एसबीआय बँकेने नवीन टोल फ्री नंबर sbi new toll free number सुरु केले आहेत. या संदर्भातील इमेल्स sbi बँकेच्या ग्राहकांना येण्यास सुरुवात झालेली आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील माहिती जेणे करून शेतकऱ्यांना या सेवेचा अधिक चांगल्याप्रकारे लाभ घेता येईल.
आपल्यापैकी बऱ्याच जणांचे खाते बँकेत असते. sbi बँकेत ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांची खाती देखील मोठ्या प्रमाणत आहेत.
sbi new toll free number मुळे मिळेल मदत
बँक संबधित काही अडचण आली तर आपल्याला लगेच बँकेत जाणे शक्य होत नाही. अशावेळी अनेक जण ज्या बँकेत ज्यांची खाती आहेत अशा बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधत असतात.
ग्राहकांची तक्रार सोडविण्यासाठी बँकेकडून कस्टमर केअर क्रमांक दिलेला असतो. त्यावर संपर्क साधून आपण आपली समस्या सोडवून घेवू शकतो. एसबीआय बँकेचा अशाच एक नवीन कस्टमर केअर नंबर लाँच करण्यात आलेला आहे.
असे आहेत sbi new toll free number.
18001234 व 18002100 असे दोन नवीन brand new contact centre number लाँच करण्यात आलेले आहेत. एसबीआय भारतातील सर्वात मोठी बँक आहे. SBI बँकेच्या शाखा अगदी ग्रामीण भागात देखील कार्यरत आहेत. ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणत sbi बँकेत बचत खाते असते.
एसबीआय नवीन टोल फ्री क्रमांक लाँच झाल्या संदर्भातील माहिती बँकेच्या ग्राहकांना इमेल द्वारा देण्यात आलेली आहे.
ग्रामीण भागातील एसबीआय बँकेत मोठ्या प्रमाणत गर्दी असते. अशावेळी एखाद्या शेतकऱ्याला त्यांच्या बँक खाते संदर्भात काही अडचण येत असेल तर sbi शाखेच्या अधिकारी साहेबांशी संपर्क साधण्यास गर्दीमुळे अडचण येवू शकते.
अशावेळी एसबीआयच्या वतीने नव्याने लाँच करण्यात आलेल्या sbi new toll free number वर संपर्क साधून ग्राहक त्यांची अडचण दूर करू शकतात.
पुढील लेख पण वाचा SBI crop loan नूतनीकरण अर्ज सुरु ५० हजार रु. मर्यादेत कर्ज मिळणार.
sbi ग्राहकांना खालील सेवांचा मिळेल लाभ
नवीन नवीन एसबीआय टोल फ्री नंबरवर sbi new toll free number खालील प्रकारच्या सेवा ग्राहक मिळवू शकतात.
- खात्यामधील शल्लक रकमेचा तपशील.
- खात्याचे शेवटचे पाच transaction.
- bank statement.
- SBI Yono किंवा internet banking संदर्भात अडचण आल्यास मदत.
- ATM चा पिन जनरेट करणे.
- पोस्टाने ATM येत असेल तर त्याचे स्टेट्स.
- कार्ड हरविल्यास ब्लॉक करणे.
- खात्यामधील अनधिकृत व्यवहारासंदर्भात रिपोर्ट करणे.
- तक्रार दाखल करणे.
- TDS संदर्भातील माहिती.
- जमा रकमेवरील व्याजदर संदर्भातील माहिती.
- चेक बुक संदर्भातील समस्या.
वरील प्रकारच्या सेवा एसबीआय ग्राहकांना आता अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकणार आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे बरेच खाते sbi मध्ये असतात त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तरी या नवीन सेवेचा चांगला लाभ मिळेल अशी अशा करूयात.