मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना नवीन GR आला पहा कसा मिळणार लाभ

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना नवीन GR आला पहा कसा मिळणार लाभ

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना संदर्भातील नवीन जी आर आला असून योजनेची व्याप्ती वाढविण्यात आलेली आहे. जाणून घेव्यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना संदर्भातील तपशीलवार माहिती.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

ग्रामीण भागामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय शेळीपालन व्यवसाय तसेच कुक्कुटपालन व्यवसाय हे शेतीपूरक व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केले जातात. हे शेतीपूरक व्यवसाय करत असताना जनावरे जर आजारी पडली तर व्यवसायावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना संदर्भात जाऊन घ्या संपूर्ण माहिती. mukhyamantri pashu swasthya yojana

दुग्धव्यवसाय करण्यासाठी शेतकरी बांधव मोठी रक्कम भरून गाई किंवा म्हशींची खरेदी करत असतात. अशावेळी या जनावरांचे आरोग्य बिघडले तर दुग्धव्यवसायावर तर मोठा परिणाम होईलच परंतु शेतकऱ्यांची खूप मोठी आर्थिक हानी होऊ शकते.

जनावरे जर आजारी पडले आणि तुमच्या गावामध्ये पशुरुग्णालय नसेल तर अशा वेळी तालुक्याच्या ठिकाणी जनावरांना घेवून जाण्याशिवाय पर्याय राहत नाही.

या योजनेचा लाभ कसा घेतला जातो हे जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनाmukhyamantri pashu swasthya yojana शेतकऱ्यांच्या फायद्याची.

आजारी जनावरांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी नेणे म्हणजे खूप मोठे जिकरीचे काम असते. याच बाबींचा विचार करून मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आलेली होती.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना,

या योजने अंतर्गत ज्या गावांमध्ये दळणवळणाची साधने उपलब्ध होत नाहीत त्या गावामध्ये फिरत्या पशुचिकित्सा पथकाद्वारे आजारी जनावरांवर उपचार करणे हा या योजनेचा हेतू होता.

फिरते पशुचिकित्सालय म्हणजे पशुवैद्कीय अधिकारी आणि त्यांना आवश्यक असणारे समान घेवून हि गाडी अशा ग्रामीण भागामध्ये जाते ज्या ठिकाणी दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत किंवा शेतकरी त्यांचे आजारी जनावरे घेवून मोठ्या शहरामध्ये किंवा गावांमध्ये पोहचू शकत नाहीत.

पुढील लेखपण वाचा या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार अनुदान

पूर्वीपेक्षा हि योजना होणार अधिक व्यापक

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेस काही मर्यादा येत होत्या. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबविण्यासाठी फिरत्या पशुचिकित्सा पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्येच या योजनेचा लाभ दिला जात होता.

या योजनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

फिरत्या पशुचिकित्सा पथकांना एखादा तालुका नेमून दिला असेल आणि त्याच तालुक्याला लागून एखादे गाव असेल म्हणजेच त्या गावाचे अंतर कमी असेल मात्र ते या पथकांकडे नसेल तर अशावेळी अंतर जवळ असून देखील अशा गावातील शेतकऱ्यांना हि सेवा दिली जात नव्हती.

मात्र आता जिल्ह्यांच्या प्रशासकीय सीमांचा विचार न करता भौगोलिक सलगता विचारात घेवून फिरत्या पशुचिकित्सा पथकांना जे जिल्हे नेमून दिलेले आहेत त्या जिल्ह्याच्या नजीकच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना संदर्भातील नवीन जी आर म्हणजेच शासन निर्णय आज दिनांक १४ मार्च २०२२ रोजी काढण्यात आलेला आहे. हा जी आर बघण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

अशी करते योजना काम

या योजनेचा लाभ घेण्यासाठी १९६२ या टोल फ्री नंबरवर फोन करावा लागतो. त्यानंतर हि योजना जर तुमच्या तालुक्यामध्ये सुरु असेल तर फिरते पशुचिकित्सा पथक तुमच्या घरी येते आणि तुमच्या आजारी जनावरांचे उपचार करते.

तुमच्या जिल्ह्यामध्ये हि योजना सुरु आहे किंवा नाही हे देखील तुम्ही १९६२ या टोल फ्री नंबरवर फोन करून विचारू शकता. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हि योजना सुरु झालेली आहे याची माहिती वर दिलेल्या जी आरमध्ये दिलेली आहे. ती वाचून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *