शेतकऱ्यांसाठी खुशखबर अतिवृष्टी नुकसानभरपाईचा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होण्यास सुरुवात. जुलै २०२१ रोजी झालेल्या पूरपरिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले होते त्या बदल्यात त्यांना नुकसानभरपाई देखील मिळालेली होती.
परंतु ७ मार्च २०२२ रोजी एक शासन निर्णय म्हणजेच जी आर काढण्यात आला. या शासन निर्णयानुसार जुलै ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान झालेल्या पूर परिस्थिती व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईमध्ये वाढ देण्यात आली होती.
अतिवृष्टी नुकसानभरपाईचा दुसरा हफ्ता बँकेत पैसे जमा झाल्याचा स्क्रीनशॉर्ट पहा.
कोणत्या जिल्ह्यासाठी किती अनुदान मिळणार आहे या संदर्भातील यादी देखील या जी आर सोबत देण्यात आलेली आहे. या जी आर नुसार शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार नुकसानभरपाई मिळणे आवश्यक होते ती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
बँकेत पैसे जमा झाल्याचा स्क्रीनशॉर्ट पहा.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसानभरपाई निधी जमा होत असल्याचे अनेक संदेश शेतकऱ्यांस येण्यास सुरुवात झालेली आहे.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक नुकसानभरपाईचे पैसे जमा होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंद निर्माण झालेला आहे.
शेतकऱ्यांना या मदतीचा होईल फायदा.
पिकांचे नुकसान झाल्यानंतर देखील अनेक शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नसल्याने अनेक शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण होते. अशामध्ये मिणारी हि मदत शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना हि नुकसानभरपाई मदत मिळणार आहे त्यांची यादी संबधित ज्या त्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तुमचा जिल्हा जर या नुकसानभरपाई यादीमध्ये असेल तर तुम्हाला देखील हि मदत मिळू शकते. अधिक माहितीसाठी संबधित अधिकारी साहेबांशी तुम्ही संपर्क साधू शकता.
विविध शासकीय योजनांची माहिती मराठीमध्ये तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा. आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी होऊन देखील तुम्ही विविध योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता.