तुम्हाला देखील अनुदानावर मिळणार गाई म्हशी फक्त तुम्ही या योजनेसाठी पात्र असायला हवे. दुधाळ गट वाटप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत.
या योजनेसाठी जे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत त्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत. ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत.
मित्रांनो दुग्धव्यवसाय योजनेच्या ऑनलाईन अर्जाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी हे व्यवसाय करणे किती गरजेचे आहेत याविषयी माहिती जाणून घेवूयात.
दुग्धव्यवसाय ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यास सक्षम जाणून घ्या कशा अनुदानावर मिळणार गाई म्हशी
आज प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे. अनेक तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. यामुळे तरुण वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निराशा वाढीस लागलेली आहे.
जर तुम्हाला नोकरी नसेल तर तुम्ही ग्रामीण भागामध्येच रोजगारभिमुख व्यवसाय सुरु करू शकता ज्यामध्ये शेळी पालन व्यवसाय आहे, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि असे बरेच व्यवसाय आहेत ज्यामुळे तुम्हाला रोजगार मिळू शकतो.
मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करायचा झाल्यास त्यासाठी आर्थिक भांडवल असणे खूप गरजेचे असते. तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरु करू शकत नाहीत.
अनुदानावर मिळणार गाई म्हशी शासकीय योजनांचा लाभ घ्या.
शेळी पालन, कुक्कुटपालन किंवा दुग्ध व्यवसाय इत्यादी व्यवसाय सुरु करण्यास शासनाकडून अनुदान दिले जाते. अनेक शेतकरी बांधवांना या विषयी माहित आहे परंतु अनेक शेतकरी बांधव असे आहेत ज्यांना अजूनही या योजनांविषयी माहिती नसते.
जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती नसेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मोफत जॉईन व्हा.
आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये विविध शासकीय योजनांची मोफत माहिती दिली जाते. ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.
चला तर आता थोडाहि वेळ न दवडता माहिती जाणून घेवूयात कि शेळी पालन व दुग्धव्यवसाय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करावा लागतो.
शासनाच्या कोणत्या विभागामार्फत हि योजना राबविली जात आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने हि योजना राबविली जात आहे.
- योजनेचे नाव विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत आदिवासी महिलांना २ दुधाळ जनावरांचा गट वाटप करणे.
- अर्जदार केवळ महिलाच असायला हवी.
- महिला अर्जदाराकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातील असायला हवी.
शेतकरी बंधुंनो तुम्ही आदिवासी नसाल तर तुम्हाला आता आता प्रश्न पडला असेल कि हि योजना तर केवळ आदिवासी महिलांसाठी आहे आपण कोठे अर्ज करायचा.
शेतकरी बंधुंनो सर्वसाधारण प्रर्गासाठी सुद्धा शेळी गट वाटप, कुक्कुट वाटप व दुधाळ जनावरे गट वाटप योजना सुरु असतात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेगळी वेबसाईट असते. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. परंतु सध्या ऑनलाईन अर्ज बंद झाले आहेत कारण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक विशिष्ट कालावधी दिला जातो त्या कालावधीमध्येच अर्ज करावे लगतात.
हा लेख पण वाचा शेळी पालन योजनेसाठी अशी करा कागदपत्रे अपलोड
सध्या आधिवासी विभागाच्या वतीने दुधाळ जनावरे गट वाटप योजना सुरु झालेली आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
योजनेविषयी अधिक माहिती.
- https://nah.mahabms.com/webui/home या वेबसाईटवर हे ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झालेले आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख दिनांक १४ ते २३ जानेवारी आहे.
- हि योजना नंदूरबार जिल्ह्यासाठी आहे.
- या योजनेंतर्गत महिला लाभार्थींना २ दुधाळ जनावरे मिळणार आहेत.
- संकरित गाय घ्यायची झाल्यास – HF किंवा जर्सी म्हैस घ्यायची असल्यास – मुऱ्हा जातीची किंवा जाफराबादी
देशी गाय घ्यायची असल्यास – गीर गाय, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी इत्यादी प्रकारचे दुधाळ जनावरे लाभार्थीस मिळू शकतात.
केली जाईल लाभार्थीची निवड.
- ऑनलाईन अर्ज करणारा लाभार्थी म्हणजेच महिला आदिवासी महिला बचत गटातील सदस्य असायला हवी.
- लाभार्थी ज्या महिला बचत गटाचा सदस्य आहे तो गट चालू असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- कमीत कमी २० गुंठे सिंचनाखालील जमीन असणे आवश्यक.
- कमीत की ४ गाईंचा गोठा असणे आवश्यक.
योजनेसाठी मिळणारे अनुदान
- प्रती गाय ५५००० रुपयाप्रमाणे संकरित गाईंचा गट – १,१०,०००.००
- विमा प्रती गाय – २७५० तीन वर्षासाठी – ५५००.००
- वाहतूक खर्च – ४५००.००
- एकूण किमत – १२००००.००
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- ओळखपत्राची सत्यप्रत ( फोटो )
- सातबारा.
- ८ अ उतारा.
- अपत्य दाखला.
- आधार कार्ड.
- बँक खाते पासबुक.
- जातीच्या दाखल्याची सत्यप्रत.
- बचत गट सदस्य प्रमाणपत्र.
वरील प्रमाणे कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत जोडायची आहेत इतरही कागदपत्रे या योजनेसाठी अवश्य लागणार आहेत त्यासाठी येथे टच करा. योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली ऑनलाईन अर्ज लिंक देत आहोत त्यावर क्लिक करा.