Goat cluster scheme महाराष्ट्रामध्ये शेळी समूह योजना सुरु झाली

Goat cluster scheme महाराष्ट्रामध्ये शेळी समूह योजना सुरु झाली

महाष्ट्र शासनाने sheli samuh yojana शेळी समूह योजना म्हणजेच Goat cluster scheme सुरु केली असून या संदर्भातील शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पासिद्द करण्यात आलेला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना या Goat cluster scheme योजनेचा खूप मोठा लाभ होऊ शकतो. त्यामुळे शेळी समूह योजना म्हणजेच Goat cluster scheme संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

गरीबाची गाय म्हणजेच शेळी अशी म्हण मराठीमध्ये आहे. शेळीला गरीबाची गाय म्हटले जाते कारण अगदी कमी पैशांमध्ये शेळी जास्त उत्पन्न देत असते.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या. असा करा शेळी पालन व कुक्कुटपालन शेडसाठी अर्ज

Goat cluster scheme म्हणजेच शेळी पालन समूह योजनेमुळे होणार रोजगार निर्मिती.

ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणत शेळी पालन व्यवसाय केला जातो. या व्यवसायातून खूप मोठा रोजगार देखील उपलब्ध होतो ज्याचा फायदा ग्रामीण भागातील खूप मोठ्या बेरोजगार वर्गास होतांना दिसत आहे.

महाराष्ट्रामध्ये अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन म्हणून या शेळीपालन व्यवसायाकडे बघितले जाते. शेळी पालन समूह योजनामुळे ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती होऊ शकते.

पुढील लेख पण वाचा जुना सातबारा व इतर कागदपत्रे डाउनलोड करा.

Goat cluster scheme म्हणजेच शेळी पालन समूह योजनेस मंत्रीमंडळाने १६ फेब्रुवारीला दिली होती मंजुरी

शेळी पालन व्यवसायापासून कोणकोणते फायदे होतात हे बहुतेकांना माहितच असेल. मांस, दुध व शेतीसाठी लेंडीखत इत्यादी मिळते.

याच बाबीचे महत्व अधोरेखित करून शासनाने शेळी समूह योजना हि एक नवीन योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे ज्याला इंग्रजीमध्ये Goat cluster scheme असे म्हणतात. वास्तविक पाहता १६ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये या Goat cluster scheme योजनेस मान्यता देण्यात आली होती आता दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी या योजनेचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.

१६ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठक संदर्भातील माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.

शेळी समूह योजनेचा उद्देश purpose of Goat cluster scheme

  • समूह विकासातून महाराष्ट्र राज्यातील शेळीपालन व्यवसायास गती देणे.
  • नवीन उद्योजक निर्माण करणे.
  • शेळी पालक व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देणे.
  • ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करणे.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या मौजे पोहरा जिल्हा अमरावती येथे हि शेळी समूह योजना म्हणजेच Goat cluster scheme राबविली जाणार आहे.

Goat cluster scheme

पोहरा येथील प्रक्षेत्र प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर पाच महसूल विभागामध्ये प्रत्येकी एक या प्रमाणे ५ क्षेत्रावर शेळी समूह योजना राबविण्यास तत्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. शेळी पालन समूह योजनेचा जी आर बघण्यासाठी येथे क्लिक करा. ( येथून लिंक ओपन होत नसेल तर खालील लिंकवर क्लिक करा )

योजनेचा जी आर बघा.

खालील महसुली विभागामध्ये शेळी समूह योजना राबविली जाणार आहे.

अ.क्र.योजनेचे ठिकाणयोजनेचे कार्यक्षेत्र
मौजे बोंद्री तालुका रामटेक जिल्हा नागपूर.नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचीरोली.
मौजे तीर्थ तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.औरंगाबाद, जालना, परभणी हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.
मौजे रांजणी तालुका कवठेमहाकाळ जि. सांगली.पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मौजे बिलाखेड, तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव.नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर.
मौजे दापचरी जिल्हा पालघरमुंबई शहर, मुंबई उपनगरे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग.

प्रमाणे महसुली विभागामध्ये हि योजना राबविली जाणार आहे.

शेळी पालन समूह योजनेतून नेमके काय मिळणार.

  • हि योजना ज्या जिल्ह्यासाठी लागू आहे त्या जिल्ह्यातील ३०००० शेतकऱ्यांचा समूह करून त्यांना शेळी पालन व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे. शेळी पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्यांचे कौशल्य विकास वाढविणे आणि त्यांचे जीवनमन उंचाविणे.
  • ग्रामीण भागातील स्थानिक बाजार पेठेमध्ये शेळ्यांना कमी बाजारभाव मिळतो. शेळी पालन समूह योजनेमुळे जास्त भाव मिळणार आहे त्यामुळे शेळी पालक व्यावसायिकांची विपणन marketing समस्या सुटणार आहे.
  • शेळीच्या मासास खूप मोठी मागणी असते परंतु शेळीच्या दुधास पाहिजे तसा भाव मिळत नाही याहीपेक्षा शेळीच्या दुधावर जास्त प्रक्रिया होत नाही असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही. या योजनेमुळे शेळ्यांपासून मिळणाऱ्या दुधावर प्रक्रिया केली जाईल ज्यामुळे उद्योजक निर्माण होऊन रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.

अशा प्रकारे हि शेळी समूह योजना म्हणजेच Goat cluster scheme महाराष्ट्रामध्ये सुरु होणार नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *