Beej bhandwal karj yojana 2024 बीज भांडवल कर्ज योजना सुरु प्रस्ताव द्या.

Beej bhandwal karj yojana 2024 बीज भांडवल कर्ज योजना सुरु प्रस्ताव द्या.

बीज भांडवल कर्ज योजना अंतर्गत beej bhandwal karj yojana  कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या संदर्भात अगदी सविस्तर माहिती जाणून घेवूयात या लेखामध्ये.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणत वाढलेले आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन विविध योजना देखील घेवून येत आहे जेणे करून नवतरुणांना उद्योग व्यवसाय उभा करता येवू शकेल.

व्हॉट्सॲप ग्रुप लिंक

अशीच एक योजना म्हणजे बीज भांडवल कर्ज योजना होय beej bhandwal yojana. संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय विशेष घटक योजना अंतर्गत बीज भांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भातील बातमी दिनांक २८ जून २०२२ रोजीच्या विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्द करण्यात आलेली आहे.

Beej bhandwal karj yojana बीज भांडवल कर्ज योजना

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालयाकडून अनुदान उद्दिष्ट ४० व बीजभांडवल योजना उद्दिष्ट १६ प्राप्त झाली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीयकृत बँकामार्फत वरील दोन्ही योजना राबविल्या जातात त्यामुळे या योजनेसाठी कर्ज प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संबधित कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Beej bhandwal karj yojana बीज भांडवल योजना पात्रता.

चांभार समाज अंतर्गत असणाऱ्या चांभार, होलार, ढोर, मोची या समाजातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करतांना अर्जदारांनी सूचना लक्षात घ्यावी कि या योजनेचा लाभ घेण्यासाठी याधी या मंडळाकडील योजनेचा लाभ अर्जदारांनी घेतलेला नसावा.

अर्जदाराने कर्जप्रस्ताव तीन प्रतीमध्ये सादर करणे आवश्यक आहे. कर्ज प्रस्ताव त्रयस्थ व्यक्तीकडून स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. म्हणजेच ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीनेच या योजनेसाठी कर्ज प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

कर्ज प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे.

  1. सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला.
  2. तहसीलदार यांचेकडून घेतलेला उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा हवा.
  3. पासपोर्ट साईज फोटो.
  4. शैक्षणिक दाखला.
  5. राशन कार्डची छायांकित प्रत.
  6. ओळखपत्र जसे कि आधार कार्ड, मतदान कार्ड.
  7. पॅन कार्ड छायांकित प्रत.
  8. व्यवसायाचे दरपत्रक.
  9. व्यवसाय ज्या ठिकाणी करायचा आहे त्या जागेची भाडेपावती.
  10. करारपत्र किंवा मालकी हक्क संदर्भातील पुरावा.
  11.  नमुना नंबर ८.
  12. लाईटबिल.
  13. कर पावती.
  14. बीज भांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल.
  15. वाहनांसाठी परवाना.
  16. बॅच परवाना.
  17. व्यवसायासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र.
  18. व्यवसायाचे तांत्रिक प्रमाणपत्र.
  19. अनुभवाचा दाखला.
  20. या अगोदर या योजना अंतर्गत अनुदान न घेतल्याबाबतचे प्रतीज्ञा प्रमाणपत्र.

वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे अर्जदाराने कर्जप्रस्तावासोबत जोडायची आहेत. वरील कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करून घोषणापत्र द्यायचे आहे.

कोठे सादर करणार प्रस्ताव.

बीज भांडवल कर्ज योजना अर्थातbeej bhandwal karj yojana या योजनेचा हा कर्ज प्रस्ताव संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विहित नमुन्यामध्ये अर्जदाराला तीन प्रतीत सादर करायचा आहे.

जालना जिल्हा कार्यलय, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना या ठिकाणी अर्ज स्वीकारला जाणार आहे.

तुम्ही जर जालना जिल्ह्याबाहेरील असाल तर तुमची जिल्ह्याच्या ठिकाणी या योजनेसंदर्भात माहिती जाणून घ्या.

पुढील योजना पण वाचा याच शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार प्रोत्साहन अनुदान

प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी.

बीज भांडवल योजनेचा beej bhandwal karj yojana हा प्रस्ताव दिनांक १ ते ३० जुलै २०२० पर्यंत सादर करायचा आहे. याच कालावधीमध्ये योजनेसाठी लागणारे वाटप करण्यात येणार आहेत.

Beej bhandwal karj yojana

बेरोजगार तरुणांसाठी उपयुक्त योजना.

beej bhandwal karj yojana अर्थात संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळाची हि बीज भांडवल कर्ज योजना चर्मकार समाजाच्या बेरोजगार तरुणांसाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे ज्या युवकांना त्यांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करायचा असेल अशा तरुणांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा.

ग्रामीण भागामध्ये चर्मकार समाजातील बरेच युवक नोकरी शोधताना दिसत आहेत. केवळ चर्मकारच नव्हे इतर इतर समाजातील तरुणांच्या हाताला देखील काम मिळत नाहीत. अशावेळी तुम्ही बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घेवून तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.

हि योजना जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत पोहचवा जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. हि माहिती दुसऱ्याग्रुपवर पाठविण्यासाठी खालील बटनांचा उपयोग करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *