बांधकाम कामगार कल्याण योजना bandhkam kamgar kalyan yojana अंतर्गत भोजन योजना म्हणजेच मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत कामगारांना जेवण मिळण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्ही जर बांधकाम कामगार असाल construction worker आणि याची तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला देखील मोफत मध्यान्ह भोजन मिळू शकते free mid-day meal. केवळ भोजनच नव्हे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता 32 विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.
Bandhkam kamgar kalyan yojana अंतर्गत मोफत मध्यान्ह भोजन योजना.
यातील एक योजना म्हणजे मध्यान्ह भोजन होय. मध्यान्ह भोजन योजनेचा कामगारांना विशेषतः ग्रामीण भागातील कामगारांना खूप लाभ मिळत आहे. कामाच्या ठिकाणी भोजन मिळत असल्याने अनेक कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य नर्माण होत आहे.
वरील योजनेव्यतिरिक्त इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी कशी करावी या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
बांधकाम कामगार त्यांची नोंदणी ऑफलाईन देखील करू शकतात. ऑफलाईन अर्ज नमुना तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा किंवा टच करा.
असे पोचते ग्रामीण भागातील कामगारांपर्यंत भोजन
एक मोठी चारचाकी गाडी हे जेवण घेवून ग्रामीण भागामध्ये जाते. बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना एका वेळेच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार देण्यात येणार आहे. या आहारात खालील प्रमाणे पदार्थ असतील.
- रोटी.
- दोन भाजी.
- डाळ.
- भात.
- इतर आहार.
बांधकाम कामगारांना मिळत असलेल्या मध्यान्ह भोजन म्हणजेच free mid-day meal योजनेचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील बटनावर टच किंवा क्लिक करा. खालील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकाल कि कशा पद्धतीने हे मध्यान भोजन वाटप केले जाते.

तर अशा पद्धतीने आपण या लेखाद्वारे तसेच वरील व्हिडीओद्वारे जाणून घेतलेले आहे कि कशा पद्धतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केली तर विविध योजनांचा लाभ मिळू शकतो. खालील बटनांचा वापर करून हि लिंक आपल्या गरीब बांधवाना जरूर शेअर करा.
बांधकाम कामगार आहोत आम्हाला मध्यान्ह भोजन मिलता नहि है