नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप मिळणार GR

नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप मिळणार GR

आजच्या लेखामध्ये  vihir yojana maharashtra 2022 नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप योजना borewell/ dug well with solar pump 5 HP scgene संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

शेती व्यवसायामध्ये पाणी हा घटक खूपच महत्वाचा आहे. पाणी जर असेल तर जमिनीची प्रत थोडी हलकी जरी असली तरी त्यामध्ये चांगले उत्पन्न घेता येते.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न वाढावे यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप या योजनेचा उद्देश असा आहे कि शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी.

हि योजना पण बघा जुनी विहीर दुरुस्तीसाठी मिळणार अनुदान

नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप जी आर आला vihir yojana maharashtra 2022.

तुमच्याकडे जर शेती असेल तर शेतामध्ये विहीर खोडून पिकांसाठी पाण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. सध्या प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढली असून पिकांना पाणी देण्यासाठी विहीर खोडणे शेतकऱ्यांस परवडण्यासारखे नसते.

अशावेळी तुम्ही विहिरी खोदकामासाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेवू शकता vihir yojana maharashtra 2022.

विहीर खोदकाम आणि विहिरीवर सोलर पंप म्हणजेच सौर उर्जा पंप बसविण्यासाठी शासन अनुदान देणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय नुकताच शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर म्हणेच ७ एप्रिल २०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

जी आर बघा.

या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या शेतात विहीर खोदणे किंवा बोअरवेल घेणे व त्या विहिरीवर किंवा बोअरवेलवर पाणी उपसा करण्यासाठी सौर पंप बसविणे यासाठी खालील पद्धतीने अनुदान दिले जाणार आहेvihir yojana maharashtra 2022.

पुढील योजना पण पहा विहिरीतील मोटर खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान

या योजनेसंदर्भात खालील संपूर्ण माहिती जाणून घ्या.

नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप योजनेची माहिती खालीलप्रमाणे.

 • योजनेचे नाव – बोअरवेल किंवा विहीर खोदकाम ५ एच पी सौर पंपासहित.
 • काय आहे या योजनेचा उद्देश – ज्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना वनहक्क कायदा अंतर्गत वनपट्टे मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थींच्या शेती उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन विहीर करणे व त्यावर सौर उर्जा पंप बसविणे.
 • या योजनेसाठी निधी – १८०० लक्ष.
 • योजनेचा कालावधी – १ वर्ष.
 • योजनेचे कार्यक्षेत्र – महाराष्ट्र राज्य.
 • खर्चाचे अंदाजपत्रक – १) विहीर – ३,००,०००.०० २) ५ एचपी सोलर पंप पॅनल ३,२५,०००.००
 • योजनेची अमलबजावणी करणारी यंत्रणा – १) विहिर – संबधित प्रकल्प अधिकारी, २) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व कृषी विभाग ३) भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ३) ग्रामीण पाणी पुरवठा व इतर शासकीय योजना.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे documents for vihir yojana maharashtra 2022.

 • रहिवासी दाखला.
 • जातीचा दाखला.
 • वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र.
 • सोलार पंप मिळविण्यासाठी जलस्त्रोत उपलब्ध असल्याचा दाखला.
 • यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र.
 • ज्या ठिकाणी विहीर खोडणे प्रस्तावित आहे त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे प्रमाणपत्र ( भूजल सर्वेक्षण विभागाचे प्रमाणपत्र )

योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे उपलब्ध करून वर दर्शविल्याप्रमाणे संबधित विभागाकडे सादर करावीत.

विहीर योजनेचा अर्ज कोठे सादर करावा?

mahadbt पोर्वटलर ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर विहीर योजनेसाठी अनुदान मिळू शकते.

विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?

विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे ती वाचून घ्या.

पात्र व्यक्ती कोणत्या आहेत?

अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *