Mulching paper yojana 2024 मल्चिंग पेपरसाठी असा करा ऑनलाईन अर्ज.

Mulching paper yojana 2024 मल्चिंग पेपरसाठी असा करा ऑनलाईन अर्ज.

Mulching paper yojana संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या जेणे करून तुम्हाला mulching paper शासकीय अनुदान मिळू शकेल.

शेतीसाठी मल्चिंग पेपर खूप मोठ्या प्रमाणत वापरला जात आहे. mulching paper वापरल्यामुळे शेतामध्ये जास्त प्रमाणत तण होत नाही परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाचतो.

तुम्हाला मुद्रा लोन हवे आहे काय? असा करा ऑनलाईन अर्ज

Mulching paper yojana शासकीय अनुदानावर घ्या मल्चिंग पेपर

केवळ तण नियंत्रणच नव्हे तर इतरही अनेक फायदे मल्चिंग पेपरचे आहेत ते खालीलप्रमाणे.

  • जमिनीत होणाऱ्या पिकांस हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव केला जातो.
  • मल्चिंग पेपरखाली सूर्यकिरण पोचत नसल्याने तण वाढ होत नाही.
  • mulching paper च्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी दूर जातात.
  • मल्चिंग पेपरमुळे जमिनीचे तापमान वाढते त्यामुळे जमीन निर्जंतुक करण्यास मदत होते.

वरील प्रमाणे मल्चिंग पेपरचे शेतीमध्ये अनेक फायदे आहेत त्यामुळे अनेक शेतकरी शेतीमध्ये मल्चिंग पेपरचा उपयोग करतांना दिसत आहे. विशेषतः भाजीपाला पिकांसाठी मल्चिंग पेपरचा खूप मोठ्या प्रमाणत उपयोग केला जातो.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

महाडीबीटी पोर्टलवर करावा लागतो ऑनलाईन अर्ज mulching paper yojana online application.

मल्चिंग पेपर बाजारातून विकत घेण्यासाठी तुम्हाला बरेच पैसे मोजावे लागतात. आर्थिक अडचणीमुळे सर्वच शेतकरी त्यांच्या शेतामध्ये मल्चिंग पेपर वापरू शकत नाहीत. परंतु महाडीबीटी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून मल्चिंग पेपर खरेदी करण्यासाठी तुम्ही शासकीय अनुदान मिळवू शकता.

मल्चिंग पेपरसाठी अनुदान मिळवायचे असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

या लेखाच्या शेवटी एक व्हिडीओ लिंक देखील देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हिडीओ बघा आणि त्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज करा.

असा करा ऑनलाईन अर्ज

  • महाडीबीटी शेतकरी वेबसाईटवर जा.
  • युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
  • फलोत्पादन या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
  • एक अर्ज तुमच्या स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये योग्य ती माहिती भरा. जसे कि प्लास्टिक हा पर्याय निवडा.
  • जेवढ्या क्षेत्रावर तुम्हाला मल्चिंग हवी आहे ते क्षेत्र टाका आणि अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर योजनांना प्राधान्य क्रमांक द्या. प्राधान्य क्रमांक म्हणजे तुम्हाला कोणती योजना अगोदर हवी आहे आणि ती योजना नाही मिळाली तर त्याव्यतिरीक्त इतर कोणती योजना हवी आहे त्यासाठी प्राधान्य क्रमांक द्या.
  • सर्वात शेवटी अर्ज सादर करा.
  • तुम्ही जर नवीन असाल तर २३.६० पैसे एवढी पेमेंट तुम्हाला ऑनलाईन करावे लागते ते करून द्या.

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

हि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा जेणे करून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *