शेळी समूह योजना मंजूर करण्यात आली असून या संदर्भात आपण अधिक सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ग्रामीण भागातील अनेक नवतरुण माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात. शेळीच्या मासास व दुधास ग्रामीण भागासह शहरीभागामध्ये प्रचंड मागणी असते. यामुळे शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू शकतो.
हा लेख पण वाचा नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत मिळते शेळी पालन व्यवसायासाठी अनुदान
पोहरा येथे राबविली जाणार शेळी समूह योजना
दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ रोजी मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
या योजनेसंदर्भातील व्हिडीओ लिंक
अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे सध्या हि योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच प्रमाणे राज्यातील ५ महसूल बिभागात देखील हि शेळी समूह योजना sheli samuh yojana राबविण्यात येणार आहे.
पुढील लेख पण वाचा अशी बघा शेळी गट वाटप योजना लाभार्थी यादी.
शेळी समूह योजनेंतर्गत खालील योजनांचा मिळेल लाभ
या योजनेंतर्गत शेळी पालन करणाऱ्या तरुणांना किंवा नागरिकांना प्रोत्साहित करणे हा या योजनेचा हेतू आहे. शेळी समूह योजना अंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी शेळी पालन sheli palan करणाऱ्या नागरिकांना सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या योजने अंतर्गत खालील लाभ मिळेल.
- उत्पादक कंपनी स्थापन करण्यास मदत.
- शेळी पालकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत.
- शेळ्यांचे दूध व दुग्धजन्य प्रक्रिया केंद्र स्थापन करणे
- शेतकरी बांधवांसाठी प्रशिक्षण केंद्र व निवासस्थान व्यवस्था
- सामुहिक सुविधा केंद्र उभारून लाभ दिला जाईल.
शेळी समूह योजनेची थोडक्यात संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे
योजनेचे नाव | शेळी समूह योजना |
कार्यक्षेत्र | पोहरा ( जिल्हा अमरावती) |
योजनेसाठी निधी | ७.८१ कोटी ( मंत्री मंडळ बैठकीनुसार ) |
योजनेचा मुख्य उद्देश | शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देणे |
माहितीचा स्त्रोत | महासंवाद वेबसाईट |
शेतकरी बंधुंनो अशा प्रकारे हि योजना राबविण्यास ७.८१ कोटी निधीस दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.
शेळी पालन व्यवसायातून रोजगार निर्मिती
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणत बेरोजगारी वाढलेली आहे. तुम्ही जर रोजगाराच्या शोधात असाल तर शेळी पालन व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झालेल्या आहेत. शेळी पालन योजना sheli palan yojana अंतर्गत शासनाच्या वतीने अनुदान देखील दिले जाते.
शासकीय अनुदानाचा लाभ घेवून तुमच्या गावामध्ये तुम्ही शेळी पालन व्यवसाय करून तुमच्यासाठी व पर्यायाने इतरांसाठी रोजगार निर्माण करू शकता.
विविध शासकीय योजनेची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. त्यासाठी येथे टच करा.