आजच्या लेखामध्ये सिंचन विहीर मोटार अनुदान योजना percolation vihir motor scheme संदर्भात माहिती जाणून घेवूयात जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल आणि शासकीय अनुदानावर तुम्ही इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करू शकाल.
विहिरीवरील सिंचन मोटरसाठी ऑनलाईन अर्ज करून शासकीय अनुदानावर मोटर खरेदी करता येते. तुमच्या शेतात सिंचन विहीर असेल आणि पाणी उपसा करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार हवी असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करा.
पुढील योजना पण पहा ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, मळणी यंत्रासाठी असा करा ऑनलाईन अर्ज
सिंचन विहीर मोटार अनुदान योजना पहा संपूर्ण माहिती.
अनेक शेतकऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक सिंचन विहीर मोटार अनुदान योजनासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. त्या शेतकऱ्यांना हि योजना मंजूर झालेली आहे.
त्या शेतकऱ्यांनी कसा अर्ज केला होता कोणकोणती कागदपत्रे अपलोड केली होती. किती रकमेची त्यांना पूर्वसंमती पत्र मिळाले आहे या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडीओ बघा. व्हिडीओची लिंक या लेकच्या सर्वात शेवटी दिलेली आहे.
हा अर्ज ऑनलाईन कसा केला जातो कोणत्या वेबसाईटवर केला जातो कसा केला जातो या संदर्भात आपण आजच्या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
पुढील लेख पण वाचा असा करा कडबाकुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज
सिंचन विहीर मोटार अनुदान योजनेचा लाभ घ्या.
शेतीला पाणी देण्यासाठी तुमच्याकडे सिंचन विहिर असेल तर पाणी उपसा करण्यासाठी त्यावर सिंचन मोटार बसविणे आवश्यक असते. इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप पैसे मोजावे लागतात.
बऱ्याच शेतकरी बांधवांकडे या सिंचन मोटार खरेदी करण्यासाठी पैसे नसतात परिणामी विहिरीमध्ये पाणी असून देखील ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देवू शकत नाहीत.
अशावेळी तुम्ही शासकीय अनुदानावर इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना mahadbt web portal वर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा करावा लागतो, योजना मंजूर झाल्यावर कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.
पुढील योजना पण बघा कांदाचाळ योजनेसाठी असा करा अर्ज
इलेक्ट्रॉनिक सिंचन विहीर मोटार अनुदान मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज
पाणी उपसा करण्यासाठी सिंचन सिंचन मोटार अनुदान मिळवायचे असेल तर खालीलप्रमाणे अर्ज करावा लागतो. खालील सांगितल्याप्रमाणे कृती करा.
- https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login हा web address सर्च केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महाडीबीटी शेतकरी पोर्टल ओपन होईल.
- तुमचा युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगइन करा. आधार नंबरला लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर otp घेवून देखील तुम्ही लॉगइन करू शकता.
- लॉगइन केल्यावर अर्ज करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
- सिंचन साधने व सुविधा या ऑप्शनवर क्लिक करा.
- तुमचा तालुका गाव आणि सर्व्हे क्रमांक या संदर्भातील संपूर्ण माहिती अगोरच तुम्हाला या ठिकाणी दिसेल जर हि माहिती दिसली नाही तर मन्युअलि टाका.
- मुख्य घटक या पर्यायासाठी सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.
- बाबीमध्ये पंपसेट इंजिन व मोटर या पर्याय निवडा.
- किती क्षमतेचा सिंचन पंप तुम्हाला हवा आहे त्या संदर्भातील पर्याय निवडा.
- नियम व अटीच्या स्वीकृतीसाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा.
- सर्वात शेवटी जतन करा या पर्यायावर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
या योजनेचा व्हिडीओ पहा.
सिंचन मोटार अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील एक व्हिडीओ देखील या ठिकाणी उपलब्ध आहे हा व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमच्या सिंचन मोटार अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करू शकता.
महाडीबीटी वेब पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी विविध योजना
महाडीबीटी वेब पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी विविध योजना असतात. ठिबक, तुषार, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर व इतर योजनांसाठी ऑनलाईन अर्ज केल्यास या योजनांचा लाभ शेतकरी बांधवाना मिळू शकतो.
शेतकऱ्यांच्या आधार नंबरला त्यांचा मोबाईल नंबर लिंक असेल तर शेतकरी स्वतः देखील या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात. जर आधारशी मोबाईल लिंक नसेल तर मात्र बायोमेट्रिक पद्धतीने तुम्हाला आधार पडताळणी करावी लागेल ज्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जावे लागेल.
शासनाच्या या विविध योजनांचा नक्की लाभ घ्या आणि आपल्या शेतीमध्ये प्रगती करा. महा डीबीटी वेबसाईटला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.