जिल्हा परिषदेच्या वतीने मिरची कांडप मशीनसाठी mirchi kandap machine ऑनलाईन अरु सुरु झालेले आहेत. ज्यांना अनुदानावर मिरची कांडप मशीन हवे असेल त्यांनी लगेच अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
जालना जिल्हा परिषदेच्या वतीने zp yojana jalna मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. दिनांक २२ जून २०२२ रोजी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थींना मिरची कांडप यंत्र अनुदानावर हवे असेल त्यांनी लगेच त्यांचा अर्ज ऑनलाईन सादर करावा.
पुढील योजना पण पहा घरकुल योजना यादी आली पहा तुमचे नाव आहे का यामध्ये
mirchi kandap machine संदर्भातील व्हिडीओ पहा
ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करण्यासाठी आवश्यक असणारी pdf फाईल कोठून आणि कशी डाउनलोड करावी.
या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे. त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडीओ पहा आणी त्यानुसार तुमचा अर्ज सादर करा.
अर्ज सादर करण्यापूर्वी काही सूचना महिला व बालकल्याण विभाग जालना यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना खालीलप्रमाणे आहे.
mirchi kandap machine मिरची कांडप मशीन योजनेचे स्वरूप.
- हि योजना अनुसूचित जाती महिला लाभार्थ्यांसाठी आहे.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे.
- अर्ज करण्यासाठी https://zpjalna.co.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.
- दिनांक १३ ते २२ जून २०२२. या दरम्यान ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर एक pdf फाईल वेबसाईटवर दिलेली आहे ती डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी आणि त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून लागणारी आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून संबधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावा.
आता आपण जाणून घेणार आहोत कि मिरची कांडप यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. पुढे सुरु करण्याअगोदर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवशयक आहे.
मिरची कांडप मशीन अर्ज सादर करतांना लागणारी कागदपत्रे.
- ग्रामसेवक किंवा तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र.
- तहसीलदार किंवा तलाठी यांचे उत्पनाचे प्रमाणपत्र.
- अर्जदार जर दारिद्ररेषेमध्ये असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र.
- यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.
- आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स.
- अर्जदाराचे सर्व मार्गाने मिळून होणारे उत्पन्न १ लाख २० हजारापेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार मागासवर्गीय असल्यास तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडील जातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स.
- दिव्यांग असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र.
- अर्जदार स्वयंसहायता बचत गटाचे सदस्य असल्यास स्वयंसहायता बचत गटाचे प्रमाणपत्र.
मिरची कांडप मशीनसाठी असा करा ऑनलाईन अर्ज.
या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून जाणून घ्या मिरची कांडप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो.
- मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये https://zpjalna.co.in/ हि वेबसाईट सर्च करा किंवा वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
- वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर विभाग व योजना असा पर्याय दिसेल त्यापैकी योजना या पर्यायावर क्लिक करा.
- स्क्रीनचा उजव्या बाजूला महिला व बालकल्याण विभाग हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- या ठिकाणी मिरची कांडप योजना असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता आणखी दोन लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसेल. एक म्हणजे ऑनलाईन अर्ज लिंक आणि दुसरी म्हणजे pdf डाउनलोड लिंक.
- अगोदर ऑनलाईन अर्ज सादर करा आणि त्यानंतर सदरील pdf डाउनलोड करून त्यामध्ये विचारलेली माहिती भरा.
अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरलेला अर्ज शेवट दिनांकाच्या आत तुम्हाला संबधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावा लागणार आहे.