शेतीसाठी महत्वाची बाब असलेला diesel pump subsidy संदर्भात माहिती जाणून घेवूयात. डीजल पंप सब्सिडी म्हणजेच अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.
तुम्हाला माहित आहे का कि डीझेल पंप खरेदी करण्यासाठी शासकीय अनुदान मिळते. तुम्ही शेतकरी असाल त्याचप्रमाणे तुमच्या शेतामध्ये विहीर देखील असेल परंतु पाणी उपसा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मोटरला हवी असणारी लाईट नसेल तर मात्र अनेक शेतकरी डीझेल पंप हा पर्याय शोधतात.
डीजल पंप सब्सिडी संदर्भातील संपूर्ण माहिती diesel pump subsidy
अशावेळी diesel pump subsidy शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरू शकते. डीजल पंप सब्सिडी मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास यावर शासनाकडून सबसिडी मिळते ज्यामुळे शेतकरी बांधवाना पंप खरेदी करण्यास मदत मिळते.
डीझेल पंपाची खरेदी किंमत जास्त असल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना हा डीझेल पंप घेणे परवडत नाहीत. अशावेळी जर तुम्ही शासकीय अनुदानावर डीझेल पंप खरेदी केला तर नक्कीच तुम्हाला सहाय्य ठरेल.
diesel pump subsidy म्हणजेच डीझेल पंप अनुदान मिळविण्यासाठी कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा कसा करावा या संदर्भात जर तुम्हाला माहित नसेल तर आजच्या लेखामध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
केवळ माहितीच नव्हे तर डीझेल पंप अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील व्हिडीओ देखील बघणार आहोत. हा व्हिडीओ बघून तुम्ही देखील डीझेल पंप अनुदान योजनेचा लाभ घेवू शकता.
व्हिडीओ लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे. तो व्हिडीओ बघून तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज करू शकता.
पुढील योजनेचा पण लाभ घ्या. असा करा पीव्हीसी पाईप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज.
diesel pump subsidy साठी ऑनलाईअर्ज करणे अत्यंत सोपे.
शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना असतात परंतु त्यांना या योजनांची माहिती नसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा योजनांचा लाभ घेवू शकत नाहीत. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त योजनांची माहिती घेवून त्या संदर्भात पाठ पुरावा करावा जेणे करून त्यांना या शासकीय योजनांचा लाभ मिळू शकेल.
विहिरीमध्ये कितीही पाणी असेल परंतु ते पाणी पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांकडे सर्व सुविधा असणे आवशयक आहे. जर या सुविधा नसेल तर विहिरीमध्ये पाणी असून देखील पाण्याअभावी पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
त्यामुळे आज आपण माहिती जाणून घेणार आहोत कि कशा पद्धतीने डीझेल पंप अनुदान diesel pump subsidy योजनेचा लाभ घेतला जावू शकतो आणि यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो.
पुढी योजना पण बघा. नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत मिळणार ५ एचपीचा सोलर पंप
असा करा डीझेल पंप योजना ऑनलाईन अर्ज.
diesel pump subsidy मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. खालील पद्धत समजण्यास अवघड जात असेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून व्हिडीओ पहा.
- आपले सरकार महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर जा.
- युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा किंवा आधार otp द्वारे लॉगीन करा.
- अर्ज करा या निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
- सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि सर्वेक्षण नंबर अगोदरच आलेला दिसेल.
- मुख्य घटकमध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.
- बाब या पर्यायाच्या खाली दिसणाऱ्या चौकटीमध्ये क्लिक करा. पंपसेट, इंजिन व मोटर हा पर्याय निवडा.
- हिरव्या रंगाच्या जतन करा या बटनावर क्लिक करा.
- जतन करा करा या बटनावर क्लिक करताच एक सूचना येईल ती वाचून घ्या.
- अर्ज सादर करा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
- परत एक सूचना येईल ती देखील वाचून घ्या.
- पहा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा आणि प्राधान्य क्रमांक निवडा.
- योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी चौकटीमध्ये क्लिक करा.
- अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
diesel pump subsidy पेमेंट करण्याची पद्धत.
महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत डीजल पंप सब्सिडी मिळविण्यासाठी २३.६० रुपये एवढे छोटेसे पेमेंट करावे लागते ते करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा या बटनावर क्लिक करताच Make payment असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
- पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी विविध पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि पेमेंट करा.
- यशस्वीपणे पेमेंट केल्यानंतर पोच पावती डाउनलोड करून घ्या.
डीजल पंप सब्सिडी योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा कारवा या संदर्भातील व्हिडीओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
अशाप्रकारे महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर डीजल पंप सब्सिडी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे. हि माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा.