Nandi drinking water नंदी दुध प्याले दुध काय आहे सत्य बघा

Nandi drinking water नंदी दुध प्याले दुध काय आहे सत्य बघा

नंदी दुध प्याले Nandi drinking water हा ट्रेंड कालपासून खूप मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. बऱ्याच जणांनी दावा केलेला आहे कि नंदीने दुध किंवा पाणी प्याले आहे.

या संदर्भातील अनेक व्हिडीओज सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. nandi drinking milk किंवा nandi drinking milk असा ट्रेंड काल दिवसभर बघण्यास मिळाला.

WhatsApp Group Links

सोशल मिडीयावर सुरु असलेल्या या ट्रेंडमुळे आम्ही देखील नंदीला दुध पाजण्यासाठी गेले आणि जाणून घेतले कि खरच नंदीने दुध प्ल्याले आहे कि नाही. परंतु नंदीने दुध किंवा पाणी काहीच प्रशासन केले नाही.

देव हा समाजाच्या श्रद्धेचा विषय आहे त्यामुळे यावर जास्त भाष्य करणे योग्य वाटत नाही. लोकांची देवावर खूप मोठी भावना आहे. यातून त्यांना चांगले काम करण्याची उर्जा मिळते आणि हि नक्कीच सकारात्मक बाब आहे.

nandi drinking water
nandi drinking water

Nandi drinking water

श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी आमची टीम ज्यावेळी नंदीला दुध पाजण्यासाठी गेली त्यावेळी दुध किंवा पाणी यापैकी कोणतेही द्रव्य नंदीने प्रशासन केले नाही.

नंदीने दुध प्रशासन केल्याचे अनेक व्हिडीओज Nandi drinking water आज सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.

काही वर्षापूर्वी गणपती दुध पित आहेत अशी देखील चर्चा सुरु झाली होती नंतर त्यावर तज्ञानी हे असे का घडते आहे हे स्पष्ठ करून सांगितलेले होते.

आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक

देवपूजा केल्याने, मंत्रोच्चाराने मनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात याला अगदी मानसशास्त्राची देखील बाजू आहे. तुम्ही एखादी बाब ज्या नजरेने बघता त्याच त्याच प्रकारची भावना त्यामध्ये निर्माण होत असते. परंतु काही बाबी अशा असतात ज्या घडणे शक्य नसतात.

एखादी पोस्ट व्हायरल करतांना त्याची शहानिशा होणे गरजेचे असते. केवळ आपणाला एखादा संदेश आला म्हणून तो पुढे पाठविण्यात काही अर्थ नसतो किंबहुना त्याची सत्यता पडताळून त्याविषयी असलेले गैर समज दूर करणे गरजेचे असते.

सोशल मिडीयाच्या या जमान्यामध्ये कोणतीही माहिती लगेच सगळीकडे पसरू शकते. माहिती पुढे पाठविण्यापूर्वी आपण त्या माहितीची खात्री करून घेतली पाहिजे जेणे करून त्या माहितीची अफवा होणार नाही.

तर मित्रांनो हि माहिती आपल्या मित्रांना जरूर पाठवा जेणे करून त्यांना पण या संदर्भात माहिती कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *