Matru vandana yojana मातृत्व वंदना योजना pdf downlod करा

Matru vandana yojana मातृत्व वंदना योजना pdf downlod करा

तुमच्या घरामध्ये गरोदर महिला असेल तर Matru vandana yojana PMMVY म्हणजेच प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेवून शासकीय अनुदान मिळवू शकता.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत गरोदर महिलांना कशा प्रकारे लाभ मिळतो, त्याची प्रोसेस कशी असते या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

या योजनेसाठी लागणारा अर्ज देखील या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या लिंकला टच करून किंवा क्लिक करून तुम्ही तो pdf अर्ज download करू शकता.

पी एम किसान निधीसाठी Ekyc सुरु

Matru vandana yojana PMMVY योजना अंतर्गत मिळणार ५००० रुपयांचा लाभ.

ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्ग, अल्प भूधारक, रोजंदार किंवा मोलमजुरी करणारे नागरिक वास्तव्य करत असतात. याला काही गावामध्ये अपवाद देखील असू शकतो मात्र बऱ्याच गावांमध्ये नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो.

अशावेळी एखाद्या शेतकरी कुटुंबामध्ये किंवा अशा कुटुंबामध्ये ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असेल अशा घरामध्ये एखादी गरोदर महिला असेल तर त्या महिलेस प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत ५००० एवढे शासकीय अनुदान दिले जाते.

पहिल्या वेळेस गर्भधारण करणारी महिला व स्तनपान करण्याऱ्या महिलेस तीन हफ्त्यामध्ये ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या योजने संदर्भातील खालील व्हिडीओ पहा

वृत्तपत्रातील बातमी बघा

Matru vandana yojana PMMVY योजनेच्या ठळक बाबी

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हि योजना १ जानेवारी २०१७ रोजी सुरु केली. मित्रांनो matru vandana yojana PMMVY संदर्भात खालील मुख्य बाबी समजून घ्या.

योजनेचे नावप्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना
कोणाकडून राबविली जाते योजनाकेंद्र शासन
Matru vandana yojana PMMVY शुभारंभ१ जानेवारी २०१७
विभागाचे नावमहिला व बाल विकास मंत्रालय.
पात्र व्यक्तीगरोदर महिला.
योजनेचे अनुदान५००० ते ६००० रुपये.
अधिकृत वेबसाईट लिंक.https://wcd.nic.in/

Matru vandana yojana PMMVY म्हणजेच प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गावातील अंगणवाडी महिला किंवा आशा वर्कर यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तीन प्रकारचे अर्ज असतात हे अर्ज तुम्हाला संबधित व्यक्ती ( अशा वर्कर किंवा आंगणवाडी महिला ) यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे.

योजनेचा अधिक माहितीसाठी येथे टच करा.

Matru vandana yojana PMMVY योजनेसाठी खालील प्रमाणे हफ्ते मिळतात.

पहिला हफ्ता गरोदर राहिल्यानंतर लगेच नोंदणी केल्यावर १००० रुपये

दुसरा हफ्ता महिला गरोदर राहिल्यानंतर ६ महिन्यानंतर चेक केल्यावर २००० रुपये

तिसरा हफ्ता बालकाचा जन्म झाल्यावर जन्माची नोंदणी केल्यानंतर तसेच बाळाचे पहिले लसीकरण पूर्ण झाल्यावर २००० रूपये.

वरील प्रमाणे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी तीन हफ्त्यामध्ये अनुदान दिले जाते.

हा लेख पण वाचा अशी बघा घरकुल ड यादी

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे लागतात. ती कागदपत्रे खालीलप्रमाणे.

  • आई वडिलांच्या आधार कार्डची छायांकित प्रत.
  • वडील व आई यांचे ओळख पत्र.
  • बाळाचे जन्म प्रमाणपत्र.
  • बँक पासबुक झेरॉक्स प्रत.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये जर कोणी गरोदर महिला असेल तर या संदर्भात शासकीय अनुदान तुम्ही मिळवू शकता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी महिला किंवा आशा वर्कर यांच्याशी संपर्क साधू शकता.

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज सदर करावे लागतात. ह्या अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

फॉर्म A डाउनलोड करा

फॉर्म B डाउनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *