सरकार गेले आता ५० हजार अनुदान शेतकऱ्यांना मिळणार का हाच सवाल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून लवकरच भरतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. सरकार कोणाचेही असो मात्र त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये १ जुलै म्हणजेच उद्या ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जमा होणार होते. नवीन सरकार येणार असल्यामुळे कदाचित यामध्ये काही अडथळा येवू शकतो का अशी शंकेची पाल शेतकरी बांधवांच्या मनामध्ये चुकचुकत आहे.
मागील काही दिवसामध्ये उद्धव ठाकरे मंत्री असतांना अनेक शासन निर्णय म्हणजेच जी आर काढण्यात आले होते. यावर भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला असून महा विकास आघाडी सरकार अतिशय घाईघाई मध्ये हे शासन निर्णय काढत असल्याने शंका निर्माण होत असल्याचे म्हटले आहे अशा आशयाचे पत्र त्यांनी राज्यपाल यांना दिलेले आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पत्राला उत्तर म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून जे जी आर म्हणजेच शासन निर्णय मागील काही दिवसामध्ये काढण्यात आलेले आहेत त्यावर स्पष्ठीकरण मागविण्यात आलेले होते. महा विकास आघाडी सरकार गेले आता ५० हजार अनुदान शेतकऱ्यांना मिळेल का.