जाणून घेवूयात कि विधवा महिला योजना आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा सादर करावा लागतो. या लेखामध्ये आपण खालील प्रकारची माहिती जाणून घेणार आहोत.
- विधवा महिला योजना आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे उपलोड करावी लागतात.
- अर्ज कोणत्या वेबसाईटवर सादर करावा लागतो.
- या योजनेसाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत.
या योजनेचा लाभ केवळ बांधकाम कामगार पुरुष किंवा बांधकाम कामगार स्त्री कामगारांना मिळतो. बांधकाम कामगार पुरुष किंवा स्त्री मृत्यू झाल्यास अशा विधवा स्त्रीस किंवा विधुर पुरुषास २४ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळते. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो.
या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील संपूर्ण माहिती दिलेली आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा येथे क्लिक करा.
विधवा महिला योजना आर्थिक सहाय्य योजने शिवाय इतरही योजनांचा घेता येतो लाभ.
बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेली असावी.
तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असेल तर शासनाच्या एकूण ३२ योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. यापैकीच एक असलेली योजना म्हणजे बांधकाम कामगार विधवा महिला आर्थिक सहाय्य होय.
हा लेख पण वाचा बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या ३२ योजना
एखादा नोंदणीकृत सक्रीय खाते असलेला बांधकाम कामगार असेल आणी त्यांचा अपघाताने मृत्यू झाला तर अशा बांधकाम कामगाराच्या पत्नीस महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने विधवा आर्थिक सहाय्य म्हणून २४ हजार रुपयांची मदत ५ वर्षापर्यंत केली जाते.
जर बांधकाम कामगार महिला असेल आणि या महिलेचा अपघाती मृत्यू झाला असेल तर त्या महिलेच्या पतीस देखील हि आर्थिक सहाय्याची मदत दिली जाते.
आता जाणून घेवूयात कि विधवा महिला आर्थिक सहाय्य किंवा विधुर आर्थिक सहाय्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो.
खालील प्रमाणे आहे विधवा महिला योजना आर्थिक सहाय्य योजनेची पद्धत.
विधवा महिला आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्याआधी बांधकाम कामगार म्हणून नोंद करणे आवश्यक आहे.
नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगारांना एक रजिस्ट्रेशन क्रमांक मिळतो. नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून बांधकाम कामगार विधवा महिला आर्थिक सहाय्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
हा ऑनलाईन अर्ज कसा केला जातो या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
महिला योजना आर्थिक सहाय्य निधी मिळविण्यासाठी लॉगीन करा.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईटला भेट द्या.
- या ठिकाणी विविध पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा असा पर्याय दिसेल. construction worker apply online for claim यावर क्लिक करा.
- New claim व update claim असे दोन पर्याय दिसतील. तुम्हाला जर नवीन अर्ज करायचा असेल तर New claim हा पर्याय निवडा.
- तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका.
- मृत्यू संबधित लाभासाठी अर्ज करत असाल तर येथे खुण करा अशी सूचना तुम्हाला दिसेल त्या समोरील चौकटीमध्ये क्लिक करा.
जशी हि तुम्ही वरील माहिती सादर कराल त्यावेळी तुमचा अर्ज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
विधवा महिला आर्थिक सहाय्य योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज.
- योजना श्रेणी निवडा म्हणजेच select scheme category असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला चार योजना दिसतील १) शैक्षणिक कल्याण योजना Education welfare scheme २) आरोग्य कल्याण योजना Health welfare scheme ३) आर्थिक कल्याण योजना Financial welfare scheme ४) समाज कल्याण योजना social welfare scheme.
- आर्थिक कल्याण योजना Financial welfare scheme या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर योजना निवडा या पर्यायामध्ये बांधकाम कामगार विधवा किंवा विधुरासाठी २४ हजार आर्थिक सहाय्य ५ वर्षासाठी या पर्यायावर क्लिक करा. Financial assistance of RS 24,000 up to 5 year to widow or widower in case of death of registered construction worker.
ऑनलाईन अर्जामध्ये खालीलप्रमाणे माहिती भरावी लागणार.
- Date of death मृत्यूची तारीख.
- प्राधिकरण अधिकारी issuing authority.
- कागदपत्र जरी करणाऱ्या प्राधिकरणाचा नाव आणि पत्ता.
- मूत्यू झालेल्या संदर्भातील मृत्यू प्रमाणपत्राचा क्रमांक.
- मृत्यू प्रमाणपत्राची तारीख.
- पती आणि पतीच्या तपशिलामध्ये पूर्ण नाव, जन्म तारीख, वय, संबध, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर.
- अर्जाचा बँक तपशील टाकणे गरजेचे आहे जसे कि, बँकेचा IFSC code, बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँकेचा पत्ता, बँक खाते क्रमांक.
वरील प्रमाणे माहिती ऑनलाईन अर्जामध्ये भरावी लागते. हि माहिती भरल्यानंतर काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती खालीलप्रमाणे आहेत.
खालील कागदपत्रे ऑनलाईन करावी लागतील अपलोड.
- मृत्यू प्रमाणपत्र.
- विवाह प्रमाणपत्र जर असेल तर नसेल तर काही हरकत नाही.
- अर्जदाराच्या बँक खात्याची स्कॅन केलेले बँक पासबुक.
- आधार कार्ड.
- स्वयंघोषणा पत्र.
वरील प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन बांधकाम कामगार विधवा महिला आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अपलोड करावी लागणार आहेत.
हि सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करून द्या.
अजूनही तुम्हाला हि माहिती समजली नसेल तर खालील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे तुमचा अर्ज सादर करा.