ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ५० कोटी निधी आला GR पहा असा करा अर्ज

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ५० कोटी निधी आला GR पहा असा करा अर्ज

ट्रॅक्टर अनुदान संदर्भातील जी आर म्हणजेच शासन निर्णय दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी काढण्यात आलेला आहे. ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ५० कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. तुम्हाला जर या जी आर संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकला टच करून तुम्ही हा जी आर बघू शकता.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जेणे करून तुम्हाला ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेता येईल. या लेखाच्या सर्वात शेवटी ट्रॅक्टर योजना ऑनलाईन अर्ज संदर्भातील एक व्हिडीओ देखील तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही अर्ज करू शकता.

हा अर्ज करणे अतिशय सोपे आहे. या ठिकाणी मी जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे ती पद्धत जर तुम्ही वापरली तर नक्कीच अगदी काही मिनिटामध्ये तुम्ही ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज करू शकाल.

हा लेख पण वाचा शेतकऱ्यांना मिळणार ट्रैक्टर

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अनेक शेतकरी उत्सुक

शेतकरी बंधुंनो ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी तुम्हाला महाडीबीटी (Mahadbt) या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

अनेकांना प्रश्न पडला असेल कि ट्रॅक्टरसाठी किती अनुदान मिळते. शेतकरी बंधुंनो ऑनलाईन अर्ज करण्याआधी जाणून घ्या कि कोणत्या लाभार्थींना किती अनुदान मिळणार आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी एवढे मिळणार अनुदान

अनुसूचित जाती जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी बांधवांना किमतीच्या ५० टक्के किंवा १.२५ लक्ष यापैकी जे कमी असेल ते.

इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ४० टक्के किंवा १ लक्ष या पैकी जे कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

पूर्वी शेतीमध्ये माशागातींची कामे करण्यासाठी बैलांचा उपयोग केला जात असे. नंतरच्या काळात सर्वच क्षेत्रामध्ये आधुनिकीकारण झाले. शेतीबद्दल बोलायचे झाल्यास पूर्वी शेतीमशागतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग करण्यास शेतकरी टाळाटाळ करत होते परंतु जस जसा ट्रॅक्टरचा उपयोग शेतीमध्ये होण्यास सुरुवात झाली त्यानंतर बरीच कामे ट्रॅक्टरने केली जावू लागली.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी

सद्य परिस्थितीचा विचार केला तर ट्रॅक्टर शिवाय शेती करणे म्हणजे अशक्य बाब होऊन बसली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ट्रॅक्टर घेण्यास इच्छुक आहेत. आपसूकच ट्रॅक्टरची किमत खूप जास्त असल्यमुळे छोट्या शेतकऱ्यांना तो घेणे परवडत नाही. त्यामुळे यासाठी शासकीय अनुदान मिळाल्यास असे शेतकरी ट्रॅक्टर घेऊ शकतात.

तुम्ही देखील ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी एखाद्या शासकीय योजनेच्या शोधात असाल तर नक्कीच हि तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

चला तर मग लगेच ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.

ज्या पद्धतीने खाली प्रोसेस सांगितलेली आहे त्याच पद्धतीने जायचे हि प्रोसेस समजण्यास तुम्हाला अडचण येत असेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देखील खास तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

 • सातबारा
 • एकूण जमिनीचा दाखला
 • आधार कार्ड
 • बँक पासबुक

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

 • गुगलमध्ये mahadbt farmer login असे सर्च करा.
 • तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर महाडीबीटी शेतकरी वेबसाईट ओपन होईल.
 • लॉग इन करा.
 • कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
 • अर्ज भरा.
 • पेमेंट करा.
 • तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करून तुमच्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

ट्रॅक्टर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील व्हिडीओची तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते. या योजनेची माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवाना कळावी यासाठी हा लेख तुमच्या फेसबुक whatsapp group किंवा टेलिग्राम ग्रुपवर सेंड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *