महिला विकास योजना उद्योगासाठी मिळेल लाभ असा करा ऑनलाईनअर्ज

महिला विकास योजना उद्योगासाठी मिळेल लाभ असा करा ऑनलाईनअर्ज

महिला विकास योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात. महाराष्ट्र राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे.

यासाठी शासनाच्या वतीने ऑनलाईन अर्ज मागविलेले आहेत. तुम्ही महिला असाल किंवा तुमच्या घरातील एखादी महिला एखादा उद्योग किंवा व्यवसाय करू इच्छित असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या.

महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा. कोणकोणत्या महिल्या यासाठी पात्र असणार आहेत.

shetkari whatsapp group link

हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ लिंक दिलेली आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता.

हा लेख पण वाचा अशी पहा घरकुल यादी.

महिला विकास योजना अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ घ्या.

महिला मग ती शहरी भागातील असो कि ग्रामीण भागातील, त्यांना जर त्यांच्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी दिली तर महिला खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करू शकतात.

विशेषतः ग्रामीण भागातील अनेक महिला स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय करण्यास इच्छुक असतात. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन आणि शासकीय योजनेचा लाभ मिळाला तर ह्या भगिनी नक्कीच चमकदार कामगिरी करून दाखवितील यात शंका नाही.

पुढील लेख पण वाचा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ

ग्रामीण भागातील महिलांना वाव

हीच बाब लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कोणत्या वेबसाईटवर करावा या संदर्भातील माहिती या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत जेणे करून तुम्ही देखील तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

या महिला विकास योजना संदर्भातील ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यापूर्वी जाणून घेवूयात कि हि योजना नेमकी कशी आहे.

महाराष्ट्रातील ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ऑनलाईन अर्जांपैकी १२० अर्ज निवडले जाणार आहेत. निवडलेल्या महिलांना विशेष व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नवीन महिला विकास

महिलादिनी राबविली जाणार हि महिला विकास योजना ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान

हा कार्यक्रम ८ मार्च २०२२ म्हणजेच अंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरु होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महिलांना यशस्वी व्यवसाय करण्यासाठी अनेक टिप्स देण्यात येतील.

जसे कि वित्तपुरवठा, गुंतवणूकदार आणि ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त कसे पोहचता येईल या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.

अमेरिकी दूतावास, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अँड इनोव्हेशन रिसर्च म्हणजेच ACIR यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविला जाणार आहे.

ज्या महिला स्वतःचा उयोग व्यवसाय करू इच्छित असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे.

योजनेच्या ठळक बाबी

योजनेचे नावमहाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम
पात्रताया योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात.
अर्ज पद्धतऑनलाईन
ऑनलाइन अर्ज लिंकअधिकृत वेबसाईट लिंक
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख२५ फेब्रुवारी २०२२
माहितीचा स्त्रोतमहासंवाद वेबसाईट

योजनेसाठी लाभार्थी पात्रता

  • या योजनेसाठी फक्त महिला लाभार्थीच ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • अर्जदार महिला हि नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा स्टार्टअपची संस्थापक असणे आवश्यक आहे.
  • जी महिला यासाठी ऑनलाईन अर्ज करणार आहे त्या महिलेचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • अर्जदारास इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • भारतीय नागरिक व महाराष्ट्र निवासी महिलाच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

वरील लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील.

असा करा ऑनलाईन अर्ज.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम या वेबसाईटवर जावून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. डायरेक्ट ऑनलाईन अर्ज पेजवर जाण्यासाठी येथे टच करा.

  • महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम या वेबसाईट ओपन केल्यानंतर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेमध्ये हि वेबसाईट तुम्हाला दिसेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज करा किंवा apply now या बटनावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही apply now किंवा अर्ज करा या बटनावर क्लिक कराल त्यावेळी ऑनलाईन फॉर्म तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलस्क्रीनवर ओपन होईल.
  • या अर्जामध्ये कोणकोणती माहिती भरावी लागते हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ लिंकवर क्लिक करून व्हिडीओ पहा.

योजने संदर्भातील व्हिडीओ लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *