५० हजार अनुदान मिळणे गरजेचे नहीतर शेतकऱ्यांचा रोष ओढवून घ्याल.

५० हजार अनुदान मिळणे गरजेचे नहीतर शेतकऱ्यांचा रोष ओढवून घ्याल.

महाविकास आघाडी सरकारने आश्वासन दिलेले शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने घाईने जी आर काढण्यात आले या प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीची दखल घेवून राज्यपालांनी या संदर्भात स्पष्ठीकरण मागविले आहे.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्याने त्यांना या संदर्भात स्पष्ठीकरण देण्याची गरज सध्या तरी पडणार नाही. परंतु प्रश्न असा आहे कि बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजार रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते ते आता मिळणार काय.

कोणतेही सरकार जाताना अनेक निर्णय घेवून जातात आणि ते नवीन सरकारच्या माथी थोपवितात. याचेच एक उदाहरण म्हणजेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण होय जे कि जास्त दिवस टिकू शकले नाही. सरकार कुणाचेही स्थापन झाले तरी शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान मिळणे गरजेचे

महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ झालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्री पदाचा राजीनामा दिलेला असून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघडी सरकार कोसलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे ५० हजार रुपयांचे काय होणार हाच प्रश्न सध्या शेतकरी बांधवाना पडलेला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप लिंक

महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांवर कर्ज होते त्यांची कर्ज माफी करण्यात आली होती. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमितपाने कर्जाची फेड केलेली आहे त्यांचे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर उपाय म्हणून ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परत फेड केलेली आहे त्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये मिळणार होते.

५० हजार अनुदान मिळणे

आता हे घोषित केलेले अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणे गरजेचे आहे. नसता शेतकऱ्यांच्या मनामध्ये नवीन सरकारविषयी नाराजी निर्माण होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *