थोर संत नामदेव यांची माहिती व कार्य संबधी जाणून घेवूयात. नामदेव महाराज पुण्यतिथी व जयंती दिनी मोठ्या प्रमाणत संत नामदेव यांची माहिती व कार्य संबधी माहिती शोधली जाते. यामुळे संत नामदेव महाराज यांच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती द्यावी हा या लेखाचा उद्देश आहे.
भारतात आजवर अनेक संत होवून गेले. संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ. सर्वांनी आपापल्या मधुर भक्ति अभंगाचा परिचय दिलेल आहे. आज आपण संत नामदेव यांच्यावर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळेच संत नामदेव यांची माहिती व कार्य जाणून घेणे गरजेचे आहे.
संत नामदेव भक्ति आणि अभंगासाठी पूर्ण देशात प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० मध्ये हिंगोली जिल्ह्यात झाला. संत नामदेवांचे पूर्ण नाव नामदेव दामा रेळेकर असे होते. नामदेवांचे वडिलांचे नाव दामासेटी रेळेकर आणि आईचे नाव गोणाई रेळेकर होते.
हे पण वाचा लोकमान्य टिळक माहिती मराठी
संत नामदेव यांची माहिती व कार्य अगदी सोप्या भाषेत.
नामदेवांच्या घरचा व्यवसाय शिंप्याचा होता. नामदेवांच्या घरात त्यांच्या आजोबापासून विठ्ठलभक्तीचे वातावरण होते त्यामुळे त्यांना बाळपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली.
विठ्ठलभक्तीत लहानपणापासूनच ते खूप रमले होते. नामदेवांची आई नामदेवला रोज मंदिरात नेत असे. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांनी शिक्षणापेक्षा गाणी, नृत्य, भजन यामध्ये वेळ घालवला.
निर्दोष आणि प्रामाणिक विठोबाबद्दलची भक्ती होती. एके दिवशी नामदेवची आई व्यस्त असल्याने तिने नामदेवला विठोबाला नैवेद्याचे भोजन भरवण्यास सांगितले.
नामदेव मंदिरात गेले. विठोबाला नैवेद्य दाखवला म्हणजे विटोबासमोर ताट ठेवले पण विठोबा त्यांचावर नाराज आहे म्हणून नैवेद्य घेत नाही असे त्यांना वाटले.
नामदेवांना रडू कोसळले. नामदेवांची पत्नी राजाई होती आणि त्यांना चार पुत्र होते.
संत नामदेव यांची माहिती व कार्य sant namdev maharaj mahiti
त्यांना शिंपी म्हणून किंवा आपल्या वडिलांच्या इतर व्यवसायात रस नव्हता.
दिवस आणि रात्र विठोबाच्या भक्तीत घालवणे हे त्यांचे एकमेव हित होते. मूर्ती पूजा, कर्मकांड, जातपात यांच्या विषयी त्यांच्या स्पष्ट विचारांमुळे हिंदीतील अनेक विचारवंतांनी त्यांना संत कबीर यांचे मार्गदर्शक मानले.
संत नामदेवाचे पंजाब मध्ये अनेक देऊळ आहे. नामदेव हे ‘मराठीतील’पहिले चरित्रकार होते ज्यांनी ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.
भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरचे समकालीन होते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक होते. आपल्या कीर्तनाने प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी त्यांची कीर्ती होती.
नामदेव महाराज यांच्या प्रवचनांची गोडी.
संत नामदेवाचे जवळ जवळ २५०० अभंगगाथा प्रसिद्ध आहेत. त्यातील सुमारे ६२ अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत.
संत नामदेव महाराजांनी कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेला एकत्र बांधण्याचे काम केले. त्यांचे प्रवचन लोक मोठ्या भक्ती भावाने एकत असत.
पंजाब मधील शब्द कीर्तन आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कीर्तन यात बरेचसे साम्य आहे.
पंजाब मधील घुमन येथे त्यांचे स्मारक देखील बांधण्यात आलेलं आहे. नामदेव वयाच्या साधारण वीस वर्षांचे होते तेव्हा त्यांची भेट पंढरपुरात थोर संत ज्ञानदेव यांना झाली.
संत ज्ञानेश्वरांच्या भेटीनंतर संत नामदेवांचे आयुष्य पालटले. अनेक संतासोबत नामदेव महाराजांनी भारत यात्रा केली, तीर्थयात्रा केली. विसोबा खेचर हे त्यांचे सद्गुरू होते.
नामदेव महाराज भक्तीत विलीन होत पुढे संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास हे सामील झाले.
या पंच संतकवींनी अज्ञानी मनात ज्ञानाचे दीप प्रज्वलित करण्याचे मौलिक काम केले. संत नामदेवांचा सर्वात जास्त प्रभाव हा संत तुकाराम महाराजांवर पडला होता.
नामदेव महाराज यांचे कार्य महान
प्रत्येक वर्षी लाखो वारकरी या पांडुरंगाच्या सोबत संत नामदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात. नामदेवांनी समाज जागृतीचे महान कार्य केले. त्यांनी संसारबद्दल सांगितले कि संसारात राहून संसाराचा उपभोग जरूर घ्यावा, परंतु नित्य जागृत राहावं, अनासक्त असावं. वेळोवेळी ईश्वराची भक्ती करावी.
नामदेव विठोबाच्या भक्तीत एवढे रमले होते कि संसाराकडे, मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष व्हायला लागले होते. नामदेवांची आई त्यांना सांगायची कि या विठोबाचा नाद सोड, यामुळे कधी कोणाचे बरे झाले नाही.
आपला संसार बुडवू नकोस. पण नामदेवांनी काही एकले नाही. नामदेव ऐकत नाही, असे पाहून गोणाईबाईने आपला मोर्चा पांडुरंगाकडे वळविला.
त्या म्हणाल्या विठ्ठला तुम्ही आमच्या मुलाला तुमच एवढे वेड का लावलेस, माझ्या पोराला माझ्या स्वाधीन करा. याच्या हातात भोपळा देऊन तू आम्हांला मात्र भिकेची पाळी आणलीस.
आईचे बोलणे ऐकून नामदेव म्हणाले आई पुढे लाभ होईल या आशेने मला पांडुरंगा पासून दूर नेते पण मला आता सुख दु:खाच काहीही महत्व राहिलेले नाही. म्हणून मी पांडुरंगाचे पाय धरून सर्वस्वी त्यांचा झालो आहे.
शिवण कामाचा संत नामदेव यांचा व्यवसाय
नामदेवांच नित्यक्रम चालूच होता. त्यांना समजावण्यासाठी त्यांचे वडील दामासेटी आणि नामदेवांची पत्नी राजाई यांनीही खूप प्रयत्न केला. त्यांचे वडील म्हणाले नामदेवा शिवण्याटिपण्याचा व्यवसाय करणे आपला कुलधर्म,
तु आपला व्यवसाय कर. पत्नी, मुलाकडे पाहा एकदा. विठ्ठलाच्या भक्तीत तुला काय सुख मिळणार. माझे आयुष्य आता संपत आले आहे.
मी काहीच दिवस राहणार आहे आमच्या पश्चात तू नावलौकिक राखशील असे वाटले होते, पण तु तर देव देव करतोय.
तु कुळाला कलंक लावलास. पण नामदेव काही ऐकत नव्हते. नामदेवांच्या चरित्रात असे भक्तीरसाने भरलेले अनेक प्रसंग आहेत.
आपली जीवनविषयक भूमिका नामदेवांनी आत्मचरित्रात विस्ताराने सांगितली आहे.
आरंभी नामदेवांच्या विठ्ठलभक्त्तीला विरोध करणारे हे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रभावाने विठ्ठलाच्या भक्तीप्रेमात पुढे रंगून गेले. हे बघून नामदेवाला खूप मोठा विजय मिळवल्यासारखे झाले.
नामदेवांचे अभंग आजही ऐकावेसे वाटतात. असे म्हणतात जेंव्हा नामदेव कीर्तन करायचे तेंव्हा त्यांच्यासमोर देव नाचायचे.
भक्तीत तल्लीन राहायचे संत नामदेव महाराज
एकदा नामदेवांना बाजारात जावून कपडे विकायचे काम सांगितले. नामदेव बाजारात जात असतांना रस्त्यामध्ये असलेल्या एका दगडावर बसले आणि भजनामध्ये तल्लीन झाले.
राहीला आपण कापड विकायला आलो होतो या गोष्टीचा त्यांना अगदीच विसर पडला. घरी गेल्यावर वडील रागावेल म्हणून ते कपडे सोडून मंदिरात जावून बसले.
दुसऱ्या दिवशी बाजारात गेले तर कपडे नव्हते. वडीलांना सांगितले कि ज्यांनी पैसे दिले नाही त्याला एकाखोलीत बंद केलेल आहे, जेंव्हा त्याचे वडिलांनी दार उगडले तेंव्हा समोर सोन्याची एक लगडी होती. हे बघुण नामदेव म्हणे विठोबाणी वाचवल.
ऐंशी वर्षे वय झाल्यानंतर नामदेवांनी देह त्यागण्याचे ठरविले. विठ्ठलाची आज्ञा घेऊन ३ जुलै १३५० रोजी पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले.
सुंदर लेख