कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण सुरु लगेच करा तुमची नोंदणी.

कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण सुरु लगेच करा तुमची नोंदणी.

तुम्हाला जर कुक्कुटपालन व्यवसाय कर्ज हवे असेल तर त्यासाठी बँक सगळ्यात अगोदर तुम्ही कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतलेले आहे काय याविषयी विचारणा करू शकते. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय पशिक्षण घेणे खूपच गरजेचे असते.

ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो याचे कारण म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय अगदी कमी खर्चात उभारला जावू शकतो.

दुग्धव्यवसाय किंवा शेळीपालन व्यवसाय सोबत कुक्कुटपालन व्यवसायाची तुलना केल्यास यासाठी खूपच कमी खर्च येतो. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये केला जातो.

कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण सुरु लगेच करा तुमची नोंदणी

शेतकऱ्यांनी कुक्कुट पालन व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी या उद्देशाने युवा परिवर्तन संस्थेंच्या वतीने दिनांक २८ ते ३० मार्च २०२२ रोजी तीन दिवसीय कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन केले असल्याची बातमी एका दैनिकामध्ये आज दिनांक २१ मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण

प्रशिक्षण ऑनलाईन असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील किंवा ज्यांना मराठी भाषेचे ज्ञान आहे असे कोणतेही शेतकरी या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकतात.

प्रशिक्षण प्रवेशासाठी १४ ते २६ मार्च २०२२ दरम्यान नोंदणी करण्याचे आवाहन देखील या बातमीमध्ये करण्यात आलेले आहे.

ज्या शेतकऱ्यांना या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी खालील बटनावर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करावी

कुक्कुट पालन व्यवसाय करण्यासाठी तुम्ही बँकेचे कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर अगोदर तुम्हाला या संबधित व्यावसायिक प्रशिक्षण घेणे योग्य राहील. कोणतीही बँक कर्ज देताना खालील बाबी विचारात घेऊ शकतात.

कर्ज मिळविण्यासाठी कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण उपुक्त ठरू शकते.

  • जो व्यक्ती कर्ज घेत आहे त्याचा व्यवसाय यशस्वी चालू शकेल काय.
  • जो व्यवसाय तुम्ही करणार आहत त्याविषयी तुम्हाला सखोल माहिती आहे काय अर्थात त्या संबधित तुम्ही शासकीय किंवा शासनमान्य संस्थेकडून प्रशिक्षण घेतलेले आहे का.
  • तुमच्या बँक व्यवहारावरून तुमची आर्थिक स्थिती कशी आहे याचा देखील विचार केला जावू शकतो.
  • तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करणार आहत तेथील दळणवळणाची व्यवस्था कशी आहे.
  • तुम्ही जो व्यवसाय करणार आहत त्याला त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध आहे का नसेल तर किती दूर उपलब्ध आहे.

प्रशिक्षणामध्ये मिळणार महत्वाची माहिती.

एक बाब या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे कि बँक कर्ज देईल किंवा नाही देणार परंतु तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्हाला कुक्कुटपालन व्यावसाय प्रशिक्षण घेणे महत्वाचे ठरते.

युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित प्रशिक्षणामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवाना तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घेऊन परीक्षार्थीना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायातील संधी,  कोंबड्याचे आरोग्य, व्यवस्थापन, कुक्कुटपालन संदर्भातील शासकीय योजना आणि इतर अत्यंत महत्वाची माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात येणार असल्याचा उल्लेख बातमीमध्ये केलेला आहे.

कोंबड्याचे व्यवस्थापन केल्यास फायद्यात जाणारा व्यवसाय.

कोणत्याही व्यवसायामध्ये यश मिळवायचे असेल तर त्यासाठी त्या व्यवसायाचे योग्य नियोजन करणे खूपच महत्वाचे असते. तुम्हाला जर ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी व्यवसायाचे नियोजन खूपच महत्वाचे असते.

याच संदर्भात या कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षणामध्ये माहिती दिली जाणार आहे जेणे करून तुमच्या कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होऊ शकेल.

कुक्कुट पक्षाच्या मासास बाजारामध्ये चांगला भाव.

बोकडाच्या मासाच्या तुलनेत कुक्कुट पक्षाच्या मासास ग्रामीण बाजारपेठेत जास्त मागणी असते याचे प्रमुख कारण म्हणजे कोंबडीच्या मासास कमी असणारा भाव.

ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो. बोकडाच्या मासाच्या तुलनेत कुक्कुट मास स्वत मिळत असल्याने या मासास खूप मोठी मागणी असते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कुक्कुट पालन व्यवसाय यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *