अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ३० कोटी निधी आला असा करा अर्ज

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ३० कोटी निधी आला असा करा अर्ज

या लेखामध्ये अण्णासाहेब पाटील कर्ज योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात. गाव असो कि शहर आजकाल बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

तुम्हाला जर अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ लिंक दिलेली आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

तुम्ही देखील बेरोजगार असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा कारण यामध्ये व्यवसायासाठी बिनव्याजी लोनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ साठी ३० कोटी रुपये निधी वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

हा शासन निर्णय तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर खालील बटनावर क्लिक करा.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मराठा तरुणांना उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देते. यासाठी महास्वयंम वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना संदर्भातील विविध जी आर बघा त्यासाठी येथे टच करा.

हा अर्ज कसा करावा, कोणत्या व्यक्ती यासाठी पात्र आहेत, किती लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. मंडळ किती वर्षापर्यंत व्याज भरू शकते हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

कोणताही व्यवसाय किंवा उद्योग करायचा झाल्यास त्यासाठी आर्थिक भांडवल असणे खूपच गरजेचे आहे. अनेक तरुणांना स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु केवळ आर्थिक अडचणीमुळे ते स्वतःचा व्यवसाय उभारू शकत नाहीत.

या योजनेविषयी पण जाणून घ्या व्यवसाय कर्ज योजना

इच्छा तेथे मार्ग या म्हणीप्रमाणे जर तुम्हाला खरोखरच व्यवसाय उभारायचा असेल तर तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लाभ घेवून तुमचा उद्योग सुरु करू शकता.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत बिनव्याजी कर्जाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा आणि कागदपत्रे कोणकोणती लागतात या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.

हे पण वाचा उद्योग कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड ( पुढील आणि मागील दोन्ही बाजूचे )
  • रहिवासी पुरावा.
  • उत्पन्नाचा पुरावा.
  • जातीचा दाखला.
  • प्रकल्प अहवाल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

वरील प्रमाणे कागदपत्रे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेचा लाभ घेण्यासाठी अपलोड करणे आवश्यक आहेत.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना संदर्भातील इतर महत्वाची माहिती.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • केवळ मराठाच नव्हे तर ज्या जातीसाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा जातीचे उमेदवार देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतील.
  • पुरुषांसाठी जास्तीत जास्त ५० तर महिलांसाठी ५५ वर्षे वायोमर्यादा आहेत.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी ८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणे गरजेचे आहे.
  • ५ वर्षाकरिता किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा जे कमी असेल तितक्या वर्षापर्यंत लाभ मिळेल.
  • कर्ज मर्यादा रक्कम १० लक्ष असेल आणि व्याजाचा दर द. सा. द. शे. १२ टक्के एवढा असेल आणि जास्तीत जास्त ३ लाख रुपयापर्यंत व्याज रकमेचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्याकडून करण्यात येईल.
  • अर्ज केल्यानंतर ७ दिवसाच्या आत ( सुट्टीचे दिवस वगळून ) लाभार्थ्यास अर्जासंदर्भात प्रतिक्रिया कळविली जाईल.
  • लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केल्यानंतर ६ महिन्यामध्ये त्या व्यवसायाचे दोन फोटो वेबसाईटवर अपलोड करणे गरजेचे आहे.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत कर्ज घेवून व्यवसाय सुरु केला असेल तर त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सौजन्याने असा बोर्ड लावावा.

अशा प्रकारे आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतली आहे कि अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात हि आणि इतर माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे जाणून घेतली आहे.

मित्रांनो विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊ शकता त्यासाठी खालील बटनाला टच करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *