SBI crop loan नूतनीकरण अर्ज सुरु ५० हजार रु. मर्यादेत कर्ज मिळणार.

SBI crop loan नूतनीकरण अर्ज सुरु ५० हजार रु. मर्यादेत कर्ज मिळणार.

तुम्हाला शेतीसाठी कर्जाची गरज असेल तर SBI crop loan नूतनीकरण अर्ज परत एकदा सुरु झाले असून तुम्ही अजूनही तुमचे कर्ज फेडलेले नसेल तर लगेच कर्जाचे नूतनीकरण करून घ्या. पिक कर्जाचे नूतनीकरण crop loan renewal केल्यावर शेतकऱ्यांना तत्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या जालना जिल्ह्यातील शाखांना जोडलेल्या गावातील शेतकरी बांधवानी सुलभ पिक कर्ज योजनेद्वारे बँकेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

ज्या शेतकरी बांधवांच्या पिक कर्जाचे नूतनीकारण करण्यात येईल त्यांना तत्काळ नवीन कर्ज देण्यात येणार आहे.

याच बरोबरीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या बँकेशी सलंग्न असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचे नूतनीकरण केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नवीन कर्ज ५० हजार रु. मर्यादेत देण्यात येणार आहे.

कर्ज नूतनीकरण बातमी वाचा

SBI crop loan नूतनीकरण करून घ्या.

पिक कर्जाचे नूतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जालना जिल्ह्यातील बँक ऑफ महराष्ट्रच्या वतीने कर्ज मेळावे देखील आयोजित करण्यात आलेले आहेत.

त्यामुळे शेतकरी बांधवानी या सुलभ पिक कर्ज योजनेचा लाभ घेण्याच आवाहन करण्यात आलेले आहे. अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या पिक कर्जाचे नूतनीकरण अद्याप केलेलं नाही.

ज्या शेतकऱ्यांना नवीन एसबीआय पिक sbi crop loan हवे असेल त्यांनी तत्काळ संबधित बँक शाखेशी संपर्क साधावा. जेणे करून लवकरात लवकर अशा शेतकरी बांधवाना नवीन कर्ज मिळू शकेल.

या संदर्भातील व्हिडीओ पहा.

SBI crop loan मिळणे झाले आता अधिक सोपे.

शेतकऱ्यांसाठी बँकेच्या वतीने सुलभ कर्ज योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी कागदपत्रांमध्ये जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासन आग्रही आहे. त्यामुळे हि योजना नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरू शकते.

पिक कर्ज नूतनीकरण crop loan renewal करण्यासाठी काही अडचण येत असेल तर बँक कर्ज मित्र देखील अशा शेतकरी बांधवाना मदत करणार आहेत.

शेतकरी जर नवीन पिक कर्ज योजनेसाठी इच्छुक असेल तर अशावेळी त्यांना मदत करण्यासाठी कृषी कर्ज मित्र यांना मदत करावी लागणार आहे. या संदर्भात शासनाचा जी आर देखील आलेला आहे.

महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशामध्ये शेतीसाठी नेमकी गरज असताना शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध होत नाही.

अशावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले कर्ज परतफेड केली तर नवीन कर्ज तत्काळ शेतकऱ्यांना उपलब्ध होईल व त्यातून ते शेतीसाठी लागणारे साहित्य खाते औषधी खरेदी करू शकतील.

SBI crop loan

ऑनलाईन पिक कर्ज मागणी अर्ज लिंक.

तुम्ही जर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता पिक कर्ज मागणीसाठी नवीन लिंक आलेली आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही पिक कर्ज मागणी अर्ज करू शकता.

तुम्ही जालना जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर संबधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर त्या त्या जिल्ह्यातील पिक कर्ज मागणी लिंक दिलेली असते हि बाब लक्षात घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *