पशु किसान क्रेडीट कार्ड योजना अंतर्गत  मिळणार १ लाख ६० हजार लोन

पशु किसान क्रेडीट कार्ड योजना अंतर्गत मिळणार १ लाख ६० हजार लोन

किसान क्रेडीट कार्ड संदर्भात अनेकांना माहिती असेलच नसेल तर जाऊन घ्या पशु किसान क्रेडीट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो. शेतकरी बांधव शेती करत असतांना जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी पालन असे इतरही व्यवसाय करत असतात. अशावेळी पशु किसान क्रेडीट कार्डसाठी अर्ज केल्यास १ लाख ६० हजार रुपयापर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकते.

हा लेख पण वाचा ट्रॅक्टर योजनेसाठी आला एवढा निधी असा करा ऑनलाईन अर्ज

या योजनेसाठी पात्रता.

  • मत्सव्यावसायिक.
  • पोल्ट्री व्यावसायिक.
  • डेअरी व्यावसायिक.
  • पशुपालक.

पशु पालकांना कोणत्याही तरणाशिवाय १ लाख ६० हजार रुपये या पशु किसान कार्ड योजने अंतर्गत तुम्हाला तुमच्या मिळू शकतील. यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत संपर्क करावा लगणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुमच्या तालुक्यातील पशु संवर्धन कार्यालयात देखील तुम्ही संपर्क साधू शकता आणि या योजनेची माहिती मिळवू शकता.

पुढील योजना पण बघा या लाभार्थींना मिळणार १ लाख २० हजार रुपये किमतीच्या गाई किंवा म्हशी.

पशु किसान क्रेडीट कार्ड लागणारी कागदपत्रे.

  • फोटो ओळख पत्र जसे कि मतदान कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन
  • रहिवासी पुरावा जसे कि टेलीफोन बिल, इलेक्ट्रिक बिल किंवा २ महिन्याच्या आतील कर पावती/ मतदान कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट
  • अर्जदाराचे २ पासपोर्ट साईज फोटो.
  • सातबारा ( गरज असेल तरच )

पशु किसान क्रेडीट कार्ड संदर्भातील अगदी तपशीलवार माहिती तुम्हाला हवी असेल तर खाली एक pdf फाईल दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ती फाईल तुमच्या कॉम्पुटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. या pdf च्या २० चे पेजवर अर्जचा नमुना दिलेला आहे.

पशु पालकांसाठी देण्यात येणाऱ्या किसान क्रेडीट कार्डचे अभियान सुरु झालेले आहे. १५ नोव्हेंबर २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत हे अभियान सुरु असणार आहे.

त्यामुळे तुम्ही जर पशु पालक असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या.

अनेक शेतकरी बांधवांना दुग्धव्यवसाय करण्यासाठी पैशांची गरज निर्माण होत असते. अशा वेळी तुम्ही जर पशु किसान क्रेडीट कार्डसाठी अर्ज केला तर नक्कीच मदत होऊ शकते.

पशु किसान क्रेडीट कार्ड

शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजना सुरु असतात. या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे असते. शेतकरी असोत कि सामान्य नागरिक अनेकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध आहेत. या स्मार्ट फोनचा उपयोग तुम्ही माहिती घेण्यासाठी करू शकता.

तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर विविध शासकीय योजनांची माहिती हवी असेल तर तुमची आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये किंवा whatsapp group मध्ये सामील होऊ शकतात. एकदा का तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये सामील झालात तर तुम्हाला विविध योजनांची मोफत माहिती पाठविली जाईल ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *