Gram panchayat fund details ग्राम पंचायतचा लेखाजोखा मोबाईलवर

Gram panchayat fund details ग्राम पंचायतचा लेखाजोखा मोबाईलवर

आजच्या लेखामध्ये gram panchayat fund details अर्थात ग्रामपंचायत निधी संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामांसाठी शासनाच्या वतीने निधी दिला जातो.

व्हॉट्सॲप ग्रुप लिंक

यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक विहीर दुरुस्ती इत्यादी योजनांसाठी शासनाकडून निधी पुरवठा केला जातो. परंतु गावातील अनेक नागरिकांना हा निधी किती मिळाला कधी मिळाला आणि कोणत्या कामासाठी मिळाला याची माहिती नसते.

हा लेखपण वाचा  बांधकाम कामगारांना मोफत जेवण मिळण्यास सुरुवात.

गावासाठी किती निधी आला हे जाणून घेणे आता अगदी सोपे झालेले आहे. या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ लिंक दिलेली आहे त्या लिंकला टच करून ग्रामपंचात निधीची माहिती कशी काढावी या संदर्भात महिती दिलेली आहे.

मोबाईलवरून बघा gram panchayat fund details

तुमच्या गावातील विकास कामांसाठी gram panchayat fund details म्हणजेच निधी आपण जो बघणार आहोत तो एका एंड्राइड एप्लीकेशनच्या सहाय्यने बघणार आहोत. म्हणजेच यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एंड्राइड एप्लीकेशन इंस्टाल करायचे आहे.

ग्रामपंचात निधी बघण्यासाठी गुगल प्लेस्टोअरवर अनेक एंड्राइड एप्लीकेशन्स उपलब्ध आहेत. योग्य एप्लीकेशन नाही शोधता आले तर तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

पुढील लेख देखील वाचा या महिलांना मिळणार ५ हजार रुपये अनुदान

त्यामुळे केवळ शासकीय एंड्राइड एप्लीकेशनच इंस्टाल करा जेणे करून तुमची फसवणूक होणार नाही व gram panchayat fund details संदर्भात तुम्हाला अगदी अचूक माहिती मिळेल.

ग्रामपंचायत निधी बघण्यासाठी शासनाचे अधिकृत एंड्राइड एप्लीकेशनच कसे इंस्टाल करावे आणि यामध्ये तुमच्या गावाची निवड करून कशा पद्दतीने माहिती बघावी या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

तुम्ही सांगितलेले एंड्राइड एप्लीकेशन सरकारचेच आहे आणि याच एप्लीकेशनवर आम्हाला अचूक माहिती मिलेल याची काय शाश्वती आहे असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर नक्कीच या प्रश्नांचे निरसन केले जाईल.

gram panchayat fund details
gram panchayat fund details

स्वतः पंतप्रधानांनी दिली याविषयी माहिती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक २४ एप्रिल २०२० रोजी e gram swaraj portal चा शुभारंभ केला होता. गावामध्ये जेवढेहि विकास कामे होतील त्यांचा संपूर्ण लेखा जोखा तुम्हाला या e gram swaraj app वर बघण्यास मिळेल असे त्यांनी सांगितलेले होते.

या योजना संदर्भातील प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.

तर मित्रांनो वरील लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रधानमंत्री यांचा e gram swaraj app संदर्भातील व्हिडीओ बघितला असेल तर आता तुमची खात्री झाली असेल कि आपण या e gram swaraj app चा उपयोग करून आपल्या गावातील झालेल्या विकासकामांची अतिशय बिनचूक माहिती घेऊ शकतो.

वास्तविक हि माहिती तुम्ही e gram swaraj website वर बघू शकता. परंतु मोबाईल एप्लीकेशनचा उपयोग करून माहिती बघितल्यास अधिक सोयीस्कर होते.

हे e gram swaraj app मोबाईलवर इंस्टाल कसे करावे या संदर्भातील एक व्हिडीओ या लेखाच्या शेवटी दिलेलाच आहे तरीपण या ठिकाणी खालील प्रोसेस जाणून घ्या.

Gram panchayat fund details अशा प्रकारे जाणून घ्या तुमच्या मोबाईलवर

  • गुगल प्ले स्टोअरमध्ये जा.
  • प्ले स्टोअरच्या सर्च मध्ये gram panchayat fund details जाणून घेण्यासाठी e gram swaraj असे टाईप करा.
  • Ministry of panchayat raj चे ई ग्राम स्वराज हे application ओपन होईल, मोबाईलमध्ये इंस्टाल करा.
  • जसे हि तुम्ही हे मोबाईल एप्लीकेशन ओपन कराल त्यावेळी राज्य, जिल्हा परिषद, block panchayat म्हणजेच तालुका आणि village मध्ये तुमचे गाव निवडल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करून सादर करा.
  • वरील प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत संदर्भातील 3 ठळक बाबी तुम्हाला दिसेल १) ER Details २) Approved Activities ३)Financial Progress
  • ज्या प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल त्या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसेल. क्रमांक 3 च्या म्हणजेच Financial Progress पर्यायावर क्लिक करून तुम्ही निधी किती आला आणि किती खर्च झाला याचा हिशोब बघू शकता.

तर मित्रांनो अशा प्रकारे gram panchayat fund details तुमच्या ग्रामपंचायतसाठी किती निधी आला या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *