५० हजार प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना लवकरच  शिंदे सरकारची माहिती.

५० हजार प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना लवकरच शिंदे सरकारची माहिती.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार होते. या संदर्भातील शासन निर्णय देखील उद्धव ठाकरे सरकारने  काढलेला होता.

परंतु उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले आणि आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५० हजार प्रोत्साहन अनुदानाचे नेमके काय होणार, शेतकऱ्यांना हि रक्कम मिळेल कि नाही अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होते.

उद्धव ठाकरे सरकारने अनेक शासन निर्णय घाईघाईमध्ये काढलेले असल्याची तक्रार भाजपच्या नेत्यानी राज्यपाल यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीनुसार राज्यपाल यांनी त्या जी आरची चौकशी करण्याची सूचना देखील उद्धव ठाकरे सरकारला दिली होती.

पुढील लेख पण वाचा ५० हजार प्रोत्साहन अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार

५० हजार प्रोत्साहन अनुदान संदर्भात लवकरच शासन निर्णय येणार

जुन्या सरकारने घेततलेले निर्णय नवीन सरकार रद्द करते कि काय अशी शंका निर्माण झाली होती.

नेमके आता देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचे सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिले जाणारे हे प्रोत्साहन अनुदान मिळेल का अशी शंका निर्माण झाली होती.

परंतु आता काळजी करण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान तर मिळणारच आहे परंतु पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथज शिंदे यांनी दिलेली आहे.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल ५० हजार प्रोत्साहन अनुदान

५० हजार प्रोत्साहन रक्कम कधी मिळेल याकडे अनेक शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले होते. या संदर्भातील प्रतीक्षा आता लवकरच संपू शकते. त्यामुळे हि शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

२०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. या योजनेत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे.

लवकरच येणार शासन निर्णय

या निकषात राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही असे म्हटले आहे.

शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यासंदर्भातील नवीन शासन निर्णय लवकरच काढला जावू शकतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नक्कीच ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळेल याबाबत खात्री होत आहे.

या संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या महासंवाद या वेबसाईटला भेट देवू शकता.

शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ शासनाकडून दिला जातो. यासाठी विविध योजना अमलात आणल्या जातात. या योजनांची माहिती तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर हवी असेलत तर आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा.

५० हजार प्रोत्साहन अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *