shrivalli marathi song मंत्र्याकडून बक्षीस माहिती शासकीय वेबसाईटवर

shrivalli marathi song मंत्र्याकडून बक्षीस माहिती शासकीय वेबसाईटवर

विजय नारायण खंडारे यांना श्रीवल्ली मराठी गाणे shrivalli marathi song गायल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते कॅमेरा देऊन गौरविण्यात आले आहे.

अल्लू अर्जुन अभिनित पुष्पा चित्रपटाने संपूर्ण जगभर प्रसिद्धी मिळविलेली आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन यांनी तरुणाईला अक्षरशः वेड लावलेले आहे.

हा लेख पण वाचा पावनखिंड चित्रपट सुसाट

या दरम्यान विजय नारायण खंडारे Vijay Narayan Khandare यांनी पुष्पा द राइज भाग १ pushpa the rise part 1 या चित्रपटातील अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांच्यावर चित्रित झालेले गाणे श्रीवल्ली या गाण्याची नकल करून तुझी झलक वेगळी श्री वल्ली, काळजात तू भरली हे गाणे निर्मित केले.

shrivalli marathi song विजय खंडारे महाराष्ट्रत प्रसिद्द.

युट्युब या समाज माध्यमावर या गाण्यास मराठी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आणि विजय रातोरात स्टार झाला.

विजय खंडारे हा तरुण अनेक कॉमेडी व्हिडीओज पहिल्यापासून बनवत आलेला आहे. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील चांगला मिळत आलेला आहे परंतु shrivalli marathi song तुझी झलक वेगळी श्री वल्ली काळजात तू भरली या गाण्यामुळे खऱ्या अर्थाने त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे.

विजय नारायण खंडारे या तरुणांनी हे गाणे मोबाईलवरून चित्रित केले आहे. यामुळे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांनी त्यांना प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेऱ्याची भेट दिलेली आहे.

shrivalli marathi song

सोशल मिडीयावर करिअर शक्य

मुद्दा हा नाही कि विजय खंडारे यांना व्हिडीओ कॅमेऱ्याची भेट मिळाली तर मुद्दा असा आहे कि हि भेट त्यांना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून मिळाली. या संदर्भातील माहिती शासनाच्या महासंवाद संकेतस्थळावर देण्यात आली आहे आणि हि त्यांच्यासाठी याहून मोठी बाब आहे.

मित्रांनो यावरून एक गोष्ट मात्र नक्की सिद्ध होते कि तुमच्यात जर कला असेल तर तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळतेच. यासाठी फक्त तुम्हाला कठोर मेहनत आणि अखंडित प्रवास करावा लागतो.

इंटरनेटच्या दुनियेमध्ये आज अशक्य असे काहीच नाही. विजय खंडारे यांच्या अगोदर देखील बऱ्याच व्यक्तींना अशी रातोरात प्रसिद्धी मिळालेली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास हिमेश रेशमिया यांनी प्रकाश झोतात आणलेली गायिका राणू मंडल होय.

मागील दहा वर्षापासूनसमाज माध्यमांनी जी क्रांती केली आहे ती अगदी थक्क करणारी आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब या माध्यमांनी तर मनोरंजनासोबत पैसे कमविण्याची संधी देखील निर्माण करून दिलेली असल्याने अनेक तरुणांना व्यासपीठ निर्माण झाले आहे.

या लेखाच्या निमित्ताने आपण एवढाच बोध घेऊ शकतो कि आज तळागाळातील घटकांपर्यंत इंटरनेट पोचलेले आहे. याकडे तरुणांनी संधी म्हणून बघितल्यास त्यात करिअर होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *