देखील या ठिकाणी आम्ही तुम्हाला देत आहोत.
सौर कृषी पंपाची किंमत
पंपाची क्षमता | 3 एच पी ( डीसी) | 5 एच पी ( डीसी) | 7.5 एच पी ( डीसी) |
किंमत ( जीएसटी मिळून ) | 193803 | 269746 | 374402 |
शेतकरी बंधुंनो कुसुम सोलर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 3, 5 व 7.5 हॉर्स पॉवरचे पंप दिले जातात ज्यासाठी लाभार्थ्याकडे अनुक्रमे 2.50, 2.51-5.00 व 5.00 एकर पेक्षा जास्त जमीन असणे आवश्यक आहे. 3, 5 व 7.5 सौर कृषी पंपासाठी वेगवेगळी रक्कम भरावी लागते.
सौर पंप घेण्यासाठी भरावा लागणारा हिस्सा
3 HP DC
प्रवर्ग | मूळ किंमत | GST रक्कम ( 13.8 % ) | एकूण |
ओपन / खुला | 17,030 | 2350 | 19380 |
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती | 8515 | 1175 | 9690 |
5 HP DC
प्रवर्ग | मूळ किंमत | GST रक्कम ( 13.8 % ) | एकूण |
ओपन / खुला | 23704 | 3271 | 26975 |
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती | 11852 | 1636 | 13488 |
7.5 HP DC
प्रवर्ग | मूळ किंमत | GST रक्कम ( 13.8 % ) | एकूण |
ओपन / खुला | 32900 | 4540 | 37440 |
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती | 16450 | 2270 | 18720 |
खालील टेबलमध्ये सौर उर्जा पंपासाठी किती पैसे भरावे लागतात त्याची एकूण किंमत किती आहे या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे.
सोलर पंप किंमत एकूण आणि शेतकऱ्याने अनुदानाच्या बदल्यात भरावयाची रक्कम.
वरील तक्त्यामध्ये दाखविल्याप्रमाणे लाभार्थ्यांना सौर कृषी पंपासाठी रक्कम भरावी लागणार आहे. तुमी जर खुल्या प्रवर्गातील असाल किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील असाल तर त्यासाठी कोणत्या पंपासाठी किती रक्कम मिळते आणि त्या बदल्यात तुम्हाला किती पैसे भरावे लागतील या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल.
तर जे शेतकरी किंवा लाभार्थी आम्हाला अनेकदा प्रश्न विचारत होते कि सौर पंपाची मूळ किंमत किती आहे आणि त्यासाठी आम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत तर मला वाटते या ठिकाणी आता तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने हि माहिती समजली असेल.
कुसुम सोलर योजना अंतर्गत सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटनावर टच करा.
तुम्हाला जर एखाद्या योजनेची माहिती तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर ९९७५१९५५४९ हा नंबर तुमच्या whatsapp group मध्ये समाविष्ट करा जेणे करून एखादी नवीन योजना आली असेल तर तुम्हाला त्याबद्दल सूचना देता येईल.
योजनांची माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला जर आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मोफत सहभागी व्हायचे असेल तर खालील बटनावर टच करा व सहभागी व्हा.
ST CAST YAVATMAL 3HP KOTA SPMPLA AHE TR MEW KOTA KADHI UPLABDH HONAR DADA