आजच्या लेखामध्ये आपण जुना सातबारा जुने फेरफार नोंदवही व जमिनीचे इतर जुने कागदपत्रे डाउनलोड असे केले जातात त्याची पद्धत काय आहे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकरी म्हटला कि पटकन आपल्या डोळ्यासमोर शेती येते एकूणच काय तर शेतकऱ्यांचे शेती आणि सातबारा यांच्याशी अतूट नाते असते. सर्व जग अगदी झपाट्याने बदलत आहे अशावेळी शेतीचे देखील प्रचंड प्रमाणात आधुनिकीकरण झाले आहे.
कोणतीही गोष्ट असू द्या अगदी मोबाईलवर त्या गोष्टीची माहिती आपल्याला चुटकीसरशी मिळते. शेतीचे बरेच दास्तेवज आता ऑनलाईन मिळत आहेत.
जुना सातबारा जुने फेरफार मिळविण्यासाठी जावे लागत होते तहसील ऑफिसमध्ये
सातबारा असो किंवा एकूण जमिनीचा दाखला किंवा मग फेरफार नंबर असो कोणतीही माहिती आता मोबाईलवर मिळते त्यामुळे शेतकरी बांधवांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो.
ज्या प्रकारे सातबारा आणि इतर कागदपत्रे चुटकी सरशी मिळतात त्या प्रमाणात जमिनी संदर्भातील जुने दास्तेवज मिळविण्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागते.
जुना सातबारा किंवा फेरफार किंवा इतर कोणतेही कागदपत्रे मिळवायचे असतील तर तहसीलमध्ये अर्ज करावा लगतो आणि मग ते कागदपत्रे तुम्हाला काही वेळानंतर शोधून दिले जाते.
पीव्हीसी पाईप लाईनसाठी शासनाकडून सबसिडी हवी आहे का मग असा करा ऑनलाईन अर्ज मिळेल
जुना सातबारा जुने फेरफार PDF मध्ये download करा.
कधी कधी होते काय कि जुन्या कागदपत्रांची खूप आवश्यकता भासते तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास वेळ अशावेळी तुम्हाला वाटते कि जुना सातबारा किंवा जुने जमिनीचे दस्ताऐवज ऑनलाईन मिळाले असते तर किती बरे झाले असते.
तर शेतकरी बंधुंनो तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे कि तुमच्या जमिनीचे जुने म्हजेच इसवी सन १९९० पेक्षाही मागील कालावधीचे जमिनीचे जुने दस्ताऐवज तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्पुटरवर मिळवू शकता अगदी चुटकीसरशी.
जमिनीचे जुने कागदपत्रे ऑनलाईन कसे मिळवावेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
कुक्कुटपालन व शेळीपालन शेडसाठी मिळणार अनुदान पहा संपूर्ण माहिती
लॉगीन करण्यासंदर्भातील माहिती.
- महाभूमी अभिलेख ई रेकॉर्ड या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे. या वेबसाईटची अधिकृत लिंक खाली दिलेली आहे.
- वेबसाईटवर गेल्यावर लॉगीन आयडी पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून तुम्हाला लॉगीन करायचे आहे.
- तुमच्याकडे जर लॉगीन आयडी आणि पासवर्ड नसेल तर नवीन नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करून तुम्हाला हा लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळविता येईल.
नवीन नोंदणी करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. New registration process.
- लॉगीन करण्याच्या चौकटीच्या सर्वात खाली New user registration असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- जसेही तुम्ही New user registration पर्यायवर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती टाकायची आहे.
- संपूर्ण माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर सर्वात शेवटी लॉगीन आयडी तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही जो लॉगीन आयडी निवडाल तो जर उपलब्ध नसेल तर पर्यायी लॉगीन आयडी तुम्हाला दिसेल त्यापैकी एक लॉगीन आयडी तुम्हाला घ्यायचा आहे. पासवर्ड लक्षात राहील असा सेट करा.
- लॉगीन आयडी आणि पासवर्ड व्यवस्थित निवडल्यानंतर दिलेल्या पर्यायायामधून एक Secret question निवडायचा आहे, तो निवडल्यानंतर त्याचे उत्तर तुम्हाला समोरच्या चौकटीमध्ये टाईप करायचे आहे.
- तुमचा पासवर्ड किंवा लॉगीन आयडी विसरलात तर Secret question च्या आधारे तो परत रिकव्हर करता येतो.
- सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
जमिनीचे जुने दस्तावेज ऑनलाईन शोधण्याची पद्धत.
- लॉगीन आयडी पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.
- Office या पर्यायासाठी Tahsil office हा पर्याय निवडा.
- तुमचा तालुका, जिल्हा आणि गाव दिलेल्या यादीमधून निवडा.
- जे कागदपत्रे हवे आहेत ते दिलेल्या यादीमधून निवडा.
- तुमच्या जमिनीचा गट नंबर टाकून सर्च करा.
- जसे हि तुम्ही सर्च कराल विविध कागदपत्रे तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतील त्यापैकी जे कागदपत्र हवे आहे ते डाउनलोड करण्यासाठी Add to cart या बटनावर क्लिक करा.
- review cart या बटनावर क्लिक करून तपासून घ्या आणि Continue या बटनावर क्लिक करा.
- Download Available files या बटनावर क्लिक करताच हि File तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये download होईल.
- हे दस्तावेज pdf मध्ये तुम्हाला मिळेल त्याची प्रिंट काढून घ्या.
अशा पद्धतीने जमिनीचे जुने दस्तावेज तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर डाउनलोड करू शकता. हि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणे करून त्यांना या माहितीचा उपयोग होईल.
हि माहिती आपल्या शेतकरी बांधवाना नक्की पाठवा जेणे करून त्यांना या व्हिडीओमुळे जुनी कागदपत्रे बघता येईल. त्यासाठी खालील बटनांचा उपयोग करा.