PM kisan ekyc status पहा तुमची ईकेवायसी झाली आहे किंवा नाही

PM kisan ekyc status पहा तुमची ईकेवायसी झाली आहे किंवा नाही

शेतकरी बंधुंनो जाणून घ्या तुमच्या पीएम किसान ईकेवायसी स्टेट्स PM kisan ekyc status. आजच्या लेखामध्ये जाणून घेवूयात कि तुमची pm किसान ekyc यशस्वीपणे झाली आहे किंवा नाही.

शेती संबधित योजनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

सध्या तरी सगळ्याच शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे आपली pm kisan ekyc कधी होईल. pm kisan samman nidhi योजनेसाठी ekyc तर सुरु झालेली आहे परंतु त्यामध्ये खूप अडथळे येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी csc सेंटरवर जावून ekyc केलेली आहे. काहींनी त्यांच्या मोबाईलवर ekyc केलेली आहे.

PM kisan ekyc status फक्त त्याच शेतकऱ्यांना दिसेल ज्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे.

तुम्हाला माहितच असेल कि पीएम किसान सन्मान pm kisan samman nidhi या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २००० रुपये हफ्त्याप्रमाणे वर्षाकाठी ६००० रुपये एवढे अनुदान मिळते.

यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबधित कागदपात्रांची पूर्तता झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हि अनुदानाची रक्कम जमा होत असते.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी. Pm kisan online registration.

PM kisan ekyc करण्यास येत आहे अडथळा

पीएम किसान सन्मान योजनेची ईकेवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुदतवाढ जरी मिळालेली असली तरी सध्या pm किसान योजनेची ekyc करण्यास खूपच अडथळा येते आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे कि आपली ekyc झाली आहे किंवा नाही. तर मित्रांनो खालील पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमची पीएम kisan ईकेवायसी झाली आहे किंवा नाही हे तुमच्या मोबाईलवर अत्यंत सोप्या पद्धतीने तपासू शकता.

पीएम किसान सन्मान निधी अधिकृत वेबसाईट

मोबाईलवर असे चेक करा तुमची ईकेवायसी झाली आहे किंवा नाही

पहिली पद्धत

 • मोबाईलमधील ब्राउजर उघडा.
 • ब्राउजरच्या सर्चबारमध्ये pmkisan.gov.in हा वेब ॲड्रेस टाका.
 • वेबसाईट ओपन झाल्यावर Farmers Corner या पर्यायाखाली ekyc हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • तुमचा आधार आणि मोबाईल नंबर टाका आणि गेट मोबाईल ओटीपी Get mobile otp या बटनावर क्लिक करा.
 • या ठिकाणी जर तुम्हाला Mobile number already exist असा संदेश आल्यास तुमची ekyc झालेली आहे असे समजा
PM kisan ekyc status

दुसरी पद्धत

 • pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा
 • या ठिकाणी तुम्हाला Farmers Corner या ऑप्शनखाली beneficiary status हा पर्याय शोधायचा आहे.
 •  pm kisan वेबसाईटवर दिसत असलेल्या beneficiary status या पर्यायावर टच करा.
 • त्यानंतर एक चौकट दिसेल त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाका आणि त्यानंतर गेट डेटा Get data या बटनावर टच करा किंवा क्लिक करा.
 • जसे हि तुम्ही Get data या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या अकाऊंटची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल.
 • या माहितीमध्ये जर पेमेंट मोड AADHAR असे आले असेल तर तुमची pm किसान EKYC असे समजा.
PM kisan ekyc status

अधिक माहितीसाठी ईकेवायसी संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

pm kisan ईकेवायसी stetus मोबाईलवर कसे चेक केले जाते या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

तर मित्रांनो हि तर होती एक छोटीशी ट्रिक ज्या आधारे तुम्ही तुमच पीएम Kisan Ekyc यशस्वीपणे झाली आहे किंवा नाही हे तपासण्याची पद्दत. अशा पद्धतीने तुम्ही तुमची किंवा तुमच्या शेतकरी मित्रांची pm किसान सन्मान निधी संदर्भातील माहिती तपासू शकता pm kisan ekyc status.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *