आपली चावडी aapli chawadi जमीन कोणी घेतली कोणाला विकली

आपली चावडी aapli chawadi जमीन कोणी घेतली कोणाला विकली

आजच्या लेखामध्ये आपली चावडी aapli chawadi संदर्भात माहिती जाणून घेवूयात. शेतकऱ्यांना शेती संबधित नवनवीन विषयावर आम्ही माहिती देण्याचा प्रत्यत्न करत असतो ज्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.

अशीच शेती संबधित विविध विषयावरील माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवायची असेल व या संदर्भातील अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर लगेच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा.

आपली चावडी aapli chawadi विषयी संपूर्ण माहिती बघा.

जमीन हा विषय शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे आजच्या लेखामध्ये माहिती जाणून घेवूयात ई आपली चावडी aapli chawadi या विषयी संपूर्ण माहित जाणून घेणार आहोत. या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ दिलेला आहे तो बघून देखील तुम्ही सर्व तपशील बघू शकता.

ग्रामीण भागामध्ये गावामध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर ज्या दिवशी एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्या दिवसाच्या एक दिवस अगोदर गावामध्ये दवंडी दिली जाते आणि या संदर्भात नागरिकांना सूचित केले जाते.

साधारणपणे तो हनुमान मंदिरावर किंवा गावातील मुख्य दर्शनीभागामध्ये घेतला जातो ज्याला आपण चावडी म्हणतो. गावातील प्रत्येक निर्णयावर या चावडीमध्ये विचार विनिमय केले जातात आणि यावर एकमताने निर्णय घेतले जातात.

हि माहिती पण कामाची आहे अशी करा ऑनलाईन सातबारा दुरुस्ती मोबाईलवरून

शासनाच्या आपली चावडी aapli chawadi वेबसाईटवर बघा जमिनीचे सर्व व्यवहार.

आता थोडा शासनाचा विचार करूयात. शासनाची शेतकऱ्यांसाठी एखादी योजना असेल किंवा शेती संबधित कोणती माहिती असेल आणि ती गावातील नागरिकांना द्यायची असेल तर ग्रामसेवक किंवा तलाठी यांना गावात यावे लागते. ग्रामपंचायत किंवा गावातील चावडीमध्ये हा शासन निर्णय किंवा शासकीय योजनेची माहिती दिली जाते.

ज्यावेळी हि माहिती दिली जाते त्यावेळी प्रत्येक नागरिक चावडीवर येईलच असे नाहीत त्यामुळे काही नागरिकांना या शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची माहिती न मिळण्याची शक्यता असते.

याच बाबीच महत्व लक्षात घेवून शासनाच्या महसूल विभागाने आपली चावडी हि संकल्पना राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे.

हि माहितीपण वाचा असा काढा १५ रुपयामध्ये डिजिटल सातबारा

आपली चावडीद्वारे कळेल कोणी कोणास जमीन विकली किंवा घेतली.

तुमच्या गावातील एखाद्या शेतकऱ्याने त्याची जमीन कोणाला तरी विकली असेल असे समजा. ती जमीन तुमच्या जमिनीशेजारी आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याने कोणाला आणि किती किमतीला जमीन विकलेली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपली चावडीद्वारे तुमच्या मोबाईलवर बघू शकता.

दुसऱ्याची माहिती बघणे योग्य आहे का.

अर्थात योग्यच असेल त्यामुळे तर शासनाने हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या प्रकारे गावतील चावडीवर गावातील निर्णय होतात. अगदी अशीच माहिती तुमच्या जमिनीशी सुरु असलेले व्यवहार गावातील सर्व नगरीकांना कळावे यासाठी आपली चावडी aapli chawadi तयार करण्यात आलेली आहे.

या माहितीचा फायदा काय होईल.

समजा अ आणि ब नावाचे दोन शेतकरी आहेत ज्यांची जमीन शेजारी आहे. अ हा शेतकरी ब शेतकऱ्याच्या जमिनीशी निगडीत आहे जसे कि शेत रस्ता किंवा इतर बाबी तर अशावेळी ब या शेतकऱ्याने गुपचूप जमीन विकली तर अ या शेतकऱ्यास अडचण येवू शकते.

अशा परिस्थितीमध्ये अ या शेतकऱ्याने जर आपली चावडीवर हि माहिती तपासली तर तर तो ब या शेतकऱ्यावर आक्षेप घेवू शकतो.

खरेदी, वाटणीपत्रक, वारसफेर इत्यादी जे व्यवहार तुमच्या गावात झाले असतील तर या संबधित कोणताही व्यवहार तुम्ही अगदी चुटकीसरशी तुमच्या मोबाईलवर बघू शकता. या साठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

असे चेक करा तुमच्या गावातील सर्व जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार मोबाईलवर

  • गुगलमध्ये टाका भूमी अभिलेख bhumiabhilekh
  • Maharashtra government revenue department म्हणजेच महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
  • या ठिकाणी आपली चावडी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा कॅपचा कोड टाका आणि आपली चावडी पहा या बटनावर क्लिक करा.

जसे हि तुम्ही वरील माहिती टाकल आणि सबमिट कराल त्यावेळी तुमच्या गावातील संपूर्ण जमीनच्या व्यवहाराची माहिती तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल. फेरफार नंबर, फेरफार प्रकार, फेरफार दिनांक, हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख, सर्वे किंवा गट नंबर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.

अधिकृत वेबसाईट लिंक

या संपूर्ण माहितीचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमच्या गावातील जमिनींच्या व्यवहारांचे तपशील बघू शकता. व्हिडीओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

व्हिडीओ पहा.

माहिती कशी कोणत्या वेबसाईटवर बघावी?

महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर हि माहिती बघता येते.

लॉगीन करावे लागते का?

जमिनीचे तपशील बघण्यासाठी लॉगीन करणे गरजेचे आहे. लॉगीन कसे करावे या संदर्भात या लेखामध्ये व्हिडीओद्वारे सविस्तर समजावून सांगितलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *