शेळी पालन व इतर योजनांची कागदपत्रे अपलोड करण्यास मुदतवाढ

शेळी पालन व इतर योजनांची कागदपत्रे अपलोड करण्यास मुदतवाढ

शेतकरी बंधुंनो शेळी पालन व इतर योजना म्हणजेच शेळी गट वाटप, दुधाळ जनावरे गट वाटप, कुक्कुटपालन किंवा तलंगा वाटप योजना अंतर्गत पात्र लाभार्थींना पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तुम्हाला जर माहित नसेल कि वरील योजनांचे कागदपत्रे अपलोड कशी करावीत तर या संदर्भातील व्हिडीओ सर्वात शेवटी देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ पाहून तुम्ही तुम्हाला जी योजना लागली असेल त्या योजनेचे कागदपत्रे अपलोड करू शकता.

शेळी पालन व इतर योजनांसाठी लवकरात लवकर तुमचे कागदपत्रे अपलोड करा.

शेळी पालन हा ग्रामीण भागातील सर्वात आवडता विषय आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुण शेळी पालन व्यवसाय सरू करण्यास इच्छुक असतात परंतु आर्थिक अडचणीमुळे ते तो व्यवसाय सुरु करू शकत नाहीत.

अशा वेळी तुम्ही जर शासकीय अनुदानावर शेळी, कुक्कुटपालन किंवा दुग्धव्यवसाय सुरु केला तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

नाविन्यपूर्ण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

शेळी गट वाटप, कुक्कुटपालन किंवा दुग्धव्यवसाय सुरु करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विविध योजना सुरु असतात. यापैकीच एक योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना होय. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वरील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

शेळी पालन व इतर

बऱ्याच शेतकऱ्यांनी शेळी गट वाटप, दुधाळ जनावरे गट वाटप व कुक्कुटपालन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर होती ती वाढवून २० डिसेंबर करण्यात आली होती.

या विहित कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते त्यापैकी काही जणांना योजनेसाठी पात्र असल्याचे संदेश प्राप्त झाले होते. ज्या शेतकऱ्यांना असे संदेश प्राप्त झाले होते त्यांनी दिनांक १६ जानेवारी २०२२ पर्यंत कागदपत्रे पशुसंवर्धन विभागाच्या https://ah.mahabms.com/ या वेबसाईटवर उपलोड करणे आवश्यक होते.

पुढील लेख सुद्धा वाचा शेळी पालन कर्ज योजना

योजनांचे कागदपत्रे अपलोड करण्यास मुदतवाढ

दिनांक १९ जानेवारी २०२२ पर्यंत तुम्ही  शेळी गट वाटप, दुधाळ जनावरे गट वाटप, कुक्कुटपालन किंवा तलंगा वाटप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपलोड करू शकता.

पशु संवर्धन विभागाच्या शेळी पालन व इतर योजना संदर्भाततुमच्या मनामध्ये अजून एक प्रश्न निर्माण झाला असेल कि वरील योजनांसाठी तर अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत पण मग मेसेज काहीच लोकांना कसे आले. या ठिकाणी एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे या योजनेसाठी तुम्ही एकदा अर्ज केला तर किमान ५ वर्षे तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही.

सध्या तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल तर कदाचित तुमचे नाव पुढच्या यादीमध्ये येवू शकते. ज्या लाभार्थ्याने या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्या लाभार्थ्याला सुरुवातीला लाभ मिळाला नसेल तर त्याचे नाव प्रतीक्षा यादी म्हणजेच waiting list वर जाणार आहे.

त्यामुळे तुम्हाला जर योजना लागली असल्याचा संदेश आला नसेल तर निराश होऊ नका कारण शेळी पालन व इतर योजनांसाठीतुमचा नंबर कदाचित पुढच्या यादीमध्ये लागण्याची शक्यता असते. ज्या शेतकऱ्यांना शेळी पालन किंवा कुक्कुटपालन योजना लागलेली आहे म्हणजेच तो लाभार्थी त्या योजनेसाठी पात्र झाला असेल आणि त्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय आला असेल तर त्यांनी लगेच कागदपत्रे अपलोड करावीत.

कदाचित आता यानंतर कागदपत्रे अपलोड करण्यास मुदतवाढ मिळणार नाही अशी शक्यता वाटते.

विविध योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा त्यासाठी येथे टच करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *