पिकाला मिळणार जास्त भाव शेतकरी होणार मालामाल.

जाणून घेवूयात कोणत्या यावर्षी कोणत्या पिकाला मिळणार जास्त भाव. बाजारात जे विकले जाते तेच शेतकऱ्यांनी पिकविले तर नक्कीच इतर व्यापारी वर्गाप्रमाणे शेतकरी देखील फायद्यात राहू शकतो. शेतातील पिकांचा बाजार भाव लक्षात घेवून शेतकर्यांनी त्यांच्या शेतात पिकांची लागवड करावी म्हजेच त्यांना अधिकचा भाव मिळू शकेल.

यावर्षी म्हणजेच २०२२ – २३ मध्ये तिळाच्या पिकला जास्त बाजार भाव मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तीळ उत्पादनाच्या ९२ टक्के परवानगी मिळाल्यामुळे यावर्षी तिळाच्या दारामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

सध्या भारतामध्ये तिळाचा दर १२० रुपये प्रती किलो आहे. जेंव्हा कोरियाला तीळ निर्यात केला जाणार आहे तो दर मात्र १२५ रुपये असणार आहे. यावरूनच तिळाचे तर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

या पिकाला मिळणार जास्त भाव

तिळाचे दर वाढणी संदर्भातील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

कोणत्याही पिकाचे भाव अधिक वाढण्याची शक्यता म्हणजे त्या पिकांची बाजारातील मागणी होय. यावर्षी भारतातून कोरिया या देशाला तीळ निर्यात केला जाणार आहे त्यामुळे तिळाचे दर वाढणार आहेत.

 शेतकरी बांधव दर वर्षी शेतात वेग-वेगळे पीक घेतात. पण नैसर्गिक आपत्तिमुळे शेतात पिकाचे नुकसान होते, पिकांना व्यवस्थित भाव मिळत नाही,त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होते.

काही शेतकरी निराश्यामधे चुकीचे पावूळ उचलतात. शेतकरी भाव वाढ मिळावे यासाठी सरकार कडे विनंती करतात कधी भाव खाली जातो तर कधी वर पण  या वर्षी तिळाला प्रचंड भाव मिळू सकतो. ते कस जाणून घेवूयात या लेखामधे.

तिळ हे प्राचीन काळापासून घेतले जाणारे महत्वाचे पिक आहे, कमी वेळात अधिक उत्पादन देणारे व जमिनीत कस धरून बसणारे पिक आहे. तीळ खरीप, अर्ध रब्बी हंगामात घेतले जाणारे पिक आहे. हे पिक विविध प्रकारचा जमिनीत येत असते. 

या कारणामुळे पिकाला मिळणार जास्त भाव

आपल्या देशात तिळाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात घेतले जाते. मिश्रपिक म्हणून तिळाची लागवड केली जाते. काही राज्यात जसे गुजरात, पश्चिम बंगाल तिळाचे उत्पादन मागचा वर्षी प्रमाणेच आहे पण तिळाची मागणी वाढत चालली आहे.

भारत दरवर्षी कोरिया देशाला तिळ निर्यात करतो. या वर्षी कोरिया १२ हजार टन तिळाची आयात करणार आहे त्यासाठी कोरियांनी टेंडर काडले आहे आणि त्यातील ११ हजार टन पेक्षा जास्त निर्यातीचे टेंडर भारताला मिळाले आहे.

याचा अर्थ निर्यातीचा ९२ टक्के तिळ भारत निर्यात करणार आहे. सध्या  भारतीय बाजारात तिळाचे दर १२० रूपय किलो प्रमाणे चालू आहे पण कोरियाने प्रती किलो मागे ५ रूपयाने वाढवून दिले आहे. 

यामुळे तिळाच्या दराला यावर्षी प्रचंड भाव मिळण्याची शकता दर्शवली जात आहे.

शेतकरी शेतामध्ये राबराब राबतात आणि त्यातून मोती पिकवित असतात. परंतु शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये पिकविलेल्या मालास पाहिजे तसा भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही परिणामी ते कर्जबाजरी होतात आणि यातून आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनांत येतो.

शेतीमध्ये योग्य नियोजन करून बाजारभाव लक्षात घेवून विकेल ते पिकविले तर नक्कीच शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकते.

तिळापासून उत्पादित होणारे पदार्थ

  • तेल 
  • तिळाची चिक्की 
  • तिळाचे लाडू 

तिळाचे फायदे 

  • आहारामध्ये तिळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पदार्थचा स्वाद वाढवणसाठी तिळाचा वापर केला जातो. 
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तिळाचा उपयोग होतो. 
  • तिळामध्ये असलेले कॅल्शियम आणि मॅगनेशियम हाडांसाठी पोषक ठरतात. 
  • कोरड्या त्वचेसाठी तिळ फायद्याचे ठरतात.
  • दात मजबुत ठेवण्यासाठी तिळाचा उपयोग होतो. 
  • तिळाचा उपयोग खाद्यतेल तयार करण्यासाठी केला जातो. 

तिळ लागवड कसी करावी 

  • तिळाचे बियाणे बारीक असते, त्यामुळे जमीन चांगली तयार करावी लागते. त्यासाठी शेतातील ढेकळी फोडून घ्यावीत. नाहीतर ढेकळामध्ये बी दबून जाण्याची शक्यता असते. त्यासाठी जमीन आडवी-उभी नांगरून भूसभूशीत करावी.
  • भूसभूशीत जमीनीमधे तिळाची उगवण चांगली होते. 
  • शेणखत मिसळून घ्यावे आणि पेरणी करावी. 
  • जास्त खोल बियाणे लागवड करू नये. 
  • तिळ हे पिक घेण्यासाठी ८० ते ९० दिवस लागतात.
  • बियाण्याच्या वाढीसाठी २० – २७  अंश सेल्सिअस तापमान पोषक असते.
  • रात्रीच्या वेळी पिकाला थंडी ची गरज असते.

पुढील योजना पण बघा गोदाम उभारणीसाठी ६० लक्ष निधी मिळणार नवीन जी आर पहा.

तिळ पिकावर पडणारे रोग.

  • मूळ व खोड कुजव्या : हा रोग तीळाच्या खोडावर होतो. खोडावर काळसर पुरळ दिसतात व संपूर्ण झाडावर पसरतात.
  • पानावरील ठिपके: हा रोग तिळ पिकावर नियमित आढळून येतो. गोलाकार आकाराचे ठिपके पानावर दिसतात. 
  • मर:  हा रोग बुरशी मुळे होतो कोलीट्रोट्रायकाम व फ्यूजारीयम. बुडापासून शेंडयापर्यंत झाड काळसर तपकिरी दिसते. 
  • पर्णगुच्च : हा रोग मायकोपल्झमा सारख्या विषाणू मुळे होते. रोगाचा प्रसार तुडतुड्या मार्फत होतो. 
  • भुरी : झाडाच्या पानावर पांढरी भूकटी पसरल्यासारखी दिसते.

कीड नियंत्रण उपाय.

  • वेळेवर पेरणी करावी. 
  • पेरणी वेळेस व बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. 
  • निंबोळी अर्कची पेरणीनंतर १५ दिवसानी फवारणी करावी. 
  • रोग प्रतिकारक जातीचा वापर करावा. 
पिकाला मिळणार जास्त भाव

काढणी व मळणी 

  • झाडावर साधारणपणे ७५ टक्के पाने पिळसर दिसू लागल्यास पिकाची कापणी करावी.
  • कापणी झाल्यावर पेढ्या बांधाव्यात. 
  • ६ ते ७ पेंढ्याची मोळ करून उन्हात वाळू घालावी. 
  • नंतर पेंढ्या ताडपत्रीवर उलट्या करून व्यवस्थितपणे झाकाव्यात.
  • बियाणे उफणणी करून स्वच्छ करावे व चांगले वाळवावे.

अशा प्रकारे तिळ पिकाची लागवड करावी. यावर्षी तिळाला चांगला भाव मिळन्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बंधुना तिळ पिक घेणाचा चांगलाच फायदा होवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *